लग्नासाठी मुलाची उंची मुलीपेक्षा जास्त का असावी, त्यामागे आहे हे शास्त्रीय कारण, कारण ऐकून थक्क व्हाल!
साधारणपणे मानवामध्ये नराची उंची ही मादीपेक्षा अधिक असते. पुरूषांची शरीरयष्टी ही स्त्रियांपेक्षा बलवान, मजबूत व कडक असते. भारतामध्ये पुरूषांची सरासरी उंची १६४.९ सेमी (५.४९ फूट) तर स्त्रियांची १५२.६ सेमी (५ फूट) आहे.
एकाच घरातील बहीण भावाच्या उंचीत सुद्धा आपल्याला अर्धा ते एक फूटाचा फरक पहावयास मिळतो. मुलगा व मुलगी समान उंच जरी असले तरी नर-मादी निकषावर मुलगा बुटका ठरतो.
लोकांची उंची, वजन व बुद्धीमत्ता या ढोबळ मानाने घंटेच्या आकारात (बेल शेप) मध्ये बसतात. अमेरिकेत पूर्ण वाढ झालेल्या पुरुषांची सरासरी उंची १७७.८ सेमी ( १०.६ च्या डेविएशन बरोबर) आहे तर स्त्रिया १६५.१ सेमी ( ८.९ च्या डेविएशन बरोबर) आहे. भारतातील पुरुष- स्त्री उंचीचे नॉर्मल डिस्ट्रिब्युशन सुद्धा जवळपास असेच दिसेल.
अमेरिकेतील पुरुष व स्त्रियांच्या उंचीचा नॉर्मल डिस्ट्रिब्युशन कर्व
समाजात जोडप्याच्या रंग, उंची, शरीरयष्टी, आवाज, डोळे व नाक यांतील फरक हा चेष्टेचा विषय असल्याने असे विवाह टाळले जातात. शिवाय मुलींंचीसुद्धा मुलाबद्दलची अपेक्षा मुलगा उंच असावा अशीच असते.
उत्क्रांतीचा विचार केल्यास हे लक्षात येईल की, मादी नेहमी जोडीदाराची निवड तो गर्दी मध्ये उठुन दिसणारा, तिचे व होणाऱ्या मुलांचे संरक्षण करणारा, काळजी घेणारा असावा असे निकष ठेवते. (Survival of the strongest)
जास्त उंची म्हणजे पुरुष हा जनुकीय पातळीवर सशक्त व त्यापासून होणारी मुले ही जास्त उंची असणारी व सशक्त होय. आजच्या काळात हा निकष पैसा व समाजातील स्थान यांच्या प्रभावामुळे कमी झाला असला तरी पुर्णतः नाहीसा झालेला नाही.
भारतीय समाजात जोड म्हणजे उंच नवरा व नवऱ्यापेक्षा कमी उंचीची बायको ही मानसिकता आहे. आपली बायको आपल्या पेक्षा उंच असेल तर लोक आपल्याला हसतील किंवा बायको बरोबर भांडण झाल्यास ती आपल्याला उंचीवरुन टोमणे मारेल या भितीमुळे मुलगा व त्याचे नातेवाईक मुलीच्या उंचीकडे ‘विशेष’ लक्ष देतात. शिवाय सहा फूट व त्यापेक्षा जास्त उंची असणाऱ्या मुलाला उंच मुलगी लग्नासाठी महाराष्ट्रात/भारतात शोधणे म्हणजे जंगलात वाघ शोधण्यासारखे आहे.
थोडक्यात सांगायचे झाले तर शास्त्रीय कारणामुळे लग्न करताना मुलगा व मुलगी यांच्या उंचीतील फरक मानसिकता व परंपरेच्या तराजूत तोलला जातो.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.