मराठी मालिकेमध्ये लोकप्रिय झालेल्या कलाकारांचं शिक्षण काय आहे! महितेय?
.
कलाकार आणि शिक्षण या दोन गोष्टी नेहमी चर्चेत असतात. प्रेक्षकांना त्या जाणून घेण्याबाबत खूप उत्सुकता असते. आपण ज्या व्यक्तीला टिव्हीत पाहतो त्याचं आयुष्य कसं आहे ? त्याचं शिक्षण कुठं व किती झालं ?
त्याचे आईवडील काय करतात ? घर कुठे आहे ? गाड्या किती आहेत वगैरे वगैरे. मराठी, हिंदी आणि इतर सर्व भाषेतल्या कलाकार हे आपापल्या प्रेक्षकांनसाठी प्रेरणादायी बनलेले असतात. प्रेक्षकांना ही कलाकार लोकांसारखं आयुष्य जगायची भुरळ पडलेली असते. मराठी मालिका बाबत तर हे खूप लागू पडतं.
महाराष्ट्र मध्ये मराठी टीव्ही कलाकार आणि त्यांच्या मालिका या खूप लोकप्रिय आहेत. प्रत्येकाच्या घरामध्ये आवडत्या मालिकांचा रिपीट एपिसोड सुद्धा पाहिला जातो. मनोरंजन क्षेत्र इतकं आकर्षण निर्माण करणारं आहे की इथे मोहकता वाढल्याशिवाय राहत नाही.
मराठीतल्या अनेक अश्या मालिका आहेत की त्यातील लोकप्रिय कलाकार यांचं आयुष्य जाणून घेण्याची प्रेक्षकांना सवयच लागलेली आहे. यामध्ये असं सासर सुरेख बाई, का रे दुरावा, अगग बाई सासूबाई, बाळू मामाच्या नावानं चांगभलं, छत्रपती संभाजी, राजा राणीची जोडी, सारख्या अश्या अनेक मालिका सध्या आपापल्या चॅनेल्स वर लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत.
शशांक केतकर याला तर तुम्ही ओळखत असलाच. ” काहीह श्री मधला श्री जो घराघरात पोचला आहे. त्यानं इंजिनिअरिंग पूर्ण करून मास्टर ऑफ इंजिनिअरिंग याचं परदेशात शिक्षण घेतलेलं आहे.
मृणाल दुसनिस ही मूळची नाशिक ची. तिनं तिचं मास्टर मास कम्युनिकेशन मध्ये केलेलं आहे. यामध्ये पत्रकारिता तिचं स्पेशल आहे. माझ्या नवऱ्याची बायको या लोकप्रिय मालिकेमधला उत्तम अभिनेता आणि उत्तम सूत्र संचालक अशी ओळख असेलेला अभिजित खांडकेकर मास मीडिया चा विद्यार्थी आहे. यासोबत त्याने रेडिओ जॉकी चं काहीवेळ काम सुद्धा केलेलं आहे.
अग बाई सासूबाई मधली शुभरा म्हणजेच लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिचं शिक्षण मुंबईच्या डोंबिवलीत झालेलं आहे. ती बीएससी पदवीधर आहे. अनेक तरुणींच्या गळ्यातला ताईत असलेला लाडका हँडसम अभिनेता ललित प्रभाकर हा देखील बीएस्सी पदवीधर आहे.
याशिवाय त्यानं काही काळ वकिलाचा सुद्धा अभ्यास केला होता. तो अनेक गोष्टी मध्ये पारंगत असलेला अभिनेता आहे. या लॉकडाउन च्या काळात सुद्धा त्याची कलाकारी अदा थांबली नाही. त्याच्या सोशल मीडियावर त्यानं हॉरर सिरीज चे काही एपिसोड घरच्या घरीच अभिनित करून बनवले होते.
सोशल मीडियावर अनेक अभिनेते अभिनेत्री या नेहमी कोणत्या ना कोणत्या मार्गाने चर्चेत असतात. पण यामध्ये सध्या जी आपल्या ग्लॅमरस लुक मुळे चर्चेत आहे ती अभिनेत्री म्हणजेच रसिका सुनील ती संगीत विशारद आहे. तसेच ती सध्या परदेशात अभिनयाचं शिक्षण ही घेत आहे.
बाळू मामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत लोकप्रिय झालेला अभिनेता सुमित पुसवळे हा हॉटेल म्यानेजमेंट चा विद्यार्थी होता. जर मी अभिनय क्षेत्रात करियर केलं नसतं तर मी एखादं हॉटेल चालवलं असतं असंही तो म्हणतो. अनेक कलाकार असे आहेत की ज्यांची खरी आवड अभिनय अशीच होती पण शिक्षण घेऊन मग याकडे पूर्णवेळ देऊन या क्षेत्रात आपला ठसा उमटवलेला आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.