मराठमोळा सुपरस्टार अंकुश चौधरी करतोय या क्षेत्रात दमदार पदार्पण, जाणून घ्या सविस्तर…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

अंकुश गेली २५ वर्षे मराठी चित्रपटसृष्टीत कार्यरत असून त्याने ४० हून अधिक चित्रपटांत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ट्रिपल सीट, क्लासमेट अशा अनेक चित्रपटांत अंकुशने काम केले आहे. अभिनय, दिग्दर्शन आणि निर्माता म्हणून त्याचा सिनेक्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य लेट्सफ्लिकला यशाच्या वाटेवर नक्कीच नेईल, याची सर्वांना खात्री वाटते.

अहमदनगर येथील प्रसिद्ध उद्योजक नरेंद्र फिरोदिया आणि इंडिया नेटवर्क चे संस्थापक राहुल नार्वेकर यांनी नुकतीच ‘लेट्सफ्लिक्स मराठी’ या पहिल्या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मची घोषणा केली. या घोषणेपासून मनोरंजन क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे.

या भागीदारी संदर्भात अंकुशला विचारले असता, अंकुश म्हणाला, “मला ‘लेट्सफ्लिक्स मराठी’ ची संकल्पना आवडली आणि जेव्हा नरेंद्र फिरोदिया, राहुल नार्वेकर हे संस्थापक असल्याचे समजले तेव्हा अशा टॅलेंटेड लोकांसोबत काम करणे म्हणजे माझ्यासाठी एक नवीन अनुभव असेल म्हणून मी लगेचच यासाठी सहमती दर्शवली.

See also  कधी काळी पान टपरीवर पान विकायचा हा अभिनेता, आज आहे 'चला हवा येऊ द्या' मधला प्रसिद्ध कलाकार...

मराठी मनोरंजन क्षेत्र झपाट्याने बदलत आहे आणि मराठी आशयासाठी असलेल्या या स्वतंत्र ओटीटी माध्यमाच्या निर्मितीमुळे मराठी कलाकारांना नामी संधी उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे राहुल नार्वेकर आणि नरेंद्र फिरोदिया यांच्यासोबत काम करायला ही मजा येईल, कारण दोघेही आपापल्या क्षेत्रात यशस्वी आहेत आणि आम्ही तिघे मिळून जगभरातील मराठी भाषिक प्रेक्षकांना चांगला मराठी आशय (कंटेंट) देण्यासाठी प्रयत्नशील असू.”

गेल्या काही वर्षांमध्ये, दर्जेदार आशय निर्माण झाल्याने मराठी मनोरंजन क्षेत्र प्रगतीपथावर पोचले आहे. अशातच ‘लेट्सफ्लिक्स मराठी’ च्या येण्याने नवोदित कलाकारांना सुवर्णसंधी मिळणार आहे. यात ओरिजनल मराठी चित्रपट, वेबसिरीज, शॉर्टफिल्म्स, डॉक्युमेंटरीस्, इत्यादी दाखविले जातील. लेट्सफ्लिक्स गुजराती, भोजपुरी, बांगला त्याचप्रमाणे इतर १२ प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे.

See also  "देवमाणूस" मालिकेतील टोन्याच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री खऱ्या आयुष्यात दिसते अशी, पहा तिचे सुंदर फोटो...

अंकुश चौधरीच्या फॅमिली बद्दल सांगायचे झाले तर अंकुशची पत्नी दिपा परब ही देखील त्याच्या मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अंकुशच्या सुखी संसारात तिचीही मोलाची साथ आहे. त्याच्या प्रत्येक गोष्टीत ती खंबीरपणे पाठीशी उभी राहिलेली आहे. अंकुश आणि दिपाने २००७ साली लग्न केले आणि आता त्यांना प्रिन्स नावाचा मुलगा देखील आहे.

अंकुश आणि दिपा यांची लव्ह स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. त्यांनी तब्बल दहा वर्षं एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केले. दिपा आणि अंकुश यांचा २३ नोव्हेंबर २००६ रोजी साखरपुडा पार पडला. अंकुश आणि दिपा हे दोघे मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार असले त्यांनी त्यांचा साखरपुडा त्यांनी सगळ्यांपासून लपवून ठेवला होता. मीडियाला देखील याविषयी अनेक दिवसांनंतर कळले. तर अशा या आपल्या लाडक्या अभिनेत्याला त्याच्या नवीन व्यवसायातील पदार्पणानिमित्ताने हार्दिक शुभेच्छा!

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment