सैराट फेम रिंकू राजगुरूचं बॉलिवूड मध्ये पदार्पण, चित्रपटाचे नाव ऐकून थक्क व्हाल!
मराठी कलाकार किंवा प्रत्येकाला असं वाटतं किंवा त्याचं एका प्रकारचं स्वप्नच असतं की कधीतरी आपण बॉलिवूड मध्ये एन्ट्री करावी. काम करावं. मराठी मधील अनेक अभिनेते अभिनेत्री सध्या बॉलीवूड मध्ये आपलं नशीब जोमाने आजमावत आहेत. अश्यात आता अजून एक भर पडलेली आहे.
ते म्हणजे सैराट फेम रिंकू राजगुरू. जी नवीन हिंदी चित्रपट द्वारे आपल्या समोर येणार आहे. तिचा नेमकं कोणता चित्रपट येतोय ? चला ते पाहुयात.
‘सैराट’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु. तिने मराठी चित्रपटात काम केल्यानंतर ती हिंदी वेब सीरिजमध्ये काम करताना दिसली होती. आता रिंकू एका हिंदी चित्रपटामध्ये काम करणार असल्याचे समोर आले आहे. या चित्रपटाचे नाव ‘अनपॉज’ असे असून नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
नुकताच ‘अनपॉज’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर पाहाता या चित्रपटामध्ये पाच वेगवेगळ्या शॉर्ट स्टोरी दाखवण्यात आल्या आहेत. यामध्ये रिंकू राजगूरु वेगळ्या अंदाजात दिसत आहे. एकंदरीत एक मिनिटे ५१ सेकंदाचा ट्रेलर पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायाला मिळते.
तनिष्ठा चॅटर्जीचे दिग्दर्शन असलेल्या शॉर्ट स्टोरी रिंकू राजगुरू दिसणार आहे. तिच्यासोबत लिलिट दुबेदेखील अभिनय करताना दिसणार आहे.
राज अँड डीके, निखील अडवाणी, तनिष्ठा चॅटर्जी, अविनाश अरूण आणि नित्या मेहरा अशा पाच गुणवंत दिग्दर्शकांनी दिग्शर्दित केलेल्या शॉर्ट फिल्म्स या चित्रपटात दाखवल्या जाणार आहेत. हा चित्रपट १८ डिसेंबर रोजी अॅमेझॉन पाइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
रिंकू राजगुरू चे महाराष्ट्र आणि मराठी मध्ये लाखो चाहते आहेत. ते तिला आरची म्हणून ओळखतात. हीच आरची आता हिंदी मध्ये काम करून करोडो दिलो की धडकन कशी बनतेय तेच पाहायचं आहे, आपल्याला. रिंकू ला पुढील वाटचाली करिता शुभेच्छा..
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.