अल्पकालावधीतच लोकप्रिय झालेली मालिका ‘चंद्र आहे साक्षीला’ का बरं झाली बंद? कारण ऐकून थक्क व्हाल!
सध्या मनोरंजन क्षेत्रात असं झालं आहे की लोकांना लिमिट मध्ये गरज जेवढी तेवढच पाहायला आवडतं. म्हणजे सध्याच्या मराठी मालिका पाहिल्या तर एकीकडे असं लक्षात येईल की विषय पार ओढून ताढुन दाखवला जातो. प्रेक्षकांनाअक्षरशः वी’ट येतो पाहायला. आणि दुसरीकडे काही अल्पवधीतच काही मालिका आपला विषय मांडून मोकळ्या होतात. तर नेमकं अश्या मालिका कोणत्या ?
तर सध्याच्या काळात कलर्स मराठी वाहिनीवर एक मालिका लॉ’क डा’उ’न काळात आली आणि गरज होती तेवढी कथा दाखवून संपली सुद्धा. तर त्या मालिकेचं नाव आहे चंद्र आहे साक्षीला. होय, तर या मालिकेत अनेक पात्र आपली उत्तम भूमिका साकारत होते. एकंदरीत आपण जरा सविस्तर माहिती घेऊयात.
महाराष्ट्र प्रेक्षकांची लाडकी वाहिनी कलर्स मराठी वाहिनीवरील ” चंद्र आहे साक्षीला” या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. चिन्मय मांडलेकर यांचे कथानक असलेल्या या मालिकेचा पहिला भाग ११ नोव्हेंबर २०२० रोजी प्रसारित झाला होता तर १७ एप्रिल २०२१ रोजी या मालिकेचा शेवटचा भाग टेलिकास्ट केला गेला. लोकांना खूप कमी काळात ही मालिका चांगलीच आवडली होती. त्यात ट्विस्ट आणि टर्न होते खूप.
मालिका मध्ये रोज काही न काही नवं घडत होती. इंटरेस्टिंग घटना. साधारण पाच महिन्यांच्या कालावधीत या मालिकेने प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळवले अर्थात सुबोध भावे, आस्ताद काळे, ऋतुजा बागवे, उमा सरदेशमुख, नक्षत्रा मेढेकर यांच्या सहजसुंदर अभिनयाने ही मालिका अधिकच रंगत गेली हे वेगळे सांगायला नको.
मालिकेने निरोप घेतल्यावर सर्व कलाकारांनी एकत्रित येऊन मालिकेच्या आठवणींना उजाळा दिला आणि आपल्या प्रेक्षकांचे आभारही मानले आहेत. सगळे सोशल मीडियावर मालिका बंद होताना खूपच भा’वु’क. झाले आणि आपल्याला परीने व्यक्त होऊ लागले. कारण या 5 ते 6 महिन्यच्या काळात मालिका आणि त्यातील सहकलाकार, टीम यांच्याशी एक ऋणानुबंध जुळलेला असतो.
सध्या एक तर काय झालं आहे टीआरपी वाढवायच्या नादात अनेक मालिका उगाचच र’टा’ळ वाणी कव्हर ही चालतात. आजकाल मालिकांना टीआरपी मिळावा म्हणून मूळ कथेला अनेक फाटे दिलेले दिसतात मग त्यात पाणी घालून कथानक भरकटायला लागले की ती मालिका न पाहावीशी वाटायला लागते.
चंद्र आहे साक्षीला ही मालिका या गोष्टीला अ’प’वा’द ठरणारी आहे मुळात कसलेले कलाकार या मालिकेला लाभल्याने ही मालिका अधिकच खुलून आली होती आणि त्यात विशेष बाब म्हणजे कुठल्याही प्रकारे मालिकेचे कथानक लेखकाने पाणी घालून वाढवले नाही किंवा कथानकाला फाटे दिले नाहीत याचे कौतुक प्रेक्षकांनी न विसरता केलेले दिसून आले.
चिन्मय मांडलेकर म्हंटल की विषय जरा वेगळाच येतो. खूप हटके कलाकार. एक उत्तम लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक. त्याचं काम कधीच थांबलेलं नाही. तो सतत काही न काही करत असतो. मालिका, सिनेमा आणि नाटक हे सतत चालु असतं.
चंद्र आहे साक्षीला दरम्यान काही वेगळ्या गोष्टी ही घडल्या. म्हणजे मधल्या काळात सुबोधचे म्हणजेच तो श्रीधरची भूमिका साकारत असलेल्या व्यक्तिरेखेचे वागणे प्रेक्षकांना खटकलेले दिसले मात्र त्यानंतर हळूहळू या कथेचा उलगडा होत गेला तशी मालिका अधिकच खुलत गेलेली दिसली.
मालिकेच्या मूळ कथानकाची लांबी न वाढवता ती आटोपती घेतली यामुळे प्रेक्षक आता खूपच भा’रा’वू’न गेलेले दिसत आहेत. या मालिकेप्रति तशा प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मिडियावरून प्रेक्षक देताना दिसत आहेत.
श्रीधर, स्वाती, सुमन आणि संग्राम या चार प्रमुख पात्रांभोवती गुरफटलेली ही मालिका आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार नसली तरी त्याची गोड आठवण कायम रसिकांच्या स्मरणात राहील आणि यापुढेही अशाच स्वरूपाच्या मालिका प्रेक्षकांना पाहायला आवडतील अशी जाणीव त्यांनी करून दिली. या मालिकेत झालेलं छोट कथानक सुद्धा किती भावपूर्ण ठरू शकतं हे कळलं.
ही मालिका अनेक सुपरस्टार कलाकारांनी भरलेली होती. लेखक, दिग्दर्शक, निर्माते आणि कलाकार सगळेच तगडे होते. त्यामुळे अशी आठवणी सदैव राहील अशी कलाकृती त्यांनी बनवली. तर त्या सगळ्यांना त्यांच्या पुढील वाटचाली करीता स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
आपले “चंद्र आहे साक्षीला ” या मालिकेचे समालोचन ही मालिके सारखे – सहज-सुंदर आणि थोडक्यात आहे . आवडले
– रवि करंदीकर (पुणे)