‘तुझ्यात जीव रंगला’ फेम वाहिणीसाहेबच्या मुलाचं नुकतंच झालं झालं बारसं, बारस्याचे फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मराठी मालिका मध्ये अनेक पात्र येतात आणि जातात. काही लोकप्रिय होतात तर काही होत नाही. पण तुझ्यात जीव रंगला या झी मराठी च्या लोकप्रिय मालिकेत फेमस झालेलं आणि प्रेक्षक पसंतीस पडलेलं एकमेव पात्र ते म्हणजे वहिनी साहेब. सध्या वहिनी साहेब साकारणारी धनश्री काडगावकर ही सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. कारण नुकतीच ती आई झालेली आहे. म्हणजे त्यात आता तिच्या बाळाचं बारसं झालेलं आहे. तर नेमकं सविस्तर माहिती काय आहे चला जाणून घेऊ.

57d9e7713499c338f3d1803f33325255694fb

मराठी’ वरील प्रसिद्ध मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ याच्यातील नंदिता घराघरांत पोहोचलेली अर्थात छोट्या पडद्यावरच्या वहिणीसाहेब अभिनेत्री धनश्री काडगावकर हिच्या घरी नुकतंच चिमुकल्याचे आगमन झाले आहे. या वहिणीसाहेब आता आई झाल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी धनश्रीच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं होतं. आता नुकतेच तिने तिच्या मुलाचे फोटो पहिल्यांदाच सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

See also  मराठी अभिनेत्री अश्विनी भावेचे अमेरिकेतील आलिशान घर पाहिले आहे का? घराचे फोटो पाहून थक्क व्हाल...

b08c20a6934dd42f4b927f097aabf8c00aa64

धनश्री मुलाला जन्म दिल्यानंतरही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. मात्र तिने बाळाचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले नव्हते. त्यामुळे तिचा चाहता वर्ग बाळाचा फोटो पाहण्यासाठी उत्सुक होते. अखेर तिने तिच्या बाळाचं नाव ‘कबीर’असून त्याच्या बारश्याचे फोटो चाह्त्यांसोबत शेआर केले आहे.

अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने काही महिन्यांपूर्वी एक खास व्हिडिओ शेअर करत प्रेग्नंट असल्याची बातमी धनश्रीने दिली होती. कुणीतरी येणार येणार गं… पतीच्या बर्थडेच्या दिवशी धनश्रीने ही गोड बातमी समाजमाध्यमांवर शेअर केली होती. त्यानंतर तिची अधिक चर्चा सुरु झाली होती.

ddf09c8052ecb49f79c2e1576789337bf9f7b

धनश्री मुळची पुण्याची आहे. तिचे सासरसुद्धा पुण्यातच आहे. डिसेंबर २०१३ मध्ये इंजिनिअर असलेल्या ध्रुवेशसोबत धनश्रीने लग्न केले होते. धनश्रीला ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर ती गंध फुलांचा गेला सांगून, जन्मगाठ या मालिकांमध्ये झळकली.

See also  माधुरी दीक्षित सोबत लग्नाला नकार देणाऱ्या प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांची पत्नी आहे हि प्रसिद्ध गायिका...

विविध नाटक आणि चित्रपटातही धनश्रीने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय. ‘झोपी गेलेला जागा झाला’ आणि ‘आधी बसू मग बोलू’ या नाटकांमधून धनश्रीने काम केले आहे.

5a9a7edc457820e19f4ff92d9f1f0f3fe53ca

धनश्री आई झाल्यानंतर खूप आनंदी दिसत आहे. आणि साहजिकच कारण आई ही जगातली सर्वात सुंदर गोष्ट आहे. धनश्री आणि सर्व कुटुंबातील व्यक्तींना पुढील भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment