या मराठमोळया अभिनेत्रीने स्वतःचेच जुने कपडे काढले विकायला, त्यामागील कारण ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

“समाजकार्य” ही एक उत्कृष्ट सेवा आहे. मित्रांनो आपण कित्येकदा पाहतो की बहुतेक उच्चश्रीमंत व प्रतिष्ठित व्यक्ती ह्या गोरगरीब व गरजू व्यक्तींना दानधर्म आवर्जून करतात. कारण आपण प्रत्येकजण या समाजाचे काहीतरी देणं लागतो. बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अनेक सेलिब्रिटीजला आपण आतापर्यंत दानधर्म करताना पाहिले आहे. यासाठी ते लोक बहुतेकदा अगदी स्वतःचे जुने कपडे विकतात व त्यातून येणारा निधी हा समाजकार्यात वापरतात.

अभिनेत्री अनुष्का शर्मा, दीपिका पादुकोण, आलिया भट्ट यांनी तर अगदी आपल्या कपाटातील वस्तू देखील लिलावात काढल्या आहेत. तर आता आपल्या मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री सई लोकुर हिने देखील स्वतःचे कपडे विकण्याचा निर्णय घेतला आहे.

See also  खळखळून हसवणारे जेष्ठ मराठी अभिनेते विजय कदम यांची पत्नी देखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री, नाव जाणून थक्क व्हाल!

download

या विशेष कामासाठी तिने खास एक सोशल मीडियावर पेज सुद्धा सुरु केले आहे. या पेजवर ती आपल्या कपड्यांविषयी सर्व माहिती देते. तसेच हे सर्व कपडे विकून येणारी रक्कम ती अनाथाश्रमाला देणार असल्याचे सांगते.

अभिनेत्री सई लोकुर हिला तुम्ही ओळखतां ना….”मिशन चॅम्पियन” या हिंदी चित्रपटातून आपल्या करियरची सुरुवात करणारी अभिनेत्री सई लोकुर ही बिग बॉस मराठीमुळे सर्वाधिक जास्त लोकप्रिय झाली. त्याचप्रमाणे काही महिन्यांपूर्वीच “सनम हॉटलाइन” या वेबसिरीज मध्ये देखील ती दिसली होती. यामध्ये सई प्रमुख भूमिका साकारताना आपल्याला दिसली. तसेच या वेबसिरीज मध्ये बिग बॉस मराठी मधील तिचा सह स्पर्धक अभिनेता – मित्र पुष्कर जोग हा देखील यामध्ये होता.

तर मित्रांनो तुम्ही जर अभिनेत्री सई लोकुर हिचे सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम अकाउंट पाहिले, तर तुम्हांला तिच्या या कपडे विक्रीची संपूर्ण माहिती नक्कीच उपलब्ध होईल. अतिशय सोप्या व सरळ भाषेत तिने आपल्या या कपडे विक्रीच्या कार्याची माहिती दिली आहे.

See also  बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वाचा विजेता विशाल निकम लवकरच अडकणार विवाहबंधनात, पाहा कोण आहे होणारी पत्नी...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment