सुंदर अभिनेत्री गायिका आर्या आंबेकर बद्दल तुम्हाला या गोष्टी माहित आहेत का ?

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मराठी प्रेक्षक चित्रपट पाहण्यासोबत त्यामधील गाण्यांनवर सुद्धा खूप प्रेम करतो. काही गाणी लग्न सराईत वाजतात. तर काही समारंभात. पण हे तुमच्या समोर मधुर आवाजात घेऊन येणारा कलाकार खुप महत्वाचा असतो. तो नेहमी पडद्या मागे राहून त्याचं काम करत असतो. आज अश्याच पडद्यामागून आपल्या गोड गळ्यानं गाणी गाणारी गायक अभिनेत्री आर्या आंबेकर हिचा आज वाढदिवस आहे. ती सध्याच्या काळातली मराठीतली एक प्रसिद्ध आणि आघाडीची गायक अभिनेत्री आहे.

97121724 247159733193089 179088722197410669 n

तिचा जन्म १६ जून १९९४ ला नागपूर मध्ये झाला. तिला लहानपणी पासूनच गाण्याची खूप आवड होती. मग ती आवड जोपासून तिनं २००८ मध्ये झी मराठी आयोजित सारेगमप लिटिल च्याम्प मध्ये सहभाग घेतला. त्यात इतक्या लहानपणी तिच्या आवाजाची जादू साऱ्या महाराष्ट्र रसिकांनी ऐकली आणि कौतुक केलं.

See also  आपल्या खास मित्राच्या पत्नीच्या प्रेमात पडलाय हे प्रसिद्ध क्रिकेटपटू, नाव ऐकून थक्क व्हाल!

88197191 200965187924726 9153794287697078683 n

तिनं तिचं माध्यमिक शिक्षण नागपूर मधेच घेतलं. पण उच्च शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज मध्ये घेतलं. तिथं सुद्धा महाविद्यालयात शिकत असताना अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात तिनं गाणे गायलेलं आहे. तिचे वडील समीर आंबेकर हे डॉक्टर आहेत तर आई सृष्टी आंबेकर सुद्धा गायक आहे. तिची आज्जी पासून त्यांच्या घरी गायन परंपरेला सुरुवात झाली आहे. झी मराठीच्या सारेगमप च्या कार्यक्रमात ५० कलाकारांना मागे टाकून फायनल पाच मध्ये प्रवेश केला होता.

59639313 124800455389098 3257018513032045250 n

त्या वेळीपासूनच तिचे अनेक चाहते तयार व्हायला लागले होते. नाट्यगीत, भावगीत, भक्ती संगीत, किंवा अजून इतर अनेक प्रकरांमध्ये तिनं अनेक गीतं गायलेली आहेत. “ये मेरे वतन के लोगो, हे मुंबई २६ /११ च्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एका श्रद्धांजली कार्यक्रमात तिनं खूप नाजूक सुरेल आवाजात गायलं होतं.

See also  खडसेंच्या सीडीची वाट पाहतोय, जाणून घ्या राज ठाकरे असं का म्हणाले?

83524945 636598830441748 5593578133042200057 n

माणिक वर्मा स्कॉलरशिप मिळवनारी ती पहिली तरुण गायक आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुकही झालं होतं. ती सध्या काय करते यामधील तिनं गायलेली गाणी आजही मनाला मंत्रमुग्ध करून टाकतात. हे तिचं खूप मोठं यश आहे. वेडिंग चा सिनेमा मध्येही तिनं गायलेलं आहे. टीव्ही सिरीयल मध्ये तुला पाहते रे, दिल दोस्ती, दुनियादारी सारख्या अश्या अनेक मालिकांचे टायटल सॉंग ही तिच्या आवाजात आहे. आर्या सध्या मुंबई मध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमी रसिकांना भेटायला येत आहे. इतक्या कमी वयात जास्त यश मिळवणारी ती मराठीतली एकमेव गायक अभिनेत्री आहे.

आर्या, तुला वाढदिवसाच्या गाण्याचा इतिहास भर शुभेच्छा !..

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment