मायासाठी वेडा झालेला गुरुनाथ रात्रभर पावसात का भिजतो? बरं तो भिजलेला पाहून माया त्याला…पहा ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या प्रसिद्ध मराठी मालिकेला आलेलं नवं वळण..

.

सध्या लॉकडाऊन असल्याने कुटुंबांचे सगळे सदस्य घरी बसून मनोरंजन कार्यक्रम बघण्यात व्यस्त असताना दिसून येत आहे. त्यात महाराष्ट्रात मराठी सिरीयल घराघरात चाललेली असते.

सध्याही झी मराठी वाहिनीवर संध्याकाळी लागणारी ‘ माझ्या नवऱ्याची बायको ’ ही सिरीयल खूप चाललेली आहे. त्या सिरीयलचा विषय लॉक डाऊन नंतर जास्त चर्चेत यायला लागला आहे. तो म्हणजे गुरुनाथ आणि राधिका यांचं वादविवाद प्रकरण काही थांबायचं नाव घेत नाही आहे.

कालच्या एपिसोड पाहिला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की गुरुनाथ अन्ही राधिका एकमेकांबद्दल आरोप प्रत्यारोप करण्यात किती अग्रेसर राहू लागलेले आहे. ३१ ऑगस्टच्या एपिसोड मध्ये सांगितल्या दाखविल्या प्रमाणे माया सौमित्र च्या काही गोष्टी गुरुनाथ ला सांगते. मग गुरुनाथ ला राधीकावर संशय येतो. यात माया त्यांना काही मदत करतेय का ? यावरून त्या दोघांचे ही वाद होतात. आता १ ऑगस्टच्या एपिसोड मध्ये नेमकं काय झालं ? ते पाहूयात.

राधीकाचे ही सौमित्र च्या कंपनीत आपली कंपनी सामील करून घेण्याचं नियोजन चालू असतं. ती श्रेयसला पेपर बनवायला सांगते. कारण तिला सौमित्र च्या कंपनीत तिची राधिका मसाले ही कंपनी मिक्स करायची असते. हे सगळं राधिका का करते ? तर मायाने तिला एक अट घातलेली असते. की जर तू तुझी कंपनी सौमित्र च्या कंपनीत मिक्स केली नाहीतर मी सौमित्र चे अश्लील फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करेल. त्यामुळे मायाचा धोका टाळण्यासाठी राधिका हा निर्णय घेते.

तिला हे करन फार जड जातं पण तिचं मन म्हणतं की आपल्याला जेव्हा गरज होती तेव्हा सौमित्रच मदतीला धावुन आला. तर आता त्याला मायाच्या जाळ्यातून वाचविनं हे तिचं कर्त्यव्य आहे. एवढं सगळं घडत असताना तिला जेनी आणि श्रेयस खूप समजावून सांगतात की तुम्ही एवढे कष्ट करून एवढी मोठी कंपनी कष्टाने साकारली. जर ती अश्या मार्गाने डुबणार असेल तर तिला वाचवा. पण कर्त्यव्य पुढं हे काहीच नाही. पण जेव्हा सौमित्रला हे कळतं तेव्हा तो या गोष्टीला साफ नकार देतो. कारण त्याला यांचे भविष्याचे परिणाम माहित असतात.

पण राधिका कुणाचच ऐकत नाही. ती तिच्या मतावर नेहमीसारखं ठाम राहते. इकडे शनाया गुरुनाथ ला नॉर्मल वागताना पाहून आश्चर्यचकित होते. तिला वाटलेलं असतं की आज गुरुनाथ ची ऑफिस मध्ये प्रचंड कामाने लागलेली असेल. पण गुरुनाथ घरी आल्यावर खूप नॉर्मल म्हणजे काही घडलेलं नाहीच असं वागतो. “ आज ऑफिस मध्ये काही घडलं का ? शनाया च्या प्रश्नावर गुरुनाथ फक्त नाही असचं उत्तर देतो.

परंतु तिच्या प्रश्नाने गुरुनाथ विचार करायला भाग पडतो. गुरुनाथ ला संशय येतो.तो तिच्या आईला राधिका आणि शनाया या दोघी भेटतात का ? असं विचारतो. पण गुरुनाथ ची आई काही सांगत नाही. गुरुनाथ विचारात पडतो.  पुढे असं होतं की राधिका शनायाला घरी घेऊन जाते. आणि गुरुनाथच्या सासू सोबत पुरयाच्या वड्या खातात. त्या दोघी आनंदाने गप्पा मारतात.

राधिकाची सासू शनाया ला खूप टोमणे मारते. पण दिवसेंदिवस शनाया आता बदललेली असते. त्यामुळे ती लक्ष देत नाही. तिकडे गुरुनाथ त्याची समस्या घेऊन केडी कडे जातो. केडी त्याला सांगतो की तू मायाच्या घराखाली जावून आमरण उपोषण कर तुझं प्रेम जागं होईल.

माया तुला माफ करेल. गुरुनाथ कडे ही पर्याय नसल्याने तोहो मायाच्या घराखाली जावून आमरण उपोषण करतो. हे माया पाहते. माया तिथे येते. ‘ मला ह्या गोष्टीचा काहीही फरक पडणार नाही. तूला जे करायचं कर. असं माया रागात गुरुनाथ ला म्हणते.

त्याला टेन्शन येतं. की कधी मायेच्या मनाला प्रेमाचा पाझर फुटेल. इकडं शनाया आईला घाईत बोलून जाते की आज मी माश्यांची डीश खाल्ली. तेव्हा तिच्या आईला वाटतं की ही राधिका ला तर नाही भेटत. तसं आई तिला विचारते. पण त्या बाईचं माझ्यासमोर नाव सुद्धा काढू नको अस आव आणून बोलते.

तिची आई अजून संभ्रमात पडते. की नेमकं चाललय काय ? राधिका आणि शनाया जर भेटल्या आणि त्यांनी गुरुनाथ ची वाट लावली तर तिला येणारे पैसे बंद होतील या चिंतेने ती ग्रासली जाते.

इकडं गुरुनाथ काही घरी येत नाही. तो रात्रभर पावसात भिजून मायाच्या माफी पोटी थांबलेला असतो. जेव्हा हे चित्र माया पाहते तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू येतात. ती गुरुनाथ ला तिच्या घरी घेऊन जाते. त्याची मलपपट्टी करते. काढा देते. त्याचं वेळी नेहमीप्रमाणे गुरुनाथ संधी हेरून तिला आपल्या जाळ्यात ओढतो. माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे.

काहीही करायला तयार आहे. तू फ़क़्त सांग अश्या ठरलेल्या वाक्यांनी तो मायाच्या त्याच्या विषयीचा राग कमी करतो. गुरुनाथ शेवटी तिचं मन जिंकतो. आणि माया गुरुनाथ ला अश्या प्रकारे माफ करून टाकते. इथेच आजचा एपिसोड संपतो. आता पुढे उदयाच्या एपिसोड मध्ये पाहूयात की आता नेमकं काय होतं ?

Leave a Comment