स्वतःच डाळिंबाची लागवड करून हा मराठी तरुण कमावतोय लाखो रुपये, जाणून घ्या काय आहे त्याच्या यशाचे रहस्य…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

महाराष्ट्राच्या स्वप्निल शिवाजी माळी या मराठी तरुणाची ही यशोगाथा. कृषी विज्ञान शाखेतील शिक्षण संपवून स्वप्नील ने पूर्णवेळ शेती करण्याचे निश्चित केले. आज तो नवीन युक्त्या आणि तंत्राच्या सहाय्याने डाळिंबाच्या शेतीतून लाखो रुपये कमवत आहे.

महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील हातदी गावच्या स्वप्निलने कृषी शास्त्राचा अभ्यास पूर्ण केल्यावर फळबाग लावण्याचा निर्णय घेतला. त्याने सुमारे दीड एकरात डाळिंबची ४५० झाडे लावली. सुरुवातीला स्थानिक बाजारात त्याच्या डाळिंबांना प्रति किलो ७० ते८० रुपये दराने पैसे मिळू लागले.

nargranat1

हळूहळू त्याला जाणवले की कठोर परिश्रम करूनही आपल्या पिकांना बाजारात योग्य भाव मिळत नाही. त्यानंतर त्याने अनारदाना, जूस, सरबत आणि जेली यासारख्या उत्पादनांची निर्मिती करण्याचे ठरविले.

स्वप्नीलने स्वतः मशीन तयार करून डाळिंब दाणे (अनारदाना) प्रोसेसिंग युनिटची स्थापना केली. दररोज २ टन क्षमतेचे हे युनिट आहे. यात त्यांनी डाळिंबाचे फळ फोडून ज्युस, डाळिंबाचे दाणे, सरबत, जेली अशा निरनिराळे उत्पादने बनवून गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि बिहार राज्यांच्या वेगवेगळ्या भागात पाठवून दिली.

See also  इलेक्ट्रिकल इंजिनिअर चिकू प्रक्रिया करुन कमावतोय तब्बल १ कोटी रुपये, ४ आउटलेट आणि २१ प्रकारची उत्पादने जाणून थक्क व्हाल!

स्वप्निल आज २५ वर्षांचा आहे. वयाच्या १८ व्या वर्षापासून शेती करीत आहे. शिक्षण घेत असतानाही त्याचे शेतीतील वेगवेगळे प्रयोग सुरूच होते. आधीपासूनच स्वप्नीलचे शेतीत मन रमत होते. डाळिंबासह, वांगी, ढोबळी मिरची इ. ची लागवडही तो करायचा.

WhatsApp Image 2020 08 22 at 7.33.41 AM

कॉलेजला असतांना स्वप्निल जेंव्हा, मित्रांसोबत फिरण्यासाठी गेला होता, त्यावेळी एके ठिकाणी काजू फो-ड-ण्याचे मशीन त्याच्या पाहण्यात आले. हे मशीन पाहून स्वप्नीलनेही अशा प्रकारचे मशीन बनवण्याचा विचार पक्का केला. मग त्याने काजू फोडण्याच्या मशीन सारखीच डाळिंब फोडून डाळिंबाचे दाणे काढण्यासाठी एक मशीन बनविली. जी मशीन आजही वापरली जात आहे. या मशीनचा स्वप्नीलला फार फायदा झाला. या मशीन मुळे हाताने डाळिंब फो-ड-ताना वाया जाणार बराचसा भाग वाचला. त्यामुळे वेस्टज कमी होऊन, उत्पादनाचे प्रमाण वाढले.

आपल्या वर्कशॉप मध्ये स्वप्निल स्वत:च्या मशीननेच डाळिंब फळप्रक्रिया करतो. मशीनमध्ये दोन कटिंग ब्लेड आणि जाळ्या आहेत. ब्लेड डाळिंब फोडते. फोडल्यानंतर डाळिंबाचे दाणे जाळीमधून खाली पडून वेगळे होतात. या प्रक्रियेदरम्यान डाळिंबाचा रस देखील बाहेर येतो, जो इतर काही उत्पादनांत वापरला जातो. या मशीनमध्ये काही भाग खराब झालेल्या डाळिंबाचाही सहज वापर होऊन चांगले असणारे डाळिंबदाणे उत्पादनात वापरता येतात.

See also  तैमूर पेक्षाही खूपच सुंदर आणि क्युट आहे राणी मुखर्जीची मुलगी, तिचे फोटो पाहून थक्क व्हाल!

61KCQLAizLL

सूर्यप्रकाश किंवा मशीन अंतर्गत असलेल्या हिटिंग लाईट मधे दाणे कोरडे झाल्यानंतर ते पॅक केले जातात. डाळिंब दाणे कोरडे करून मग विक्री करण्याचा फायदा हा आहे की, ते बराच काळ खराब होत नाहीत. कच्चे फळ कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवणे आवश्यक आहे, परंतु दाण्यासाठी तसे करण्याची गरज नाही. दाणे कोरडे झाल्यानंतर ते कमीतकमी चार ते पाच महिन्यांपर्यंत खराब होत नाहीत.

हे डाळिंब दाणे नंतर डाळिंबाचे लोणचे, डाळिंब चाट मसाला, हाजमोला यासारखी उत्पादने तयार करण्यासाठी वापरण्यात येतात. हे मशीन बनवण्यासाठी स्वप्नीलला अडीच लाख रुपये खर्च आल्याचे स्वप्नील सांगतो. इतर शेतकऱ्यांनीही मशीनचा वापर केलेला आहे.

मशीन आणि हाताने डाळिंब तोडण्यातील फरक स्पष्ट करताना स्वप्निल म्हणाला की, हाताने आम्ही दिवसात चार ते पाच हजार फळे फोडायचो, परंतु मशीनने हेच प्रमाण दुप्पट होऊन आता दररोज डाळिंबाचे आठ ते नऊ हजार फळे फोडून त्यावर प्रक्रिया होते. साहजिकच त्यामुळे जेव्हा आम्ही हाताने डाळिंब फोडायचो तेव्हा महिन्याची कमाई जवळपास २५०००/- हजार होती. यंत्राच्या वापरामुळे तीच आता दरमहा ५००००/- रुपयांची होते.

See also  "तारक मेहता..." मधील जेठालालची पत्नी आहे दया भाभींपेक्षाही आहे खूपच सुंदर आणि बोल्ड, फोटो पाहून थक्क व्हाल

डाळिंब प्रक्रिया चक्र वर्षातून दोनदा फिरते. डाळिंबा शिवाय स्वप्निल आता शेवग्याचीही लागवड करून उत्पादन घेत आहे. स्वप्निलसारख्या तरुणाचा हा प्रवास शेतकऱ्यांसाठी खरोखरच खूप प्रेरक ठरेल यात शंकाच नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment