मराठी अभिनेत्री रुपाली भोसलेची लव्ह स्टोरी आहे खूपच हटके, गुपचूप केले होते लग्न, जाणून घ्या कोण आहे तिचा पती…
मराठी, हिंदी टेलीव्हिजन इंडस्ट्रीत आजवर आपण पाहत आलेलो आहोत की जी अभिनेत्री अभिनेता पडद्यावर नकारात्मक भूमिका साकारतो, तो प्रमुख भुमिके इतकाच लोकप्रिय होतो. कारण कथानकच नकारात्मक भूमिका करणाऱ्याच्या विरोधाने संघर्षशील होत असते. हिंदी मध्ये मागील काही काळात व सध्या चालू असलेल्या सर्वच मालिकेत नकारात्मक भूमिका करणारे आज रसिकांच्या चांगलेच लक्षात राहत आहेत.
ते सुद्धा खूप प्रसिद्ध होतात. घराघरात जातात. त्यांनाही ओळख मिळते; फक्त शेड नकारात्मक असते. मराठी मध्ये सध्या आई कुठे काय करते ही मालिका स्टार प्रवाह या वाहिनीवर खूप लोकप्रिय होत आहे.
टीआरपी बाबत ही मालिका नेहमी आघाडीवर असते. आता मालिकेचं घराशी निगडीत असलेलं कथानक आणि त्यातील कलाकारांनी भूमिकेला दिलेला उत्तम न्याय हीच यशाची जमेची बाजू ठरत आहे. तर या मालिकेत नकारात्मक पात्र साकारून ही आज रसिकांच्या मनात घर करून बसणारी एक अभिनेत्री सध्या खुप चर्चेत आहे.
जिच्या भूमिकेचे नाव आहे, संजना. जी अनिरुद्ध च्या आयुष्यात येते काय आणि मालिकेत नवनवीन ध’क्कादायक वळण देणारे एपिसोड घडतात काय. आज संजना ही व्हिलन म्हणून का होईना घराघरात पोहचलेली आहे.
आता सर्वांना संजनाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री च्या खऱ्या आयुष्यात काय चाललय ? नाव काय ? व इतर अशी माहिती जी माहितच नाही. ते जाणून घेण्याची खूप उत्सुकता लागलेली असेल. तर चला मग जाणून घेऊयात सविस्तर. स्न्ज्नाचे पात्र साकारणारया अभिनेत्रीचे नाव आहे रुपाली भोसले. रुपाली भोसले ही प्रसिद्ध अभिनेत्री सोशल मिडीयावर सतत चर्चेत असते. तिचे सोशल मिडीयावर चांगलेच चाहते आहेत. नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेयर करून ती नेहमी चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. मालिकेतल्या अरुंधती इतकीच तीही लोकप्रिय आहे.
अनेकांना हा प्रश्न पडला असेल की तिने या इंडस्ट्रीत कशी काय सुरुवात केली ? तर रुपाली भोसले या अभिनेत्री ने बिग बॉस मराठी मधून तिने पुन्हा सिनेसृष्टीमधे पदार्पण केले आहे. बिग बॉस मधून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. संजना म्हणजेच रुपाली भोसले हिचा पीआर म्हणून अंकित मगर काम बघत होता. त्यामुळे, बिग बॉस मराठीच्या आधीपासूनच त्यांची ओळख होती.
मात्र, या शोच्या दरम्यान त्यांची ओळख मैत्रीमध्ये आणि मैत्री प्रेमामध्ये रूपांतरित झाली. रुपाली सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. कारण ज्याच्यासोबत ती प्रेमात पडलेली आहे, ज्याला डेट करते आहे तोच तिचे मिडिया मधील सगळा पीआर सांभाळत आहे. त्यामुळे मग चर्चेत तर राहणारच ना.
काय झालं आहे, रुपाली भोसले ने अंकित मगरे सोबतची काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल केलेली आहेत. ज्यामध्ये रुपालीने लग्न केल्याचे समोर येत आहे. कारण तिने भांगामध्ये सिंदूर लावलेले आहे. त्यांच्या चाहत्यांना सुद्धा हा आश्चर्यकर्क धक्काच आहे. कुणालाही न सांगता गुपचूप त्यांनी लग्न उरकले अशी चर्चा सध्या इंडस्ट्रीत व सोशल मिडिया वर चाललेली आहे. जर लग्न झालेलं असेल खरच तर त्या दोघांना पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा !…
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.