या फोटोतल्या चिमुरडीला ओळखलं का ? इंडियन आयडॉल या रियालिटी शो मधून ती पोहचली जगभरात…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सध्या मराठीत एक गोड गळ्याची बाल गायिका सर्वांच्या मनावर खूप भुरळ घालत आहे. मराठी रियालिटी शो आणि आता हिंदी मध्ये ही ती आपल्या आवाजाच्या जादूची छाप पाडत आहे. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की कुणाबद्दल नेमकं बोललं जातंय. तर अंजली गायकवाड बद्दल.

Anjali Gaikwad

होय तीच अंजली जिने या बाल वयातच गायन क्षेत्रात अभिमान स्पद कामगिरी केलेली आहे. ए आर रेहमान सुद्धा तिचा फॅन ही खूपच मोठी गोष्ट. ती मूळची अहमदनगर ची आहे. तर जाणून घेऊयात तिच्या बद्दल सविस्तर गोष्टी.

अंजली गायकवाड हिने २०१७ मध्ये पार पडलेल्या सारेगामापा लिटिल चॅम्प्स या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर ती इंडियन आयडॉलच्या १२ व्या सीझनमध्ये सहभागी झाली होती. इंडियन आयडॉलच्या स्पर्धेतील अंजली ही सर्वात कमी वयाची स्पर्धक होती. शास्त्रीय संगीताने सर्वांना भुरळ पाडणारी अंजलीच्या चाहत्यांचा वर्ग देखील मोठा आहे.

See also  फतेशिकस्त चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका करणाऱ्या या अभिनेत्याचं झालं कोरोनाने नि'ध'न...

Anjali Gaikwad

मात्र इंडियन आयडॉलमध्ये झालेल्या एलिमिनेशनमध्ये अंजली स्पर्धेतून बाहेर पडली. त्यानंतर तिच्या चाहत्यांनी या शोच्या निर्मात्यांना खूप ट्रोल देखील केले होते. याआधीही अंजलीने तिच्या बहिणीच्या साथीने ‘झी युवा’ वाहिनीवरील ‘संगीत सम्राट’ या कार्यक्रमात बाजी मारली होती. दरम्यान आता अंजलीने इंस्टाग्रामवर संगीत सम्राट शोमधील काही फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे.

अंजली गायकवाड हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर संगीत सम्राट शोमधील काही फोटो शेअर करत लिहिले की, सर्वांना हॅलो…अचानक अनपेक्षितपणे आजचा दिवस खूप आनंदी ठरला. कारण आई पप्पा टीव्ही पाहत होते आणि चॅनेल बदलता बदलता झी युवा वाहिनी लावली आणि त्यावर दीड तासांचा शो ज्याक आमचा संगीत सम्राटमधील प्रवास रेखाटलेला शो स्वररागिनी नंदिनी अंजली पुनः प्रसारीत करण्यात आला होता. ते पाहून खूपच अप्रतिम वाटले. मी आणि नंदिनी खूप आभारी आहोत.

See also  या नव्याकोऱ्या विनोदी मराठी चित्रपटात प्रथमेश परब झळकलाय चक्क स्त्रीवेषात, जाणून घ्या चित्रपटाबद्दल सविस्तर...

E3N9LveUUAAHkrw

आज या दोघी महाराष्ट्र नव्हे तर देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यात गेलेल्या आहेत. त्यांचा आवाज अनेक जण रोज ऐकत आहेत. कारण त्या मध्ये जादू आहे एका प्रकारची. एवढ्या लहान वयात एवढी कीर्ती. याचं दोघी ही श्रेय सारं त्या वडील यांना देतात.

अंजलीने तिच्या संगीत प्रवासाबद्दल सांगितले होते की,, ‘माझ्या घरातच सुरुवातीपासून संगीतमय वातावरण होते. माझे वडीलच माझे गुरु आहेत. ते घरीच मुलांना गायनाचे धडे देतात. मी तीन वर्षांचे होते, तेव्हापासून संगीत ऐकत आणि समजून घेत होते. माझ्या वडिलांनी माझ्यातील कला ओळखली आणि त्यांनी स्वतःच मला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.

Anjali%2BGaikwad

वडील हेच आपले गुरू असतात. तेच आपल्याला लहानपणी पासून मोठं होईपर्यंत घडवत असतात. अंजली आणि नंदिनी च्या जस त्या दोघींना घडवलं. तिचे वडील गायनाचं गुरुकुल चालवतात. अनेकांना त्यांनी घडवलेलं आहे. अंजली, नंदिनी आणि तिच्या सर्व कुटुंबातील व्यक्तींना स्टार मराठी कडून पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा.

See also  प्रसिद्ध मराठी अभिनेत्री शिवानी रांगोळे पडलीये या मराठी अभिनेत्याच्या प्रेमात, जाणून घ्या कोण आहे तो अभिनेता...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment