मराठी खलनायिका एका भागासाठी घेतात इतके मानधन…जाणून घ्या मानधनातली रक्कम
मित्रहो मराठी कलाविश्वात अनेक मालिका भरपूर गाजल्या आहेत. शिवाय यातून अनेक अभिनेत्री आणि अभिनेता देखील प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. सोबतच त्यांची भूमिका विशेष आकर्षित करण्यात त्यातील खलनायक आणि खलनायिका यांचा मोठा वाटा असतो. मराठी रंगभूमीवर अनेक खलनायिका गाजल्या आहेत. त्यांच्या सौंदर्याचे आणि अभिनयाचे आजवर खूप कौतुक झाले आहेत. मित्रहो या खलनायिका एका भागासाठी किती मानधन घेतात हे आपण जाणून घेणार आहोत.
स्टार प्रवाह वाहिनीवरील “आई कुठे काय करते” ही मालिका भरपूर लोकप्रिय आहे, मालिकेतील प्रत्येक भूमिका विशेष गाजली आहे. या मालिकेत संजनाची भूमिका अभिनेत्री रुपाली भोसले हिने साकारली आहे. तिची ही भूमिका नकारात्मक जरी असली तरीही प्रचंड लोकप्रिय आहे. तिला एका भागासाठी तब्बल बेचाळीस हजार मिळतात. तसेच मालिका “सुख म्हणजे नक्की काय” ही देखील विशेष प्रसिद्ध आहे. फार कमी वेळात या मालिकेने भरपूर लोकप्रियता मिळवली आहे.
या मालिकेतील प्रत्येक भूमिका खूप प्रसिद्ध झाल्या आहेत, यातील शालिनीची भूमिका भरपूर गाजली आहे. ही भूमिका अभिनेत्री माधवी साकारत आहे. तिने या भूमिकेसाठी अगदी जीव ओतून मेहनत घेतली आहे. ती एका भागासाठी तब्बल एकोणचाळीस हजार इतके मानधन घेते. तसेच स्टार प्रवाह वरील “रंग माझा वेगळा” ही मालिका देखील विशेष प्रसिद्ध आहे. मालिकेत श्वेताचे पात्र हे नकारात्मक आहे, हे पात्र अभिनेत्री अनघा भगरे हिने साकारले आहे. ती एका भागासाठी जवळपास पंचवीस हजार रुपये मानधन घेते.
तसेच “माझी तुझी रेशीमगाठ” ही मालिका देखील फार वेळेत भरपूर प्रमाणात प्रसिद्ध झाली आहे. यामधील सिम्मीची भूमिका देखील खूप लोकप्रिय झाली आहे. अभिनेत्री शीतल श्री सागर हिने ही भूमिका पार पाडली आहे. एका भागासाठी ती तब्बल अठरा हजार इतके मानधन घेते. “तू तेव्हा तशी” मालिकेत पुष्पवल्लीची भूमिका भरपूर प्रसिद्ध होत आहे, ही भूमिका अभिनेत्री अभिज्ञा भावे हिने साकारली आहे. ती एका भागासाठी अठ्ठावीस हजार इतके मानधन घेते. तसेच “मन उडू उडू झालं” ही मालिका सुद्धा प्रचंड लोकप्रिय होत आहे.
या मालिकेत सानिका देखील नकारात्मक भूमिका विशेष गाजली आहे. ही भूमिका रिना अग्रवाल हिने साकारली आहे. ती एका भागासाठी अकरा हजार इतके मानधन घेते. “सहकुटुंब सहपरिवार” मालिकेत आशा ही भूमिका देखील नकारात्मक आहे. ही भूमिका अभिनेत्री किशोरी हिने साकारली आहे. ती एका भागासाठी जवळपास एकोणीस हजार इतके मानधन घेते. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.