मराठी अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्या बहिणी दिसतात अतिशय सुंदर, सध्या करतात हे काम…
बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अभिनेत्रींप्रमाणेच आता आपल्या मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री देखील प्रत्येक गोष्टीत अव्वल आहेत. आपल्या मराठी चित्रपटसृष्टीत 1990 च्या दशकात कित्येक अभिनेत्री होऊन गेल्या. यामधील तुमची- आमची सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगांवकर.
अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी आपल्या करियरच्या कारकीर्दीत अप्रतिम अभिनयाने अनेक रसिकांच्या काळजावर अफलातुन जादू केली. त्यांनी भुताचा भाऊ, गंमत जंमत, हमाल दे धमाल, लपंडाव यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांत काम करून आपल्या भूमिकेने रसिकांच्या मनात स्थान मिळवले आहे.
तुम्हांला माहीत आहे का, अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी मराठी चित्रपटांसोबतच बॉलीवुड इंडस्ट्रीतील हिंदी चित्रपटांत सुद्धा काम करून स्वतःचे एक अनोखे अस्तित्व निर्माण केले. हिंदी सिनेसृष्टीत तिरंगा, हस्ती, दूध का कर्ज, परवाने, घर आया मेरा परदेशी अशा अनके चित्रपटांत काम केले आहे. वर्षा उसगांवकर यांनी आपल्या अभिनयाने व नखशिखांत सौंदर्याने तमाम मराठी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
मराठमोळ्या सौंदर्याची बात ही काही औरच असते ना मित्रांनो… म्हणून तर आपल्या वर्षा उसगांवकर या वयाची पन्नाशी ओलांडल्यावर देखील अजूनही अत्यंत सुंदर व तरुण दिसतात. त्या आता आपल्याला चित्रपटांत दिसत नसल्या तरीही “मराठी तारका” या कार्यक्रमातून त्या आपली नृत्याची आवङ जोपासताना दिसतात. तसेच “सुख म्हणजे नक्की काय असतं” या मालिकेतून आपल्याला त्यांच्या अभिनयाचे दर्शन होत आहे.
अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बहुतेक लोकांना माहीत नाही. वर्षा यांना तोषा आणि मनिषा ह्या दोन बहिणी आहेत. या दोघीही वर्षा यांच्याप्रमाणेच सुंदर दिसतात. परंतु त्यांनी सिनेसृष्टी व्यतिरिक्त स्वतःचे करियर निवडले आहे. तोषा कुराङे ही ङॉक्टर आहे. गोव्यात ती लॅबोरेटरी आणि मेडिकल सेंटर चालवतात. तर दुसरी बहीण मनिषा ही गोव्यातच माइनस्केप मिनरल्स, तारकर ब्रदर्स या कंपनीचे काम सांभाळते.
अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी अजय शर्मा सोबत लग्न करून आपला संसार थाटला आहे. अजय शर्मा यांचे पूर्ण कुटुंब संगीत क्षेत्राशी संबंधित आहे. तसेच वर्षा उसगांवकर यांचे वडील एक नामांकित राजकारणी होते. 1980- 90 च्या काळात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणार्या वर्षा उसगांवकर यांना आजही आपल्या मराठी सिनेसृष्टीत त्यांचे चाहते खूप पसंद करतात.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.