या मालिकेच्या शूटिंग दरम्यान सापडला एक को-रो-ना पॉझिटिव्ह, मालिकेच्या प्रोड्युसरवर…
.
अनलॉक प्रक्रिया आता देशभर सुरू झाली आहे. सरकारने हळूहळू सर्व क्षेत्रे उघडण्यास सुरूवात केली आहे. आवश्यक असलेल्या मार्गदर्शक सूचनांसह शूटिंग पुन्हा सुरू करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारने दिले होते. टेलिव्हिजन कार्यक्रमांचे शूटिंग सुरु होऊन आता दोन आठवड्यांहून अधिक काळ झाला आहे.
त्याचवेळी शोच्या निर्मात्यांनीही काळजीपूर्वक सर्व सूचनांचे पालन करत सिरियल्सचे शूटिंग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. पण यादरम्यान ‘मेरे साई’ या शोच्या सेटवर क्रू मेंबर को-रो-ना पॉ-झि-टि-व्ह आढळला आहे. त्यानंतर, तात्काळ निर्मात्यांनी शोचे शूटिंग थांबविण्याचा निर्णय घेतला. शोच्या संपूर्ण टीमला काही दिवस घरी स्वतःला क्वारंटाइन व्हायला सांगितले गेले आहे.
एन्टरटेन्मेंट पोर्टल पिंकविलाच्या वृत्तानुसार, ‘मेरे साई’ या मालिकेचे निर्माते नितीन वैद्य म्हणाले की, आमच्या टीममधील एक सदस्य को-रो-ना पॉ-झि-टि-व्ह असल्याचे आढळले आहे. सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आम्ही ८ जुलै पर्यंत या कार्यक्रमाचे शूटिंग थांबवले आहे.
पॉ-झि-टि-व्ह आढळलेली व्यक्ती सेटवर हजर नव्हती. त्या व्यक्तीच्या सर्व चाचणी व्यवस्थित घेण्यात आल्या आहेत आणि आता तिला क्वारंटाइन फेसिलिटीमध्ये दाखल केले आहे. त्या व्यक्तीचे तापमान आणि ऑक्सिजन पातळी सामान्य आहे.
ते पुढे म्हणाले की मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व आवश्यक गाइडलाइन्स लागू केली गेली आहे. मालिकेच्या सेटला पूर्णपणे निर्जंतुकीकरण केले गेले आहे. शोचे कलाकार आणि क्रू मेंबर ठीक आहेत.
त्यांचा को-रो-ना पॉ-झि-टि-व्ह व्यक्तीशी संपर्क झाला नाही. आम्ही जबाबदार क्रू सदस्यांसह काम करतो याचा आम्हाला आनंद आहे. जे या संवेदनशील आजाराला समजतात. प्रत्येक परिस्थितीत त्यांना सपोर्ट करणे हे आमचे उद्दीष्ट आहे. टेलिव्हिजन सेटवर हा को-रो-ना पॉ-झि-टि-व्ह आढळल्याचा हा पहिलाच प्रकार आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.