“एक चतुर नार..” गाण्यातील प्रसिद्ध असलेल्या मेहमूदच्या मुलाला बघितलं का…? दिसतो खूपच देखणा..
मित्रहो कलाकार हे आपल्या कलेसाठी खूप ओळखले जातात, त्यांच्या अंगातील गुण हे त्यांना रसिकांच्या हृदयात वर्षानुवर्षे राहण्याची सोय करत असतात. काहीवेळा त्यांच्या काही खास भूमिका, गाणी किंवा आणखी काही गोष्टी इतक्या लोकप्रिय होतात की त्यांना विसरणे हे प्रेक्षकांसाठी अतिशय कठीण होऊन जातं आणि मग प्रत्येकाच्या मनात त्यांचे एक अढळ स्थान निर्माण होते. मित्रहो असेच एक गाणे ज्याने आजदेखील लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले असून प्रत्येकाच्या ओठांवर हे गाणे सतत असतेच. हे गाणे पाहिले की प्रसिद्ध अभिनेता महमूद यांची आठवण आपोआप येतेच.
सिनेसृष्टीत अभिनेता, लेखक, निर्माता, दिग्दर्शक आणि सोबतच उत्कृष्ट गायक म्हणून मेहमूदची खास प्रसिद्धी आहे. आजवर बॉलिवूडला त्यांनी एका पेक्षा एक चित्रपट बहाल केले आहेत, यामधील अनेक गाजलेल्या चित्रपटात “पडोसन” हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची क्रेझ आजदेखील आभाळ गाठते. आज सुद्धा लोक हा चित्रपट खूप आवडीने पाहतात, या चित्रपटातील भूमिका, गाणी, अभिनय, कलाकार, घटना अगदी सर्वकाही लक्षवेधी ठरले आहे.
सोबतच “सबसे बडा रुपय्या” ,”अंदाज अपना अपना”, “आँखे” ,”ससुराल प्यासा” ,”दिल तेरा दिवाना” ,”जिद्दी” यांसारखे अनेक चित्रपट त्यांनी हिट केले आहेत. इतकेच नव्हे तर त्यांची अनेक गाणी सुद्धा प्रचंड लोकप्रिय झाली आहेत, या गाण्याचे बोल इतके मधुर आणि ओठांवर रेंगाळणारे आहेत की ते आपण कधीच विसरू शकणार नाही. मित्रहो अभिनेता मेहमूद जितके प्रसिद्ध आहेत, तितकाच त्यांचा मुलगा देखील लोकप्रिय आहे. अलीकडे महमूद यांच्या मोठ्या मुलाचा फोटो खूप व्हायरल होत आहे.
त्यांच्या मुलाचे नाव लकी आहे, तो एक खूप मोठा गायक आहे. इंडस्ट्री मध्ये खूपशा मोठ्या नावांमध्ये त्याचेही नाव गणले जाते. “एक पल का जिना” , “कितनी हसीं जिंदगी” , “ओ सनम” , “ना तुम जानो ना हम” , “नशा-नशा” , “क्यो चलती है पवन” यांसारख्या अनेक लोकप्रिय गाण्यात त्याचा आवाज सहभागी आहे. ही गाणी आपण सर्वांनी ऐकली आहेतच, यांचे बोल,सूर खूपच मधुर आहेत आणि यामध्ये लकीचा आवाज अगदी अमृत वाटत आहे. लकीचे वैशिष्ट्य असे आहे की त्याने आपले करिअर मोठे बनवण्यासाठी कधीच आपल्या वडिलांच्या नावाचा वापर केला नाही.
मेहमूद आणि लकी यांच्या नात्यात नेहमीच दुरावा राहिला आहे, लकी लहानपणापासून बोर्डिंग मध्ये शिकायला होता. त्याने “ओ सनम” या गाण्याने आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्याने खूप मेहनत घेतली आहे, १९९७ मध्ये स्वातंत्र्याच्या ५० वर्षाच्या स्मरणार्थ मेरी जान हिंदुस्थान अल्बममध्ये “अंजनी राहो में” गाण्यात त्याच्याही आवाज आहे आणि या गाण्याचे योगदान त्यालाच दिले जाते. मित्रहो लकी हा हुबेहूब त्याच्या वाडीलांसारखे उत्कृष्ट गायन करतो. त्याच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.