‘माझा होशील ना’ मध्ये डेडली व्हिलन “जेडी” ची एन्ट्री, प्रथमच या रुपात दिसणार हा सुप्रसिद्ध मराठी अभिनेता…
मित्रांनो! झी मराठी वाहिनीवर अत्यंत अल्पावधीत मराठी मालिका रसिकांची वाहवा मिळवून लोकप्रिय झालेल्या सई-आदित्य आणि त्याच्या चार मामांच्या सुखी आयुष्यात मिठाचा खडा टाकण्यासाठी आता एक अत्यंत, कपटी, बेरकी आणि क्रू’र असा हा खलनायक सं’क’ट बनून येणार आहे.
सोशल मीडियावरील ‘माझा होशील ना’ मालिकेच्या फॅन्स मध्ये हीच चर्चा रंगलीय की, या मालिकेत आता होणार आहे खलनायकाची एंट्री, आणि विशेष म्हणजे “हा” अभिनेता पहिल्यांदाच अभिनेता साकारणार अशी हटके भूमिका… चला तर मग, जाणून घेऊयात.
‘माझा होशील ना’ ही मालिका दिवसेंदिवस रंजक आणि रसिकांची लाडकी मालिका बनत चालली आहे. सुरुवातीपासून रंजक वळणामुळे रसिकही मालिकेला खिळून आहेत. दिवसेंदिवस मालिका आणखी रंजक होत आहे. मालिकेतील सगळीच पात्र रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली आहेत. नुकतेच मालिकेत आदित्य आणि सई लग्नबंधनात अडकल्याचे पाहायला मिळाले.
लग्नानंतर मात्र सई आणि आदित्यच्या जीवनात दररोज काही ना काही घडामोडी घडत आहेत. आत्ताच कुठे यांचा संसार सुरु झाला आहे. मात्र आता आदित्य आणि सई यांच्यात दुरावा निर्माण करण्यासाठी या मालिकेत लवकरच एक खलनायकाची एंट्री होणार आहे. आणि मालिकेत हा डे’ड’ली खलनायक साकारणारा अभिनेता कोण? याचीही उत्सुकता चांगलीच रंगत आहे.
अत्यंत कपटी, बेरकी आणि क्रू’र असा हा खलनायक आदित्य-सईच्या आयुष्यात संकट बनून येणार आहे.मराठी-हिंदी मनोरंजन विश्वातला प्रसिद्ध अभिनेता अतुल परचुरे पहिल्यांदाच खलनायकाच्या रुपात दिसणार आहे. आतापर्यंत कॉमेडी अंदाजात अतुल परचुरेला पाहिलंय, मात्र आता पहिल्यांदाच तो खलनायकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार म्हटल्यावर उत्सुकता वाढली आहे.
माझा होशील ना… या मालिकेत विराजस आणि गौतमीसोबतच विनय येडेकर, निखिल रत्नपारखी, सुनील तावडे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. यात अतुल परचुरेची एंट्री रसिकांचे कितपत मनोरंजन करणार हे पाहणेही रंजक असणार आहे.
मित्रांनो!, या मालिकेचे आणखी एक वैशिष्ट्य सांगावयाचे म्हंटले तर, मालिकेचा सेट हे कलाकारांसाठी दुसरे घरच बनतं, मालिकेतील कलाकारांमध्ये इतके खेळीमेळीचे वातावणर निर्माण होते की, सगळे सणवार, वाढदिवस इथेच साजरे केले जातात.
“माझा होशील ना” मालिकेत आणखी एक हटके गोष्ट पाहायला मिळते ते म्हणजे, ‘माझा होशील ना’ या मालिकेच्या सेटवरचं सर्व कलाकारांसाठी जेवणाची सोय करण्यात आली आहे. अगदी घराच्याप्रमाणे सगळेच सेटवर एकत्र जेवतात. घरगुती पद्धतीने सेटवर जेवण बनवलं जातं अशी कदाचित ही पहिली मालिका असावी. सुप्रसिद्ध अभिनेते श्री. अतुल परचुरेंना या नवीन रोल साठी टीम स्टार मराठीच्या हार्दिक शुभेच्छा!!!
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.