मराठमोळा अभिनेता विराजस कुलकर्णी याने “या” अभिनेत्रीसोबत गुपचूप उरकला साखरपुडा, पाहा त्यांचे हे फोटोज्

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे हे दोघेही बर्याच कालावधीपासून एकमेकांना ङेट करत आहेत. मात्र आता या दोघांनीही सोशल मीडियावर एक सुंदर फोटो शेयर करत आपल्या नात्याची कबुली दिली आहे. त्यांचा हा फोटो पाहून त्या दोघांनीही गुपचूप साखरपुडा उरकल्याचे समजत आहे. मात्र या कपलने अजूनपर्यंत तरी साखरपुडा केलेला नाही.

शिवानी आणि विराजस यांनी गुरुवारी आपल्या इन्स्टाग्राम हँङलवर दोघांचाही एक फोटो शेयर केला होता. त्यामध्ये शिवानी च्या हातात अंगठी दिसत होती. फोटो शेयर करत त्यांनी कॅप्शन मध्ये लिहिले होते की, “अंगठी घातली”. त्यासोबतच त्यांनी #2022 आणि #virani असे हॅशटॅग सुद्धा वापरले होते.

See also  प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरेचे घर आहे खूपच आलिशान, पहा तिच्या घराचे मनमोहक फोटो...

271269461 1287466818431976 6130843118066351983 n

शिवानी व विराजस यांच्या या पोस्ट नंतर चाहत्यांनी त्यांच्यावर भरघोस शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. चाहत्यांसोबत अनेक कलाकार आणि त्यांच्या मित्रमंडळीनी सुद्धा त्यांना शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. शिवानी आणि विराजस यांनी गुपचूप पद्धतीने साखरपुडा उरकला असून त्यासंदर्भात सोशल मीडियावर घोषणा केली, असे सर्वांना वाटले. मात्र नुकत्याच एका मुलाखतीमध्ये विराजसने अजूनतरी साखरपुडा झाला नसल्याचे स्पष्टपणे सांगितले.

शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी हे दोघेही एका नाटकाच्या दरम्यान एकमेकांना भेटले होते. तेव्हा शिवानी एका इंग्रजी नाटकात काम करत होती. तर विराजस त्या नाटकाचे दिग्दर्शन करत होता. या नाटकादरम्यान त्या दोघांचीही खूप चांगली मैत्री झाली आणि नंतर त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले.

हे कपल सोशल मीडियावर नेहमी आपले फोटोज् शेयर करत असते. परंतु त्यांनी आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. त्याचप्रमाणे सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्या लग्नाच्या वेळी सुद्धा ते दोघे एकत्र दिसले होते. तेव्हापासून यांच्या नात्याची चर्चा रंगू लागली आहे.

See also  "बिग बॉस मराठी 3" होत आहे लवकरच सुरु, हे मराठी कलाकार येणार आपल्या भेटीस...

यांच्या वर्कफ्रंट बद्दल म्हणायचे झाले तर शिवानी रांगोळे ही “सांग तू आहेस का? या मालिकेत शेवटची दिसली होती. तर विराजस कुलकर्णी हा “माझा होशील का?” या मालिकेत शेवटचा दिसला होता. तर लवकरच विराजस एका चित्रपटात दिग्दर्शनाद्वारे पाऊल ठेवणार असल्याचे म्हटले जाते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment