‘देवमाणूस’ फेम सोनाली पाटील दिसणार मराठी बिगबॉसमध्ये? हे कलाकार दिसू शकतात बिग बॉस मराठी 3 ऱ्या पर्वात…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

सध्या मराठी मनोरंजन क्षेत्रात बिग बॉस मराठी पर्व 3 रे खूप चर्चेत आहे. त्याचा ग्रँड प्रीमियर शो काल कलर्स मराठी वाहिनीवर टेलिकास्ट झाला. महेश मांजरेकर हे रियालिटी शो चे सुटर्स करणार आहेत. त्यापूर्वी अनेकांना असा प्रश्न पडला होता की या पर्वात नेमकं किती जण व कोण कोण असणार आहेत. तर तेही आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

वैजू नंबर वन या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी आधी टिकटॉक स्टार असणारी सोनाली पाटील बिग बॉस सीझन 3 मध्ये दिसणार आहे. तिने देवमाणूस या मालिकेत वकिली भूमिका केली होती. ती मूळची कोल्हापूर ची आहे.

See also  'आई कुठे काय करते' मालिकेतील हि प्रसिद्ध अभिनेत्री सोडणार मालिका? साकारायची महत्वाची भूमिका...

लावणी क्वीन म्हणून ज्यांची ओळख आहे त्या सुरेखा कुडची यांची बिग बॉस मराठी च्या 3 ऱ्या पर्वात दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक चित्रपटात लावणी साकारलेली आहे. ज्या खूप गाजल्या आहेत. देवयानी, रुंजी, नवरी मिळे नवऱ्याला या मालिकेत सुद्धा तिने काम केलेले आहे.

शिवलीला ताई कीर्तनकार या सुद्धा बिग बॉस च्या घरात दिसणार आहेत, असे म्हंटले जात आहे. त्यांनी महाराष्ट्र भर कमी वयात कीर्तन सेवा केलेली आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात शिवलीला ताई यांचे कीर्तन पोहकले आहे.

तृप्ती देसाई या भूमाता ब्रिगेड च्या अध्यक्षा आहेत. ज्यांना आपण पाहतच आलेलो आहोत. त्या सुद्धा बिग बॉस च्या घरात दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तृप्ती देसाई यांची साऱ्या महाराष्ट्र भर कायम चर्चा असते.

See also  “आई कुठे काय करते” मधील अरुंधतीच्या खऱ्या आयुष्यातील नवरा करतो हे काम, जाणून थक्क व्हाल!

चिनमय उदगीरकर हा अभिनेता तर सर्वांना माहीतच असेल. अगबाई सुनबाई या मालिकेत त्याने खूप उत्तम भूमिका साकारलेली आहे. आता तो बिग बॉस च्या दिसणार असं म्हंटल जात आहे.

त्याच सोबत इतर अनेक कलाकार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाहुयात आता की नेमके कोणते कोणते कलाकार बिग बॉस च्या 3 ऱ्या पर्वात दिसणार आहेत. त्यांना पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment