‘आई कुठे काय करते’मधील अनघाचा लग्नानंतरचा लूक आला समोर? सोशल मिडीयावर फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सध्या मराठी मालिकेत आई कुठे काय करते ही स्टार प्रवाह च्यानेल ची मालिका खूप चर्चेत आहे. प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. टीआरपीबाबत ही कायम इतर च्यानेल पेक्षा आघाडी घेतलेली आहे. त्यामधील सर्वच पात्र चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस खरी उतरत आहेत.

घराघरात जाऊन ते सर्व प्रचंड लोकप्रिय झालेले आहेत. त्यामुळे चाहते या मालिकेतील सर्व अपडेट ठेवत असते. एक सुद्धा एपिसोड मिस करत नाहीत. आणि जर झालाच तर चाहत्यांना, प्रेक्षकांना त्यातील मजा जाणून घेण्याची प्रचंड इच्छा असते. तर आई कुठे काय करते या मालिकेत चांगलाच नवीन ट्वीस्ट आलेला आहे. काय आहे, चला सविस्तर जाणून घेऊयात.

See also  "रंग माझा वेगळा" मालिकेत एन्ट्री झालेल्या या तरुण अभिनेत्री बद्दल जाणून थक्क व्हाल, जाणून घ्या तिचा संघर्षमय प्रवास...

242854131 411640600316820 2156592079977161311 n

आश्विनी महांगडे या अभिनेत्रीला कोण बरं ओळखत नसेल ? मालिकेतील अनघाचे पात्र या उत्तम काम करणाऱ्या अभिनेत्रीने साकारलेलं आहे. हे पात्र आज प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. तसेच स्वराज्य रक्षक संभाजी याही मालिकेत साकारलेलं राणू अक्का साहेबांची भूमिका खूप चर्चेत होती. उत्तम निभावली होती.

आई कुठे काय करते या लोकप्रिय मालिकेतील आश्विनी महांगडे साकारत असलेल्या अनघाच्या पात्रामध्ये एक नवा ट्वीस्ट आलेला आहे. मालिकेतील कथानक पुन्हा उलटे फिरत असल्याचं दिसून येत आहे. अभिषेक आणि अनघाचे संबंध जुळत असल्याचे मालिकेच्या या टप्प्यावर दिसून येत आहे.

242949173 291468872432370 5880005173623253900 n

ज्यामुळे मालिका चांगलीच रंगलेली आहे. त्यामुळे प्रत्येल एपिसोड पाहण्यासारखे होत आहेत. उत्सुकतेचं बीज एका नंतर एका एपिसोड मध्ये दिसत आहे. बरं एवढेच नाहीतर अनघा आणि अभिषेक लवकरच लग्न सुद्धा करून टाकणार आहेत, अशी चर्चा सुद्धा एपिसोडीक अंदाज बांधून चाहत्यांमध्ये होत आहे.

See also  अभिनेता जितेंद्र जोशी याने बो'ल्ड सीन विषयी व्यक्त केले स्वतःचे मत, म्हणाला, "माझे बो'ल्ड सीन आहेत पण..."

कारण आश्विनी महांगडे या अभिनेत्रीने तिच्या सोशल मिडीयावर लग्नानंतरचा फोटो सेटवर काढलेला शेयर केला आहे. जो फोटो चाहत्यांमध्ये खूप व्हायरल झाला आहे. चर्चेचा विषय असा झाला आहे की अनघाचे पात्र कसे बदलणार याची सर्वाना उत्सुकता लागलेली आहे. अनघा या पात्राने खूप अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलेलं आहे. ते पात्र साकारलेली अभिनेत्री ही खु प्रसिद्ध आहे. घराघरात पोहचलेली आहे. तिला तिच्या पुढील वाटचाली साठी शुभेच्छा. वाचत रहा अश्याच मनोरंजक गोष्टी…

Leave a Comment