काही दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने पतीच्या मदतीने सुरु केले नास्ता सेंटर, नाव ऐकून थक्क व्हाल!
आपण असच म्हणतो की कधी कुणावर काय वेळ येईल ते सांगता येत नाही. आणि खरच अशी वेळ कधीही कुणावर ही येऊ नये. आणि आलीच तरी तेवढं समजून उमजून घेणारं समोरचं कुणी आपलं हवं.
लॉ’क डा’ऊ’न दरम्यान मराठी सृष्टीतील अनेक कलाकार विवाहबंधनात अडकलेली पाहायला मिळाली. ‘संगीत देवबाभळी’ या संगीत नाटकातील आवलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री “शुभांगी सदावर्ते” देखील संगीतकार असलेल्या आनंद ओक यांच्यासोबत ११ जुलै रोजी विवाहबद्ध झाली होती. संगीत देवबाभळी या नाटकातील तिच्या भूमिकेला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. या नाटकाला आनंद ओक यांनी संगीत दिलं आहे . सवित्रीजोती या मालिकेतूनही शुभांगीने अभिनय साकारला आहे.
मराठी मनोरंजन क्षेत्रातील संगीत दिग्दर्शक आणि प्रसिद्ध अभिनेत्री ने नुकतंच लग्न केलं असून त्यांनी लॉ’क डा’ऊ’न काळात सुरू केलेल्या व्यवसायाबद्दल सर्वत्र फार चर्चा चालू आहे. आता त्यांनी काय केलं ? असा आपल्याला प्रश्न पडलेला असेल; पण त्याचं उत्तर ऐकल्यावर आपल्याला ही वाटेल की कामात कसलीच ला’ज बीज नसते. त्यांनी श्रीपाद न्याहारी सेंटर सूरु केलेलं आहे. त्या दोन जोडप्याचं नाव आहे, आनंद ओक आणि शुभांगी सदावर्ती.
शुभांगी ला आपण अनेक मालिकेतून तसेच नाटकातून पहिलच असेल. तिचं लॉक डाऊन आधी देवबाभळी हे नाटक चांगलंच गाजत होतं. ज्यामध्ये तिला अनेक पुरस्कार ही मिळालेले आहेत. यावर त्यांचं काय मत आहे , चला पाहुयात..
श्रीपाद फूड्स ‘न्याहारी’ या आमच्या नाश्ता सेंटरची आज सुरुवात झाली. मुळात आम्ही नवरा बायको दोघेही कलाकार.लॉ’क डा’ऊ’नमधे लग्न केलं. कामं ठप्प झाली. घरगुती लाडू, पिठं आणि चटण्या घरपोच देण्याचा छोटेखानी व्यवसाय सुरु केला “श्रीपाद फूड्स” या नावाने. उत्तम प्रतिसाद मिळाला. मग गणपतीत चॉकलेट मोदकांना मागणी आली. नंतर दिवाळी फराळालाही ग्राहकांनी पसंती दिली. दिवाळीतंच मनात आलेली कल्पना म्हणजे नाश्ता सेंटर. आज त्याची सुरुवात झाली.
मुळात सांगण्याची गोष्ट म्हणजे आमच्यावर हे करण्याची वेळ वगैरे आली असं नसून आम्ही दोघे आमच्या आनंदासाठी हा व्यवसाय करत आहोत. कलाकार म्हणून आमच्या दोघांची कामं सांभाळून आम्ही हे करणार आहोत. तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद पाठीशी असू द्या..!!
श्रीपाद फूड्स “न्याहारी” इथे काय काय मिळतं त्याची सुद्धा त्यांनी सोशल मीडियावर माहिती दिलेली आहे. चला पाहुयात की इथं नेमकं काय काय भेटतं.
- पोहे
- आप्पे
- उपमा
- साबूदाणा खिचडी
- भाजणी थालीपीठ
सकाळी ७.३० ते ११ वाजेपर्यंत हे नाष्टा सेंटर चालू असतं.सकाळचा नाश्ता आता श्रीपाद फूड्सच्या न्याहारीचाच..!! अशी त्यांची काही वाक्ये सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांच्या या न्याहारी सेंटरचा पत्ता खालील प्रमाने आहे.
पत्ता- श्रीपाद फूड्स ‘न्याहारी’
सावजी न्यूजपेपर स्टॉल, उमिया अपार्टमेंट, कॅनडा कॉर्नर सिग्नल, शरणपूर रोड, नाशिक.
त्यांनी दोघांनी सुरू केलेल्या नव्या व्यवसायाला खूप शुभेच्छा !….