अभिनेत्री प्रेमात झाली दंग ! “जीव झाला येडापिसा” मधील शर्वरी जोग या अभिनेत्यावर करते प्रेम…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रहो अलीकडे प्रेमाचा आणि प्रेमात पडलेल्या प्रेमवीरांचा लग्नबेडीत अडकण्याचा विशेष सिझन सुरू आहे. त्यामुळे याबाबतीत अनेक कलाकार सोशल मीडियावर खूप चर्चेत येत आहेत. पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवणारे हे कलाकार सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असतात, त्यामुळे त्यांच्या आयुष्यात काय काय सुरू आहे हे त्यांच्या चाहत्यांना सहज कळते. तसेच मालिका क्षेत्रातील कलाकार देखील चर्चेत नेहमीच येत असतात. मित्रहो अशीच एक मालिका जिने छोट्या पडद्यावर मोठी धमाल केली आहे.

“जीव झाला येडापिसा” मालिकेतील शर्वरीने सोशल मीडियावर चाहत्यांना थक्क केले आहे, एरवी आपल्या प्रेमाची कबुली देताना कलाकार मंडळी तयार होत नाहीत मात्र शर्वरीने तिचे प्रेम सर्वत्र जाहीर केले आहे. ही मालिका सध्या सुरू नसली तरीही मालिकेची जादू मात्र सगळीकडे पसरली आहे. या मालिकेतील कलाकारांचा अभिनय विशेष गाजला आहे, मालिकेत शिवा आणि सिद्धी यांची केमिस्ट्री भरपूर गाजली आहे. यांच्या सोबतच मालिकेत शिवाच्या भूमिकेत सोनी म्हणजेच अभिनेत्री शर्वरी ही दिसली होती.

See also  या प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्याचा भी'ष'ण अ'प'घा'त, अभिनेत्याची भावनिक पोस्ट व्हायरल...

शर्वरीने सोनीची भूमिका खूपच सुंदर निभावली आहे, तिने या भूमिकेत आपला अभिनय उत्तम पार पाडला आहे. शर्वरी भूमिकेत जितकी गोंडस आणि निरागस मनाची आहे तितकीच ती खऱ्या आयुष्यात देखील सुंदर मनाची आहे. तिचा साधेपणा खूपच छान वाटतो, आपले मत ती नेहमीच परखडपणे मांडते. नुकताच तिने आपल्या प्रेमाची थेट कबुली दिली आहे, गेली अनेक दिवस तिचे नाव गौरव मालवणकर सोबत जोडले जात होते. आता तिने सुद्धा त्याच्या सोबत येऊ फोटो शेअर करत आम्ही रिलेशनशिप मध्ये आहोत असे जाहीर केले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ते दोघे रिलेशनशिप मध्ये होते, ते दोघेही एकमेकांना डेट करत होते. याआधी त्या दोघांना खूपदा सार्वजनिक ठिकाणी पाहण्यात आले होते. गौरव हा देखील एक प्रसिद्ध अभिनेता आहे, मालिका विश्वात तो विशेष सक्रिय आहे. गौरवने “फुलपाखरू” या गाजलेल्या मालिकेत काम केले होते. शर्वरीने ” जीव झाला येडापिसा” मालिकेत काम केले होते, तसेच तिने “विधिलिखित” या वेबसिरीज मध्ये देखील काम केले होते. शर्वरी ही मूळची कोल्हापूरची आहे. लहानपणापासून तिला अभिनयाची खूप आवड आहे.

See also  अप्रतिम...! 'वाय'चा खास शो आयोजित करून मुलीच्या नामकरणाचा सोहळा पार पडला... नाव ठेवलं अस की...

या दोघांची जोडी सोशल मीडियावर खूप चर्चेत येत आहे, दोघांनाही त्यांच्या रिलेशनशिप साठी शुभेच्छा देत आहेत. त्यांना नेहमी अशीच लोकप्रियता मिळत राहो ही सदिच्छा. सोशल मीडियावर, पडद्यावर त्यांच्या अनेक भूमिका भेटीस येत राहो. अभिनयाची झलक प्रत्येक वेळी नव्याने रसिकांच्या भेटीस येत राहो. गौरव आणि शर्वरी दोघांच्याही भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Datta Pawar

Datta Pawar

Leave a Comment