या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रींनी अर्ध्यातुन सोडल्या लोकप्रिय मालिका, या अभिनेत्रीने तर मालिकेतून…
मराठी मालिका या खूप लोकप्रिय होत असतात. त्या मराठी प्रेक्षकांना खुप आवडतात. मराठी मालिका ला मिळणारा प्रेक्षक हा खूप भरभरून असतो. कारण मालिका या लोकांच्या आवडीच्या असतात. सध्या अनेक चॅनेल वर अनेक मालिका चालू आहेत. सोनी मराठी, झी मराठी, स्टार प्रवाह अस ही आहे. त्यामध्ये अगबाई सासूबाई, आई माझी काळबाई, लागीर अश्या अनेक मालिका येऊन गेलेल्या आहेत. काही मालिका अजूनही चालू आहेत.
आता मालिका आल्या तर त्यात काम करणाऱ्या अभिनेत्री अभिनेते पण आलेच. तर या मालिकेत अनेक प्रसिद्ध अश्या कलाकारांनी काम केलेलं आहे. पण एका प्रसिद्धी च्या क्षणापर्यंत जाण्यासाठी तयार असताना त्यांनी मालिका सोडल्या. आता त्या का आणि कुणी आणि कोणत्या मालिकेसाठी हे सगळं जाणून घेऊयात.
मालिकांमध्ये भूमिका करणाऱ्या अभिनेत्री किंवा अभिनेत्यांनी ती मालिका सोडून जाणे, हे काही नवे काही. काही कलाकार स्वत:हून काही कारणास्तव मालिका सोडतात तर काहींना काढून टाकलं जातं. मराठीतील लोकप्रिय मालिकांमधून कोणकोणत्या कलाकारांनी मध्येच काढता पाय घेतला, ते पाहुयात…
एक प्रसिद्ध अभिनेत्री जी शिव ची ठाकरे गर्लफ्रेंड म्हणून ही ओळखली जाणारी वीणा जगताप – ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेत आर्याची भूमिका साकारणारी वीणा जगतापने मालिका मध्येच सोडली आहे. यावेळी वीणाने वैयक्तिक कारण दिलं आहे. अभिनेत्री रश्मी अनपट आता मालिकेत ‘आर्या’ची भूमिका साकारणार आहे. आता जास्त वेळा बदल झाल्यामुळे आता ते पात्र कितपत आवडेल हेही पाहावं लागेल.
वाद काय झाला होता माहितेय का ? प्राजक्ता गायकवाड – मालिकेतील सहकलाकारासोबत झालेल्या वादानंतर अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने ‘आई माझी काळुबाई’ ही मालिका मध्येच सोडली. या मालिकेवरून बराच वाद झाला होता. तरी आता तरी वाद होऊ नये आणि कलाकार बदलू नयेत अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.
दुसरी एक अभिनेत्री आहे जीचं नाव आहे किरण ढाणे. ती – ‘लागीरं झालं जी’ या लोकप्रिय मालिकेत जयडीची भूमिका साकारणारी आहे. तर किरण हिने मध्यातच मालिका सोडली. किरणने मानधन वाढवण्याची मागणी केली होती पण ती निर्मात्यांना अमान्य होती. आणि मग काय तिला तिच्या कामाचा प्रवास थांबवावा लागला.
दुसरी एक चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. ती म्हणजे इशा केसकर. तिने ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत शनायाची भूमिका साकारणारी इशा केसकर हिनेसुद्धा मालिका मध्येच सोडली. यावेळी इशाने काही वैयक्तिक कारणं दिली होती. आता खरे कारणे बाहेर येत नाहीत पण तिने सोडली हे मात्र खूप लवकर बाहेर माध्यमात पसरलं.
संजय मोने- ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेच्या शीर्षकगीताचं शूटिंग संजय मोनेंसोबत केलं होतं. मात्र जेव्हा मालिका प्रसारित झाली तेव्हा त्यांच्या जागी गौतम जोगळेकर पाहायला मिळाले. या अचानक बदलाचं कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
शिवानी सुर्वे- ‘देवयानी’ या लोकप्रिय मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी शिवानी हिने मालिका मध्यातच सोडली. शूटिंग शेड्युलवरून निर्मात्यांशी झालेल्या वादानंतर शिवानीने ही मालिका सोडली होती.
अभिनेत्री प्रसिद्ध होण्याच्या शिखरावर असताना मालिका सोडणं हेही एका प्रकारे चुकीचेच आहे. म्हणजे हातचा चांगला चान्स जातो ना. आता पुढील अभिनेत्री कोण हेही जाणून घेऊयात.
रसिका धबडगावकर – ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत शनायाची भूमिका साकारणारी रसिका धबडगावकर हिनेसुद्धा मालिका मध्येच सोडली. चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शन शिकण्यासाठी रसिका परदेशी गेली होती. त्यामुळे तिने ही मालिका सोडली होती. मालिकेच्या सुरुवातीला अभिनेत्री रसिका सुनीलने शनाया हे पात्र साकारले होते. तिची ही भूमिका विशेष गाजली होती. त्यांनतर शनायची भूमिका अभिनेत्री इशा केसकरने साकरली. पण काही कारणास्तव इशाने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा मालिकेत रसिकाची एण्ट्री झाली.
दिपाली पानसरे- ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत संजनाची भूमिका साकारणारी दिपाली हिने करोनाच्या पार्श्वभूमीवर मालिका मध्येच सोडली. करोनाचा प्रादुर्भाव असताना शूटिंग करण्याची रिस्क नको, असं सांगत तिने मालिका सोडली.
तेजश्री प्रधान – ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत शुभ्राची भूमिका साकारणारी तेजश्री प्रधान हिनेसुद्धा मालिका सोडली. ‘अग्गंबाई सूनबाई’ हा ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेचा नवा सीजन आहे. तेजश्री लवकरच रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. ‘बबलू बॅचरल’ या चित्रपटात तेजश्री अभिनेता शर्मन जोशीसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.
तर या होत्या प्रसिद्ध अश्या अभिनेत्री ज्यांनी टीआरपी च्या शिखरावर असणाऱ्या मालिका सोडल्या. आता त्यांच्या आयुष्यात फार काही घडत नाही तस ही. तरी चाहते मात्र खूप नाराज झाले होते. कारण अचानक त्या पात्राच्या जागी आपण दुसरे पात्र कसं पाहणार. सवय झालेली असताना. तरी या सर्व अभिनेत्रीना पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.