या पाच देशांमध्ये काही महिने रात्रच होत नाही, कारण ऐकून थक्क व्हाल!

.

आपला देश जीवन जगण्यासाठी इतरांपेक्षा खुप अनुकूल आहे. इथे चोवीस तासातला अर्धी रात्र आणि अर्धा दिवस आहे. सगळे ऋतू आपापल्या वेळेत येतात. पण काही देशातील परिस्थिती थोडी वेगळी आहे.

तुम्ही कधी असा विचार केलाय का ? की पूर्ण चोवीस तास रात्रच आहे. सूर्य काही महिने पाहायलाच मिळत नाहीये. किंवा दिवसच संपत नाही. तर हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.

जगात असे काही देश आहेत ज्यामध्ये काही महिने रात्रच होत नाही. सूर्य मावळतच नाही. तर काही देशामध्ये कायम रात्र पाहायला मिळते. तिथे सूर्याचं दर्शन सुद्धा होत नाही. हे सगळं तो प्रदेश जगाच्या नकाशावर कुठे आहे ? यावर अवलंबून असतं. आज आपण अश्याच देशाबद्दल काही आश्चर्यायुक्त माहिती जाणुन घेणार आहोत. जी फारशी कुणाला परिचित नाही.

यामध्ये युरोपियन देश बऱ्यापैकी आढळुन येतात. नॉर्वे हा एक युरोप मधील सुंदर देश आहे. जगातील अनेक लोक इथे फिरायला येत असतात. इथलं पर्यटन खूप पाहण्याजोगी आहे. हा देश जंगल वेढा आहे. चौहू बाजूनी जंगल प्रचंड वाढलेलं आहे.

या देशामध्ये मे पासून जुलै पर्यंत तब्बल सत्तर दिवस सूर्य हटत नाही. रात्रीचा संबंध येत नाही. काही प्रदेश तर चार महिन्यापर्यंत सूर्यास्त पाहायला मिळत नाही. हे अदभुत सौन्दर्य पाहायला जगातील अनेक माणसं या काळात येत असतात.

दुसरा देश आहे कॅनडा. तिथल्या काही प्रदेशात तर पन्नास दिवस सूर्यास्त होत नाही. सगळा देश आधीच बर्फयुक्त असतो. थंडी प्रचंड प्रमाणात असते. तिथले रोड सुद्धा खूप सुंदर आहेत. ज्यांना अश्या ठिकाणची आवड असते ते भेट देतात.

ज्याला पाहताच क्षणी डोळ्यांचे पारणे फिटतील असा देश आहे आईसलँड. ग्रेट ब्रिटन नंतत सर्वात सुंदर देश. निसर्गाच्या पैलूंने भरलेला हा देश स्वप्नातल्या स्वर्गा पेक्षाही कमी नाहीये. मे ते जुलै इथे रात्र होत नाही.

चौथा देश खूप वेगळा आहे. स्वीडन हा आपल्या सगळ्यांच्या परिचित असेल. या देशाचा तीस टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. इथे मध्यरात्री सूर्य उगवतो. काही प्रमाणत दिसतो. मग पुन्हा पहाटे सगळा उगवतो. या देशावर चौदा आयलंड आहेत. हे खुप सुंदरतेमुळे फेमस आहेत.

पाचवा आणि शेवटचा देश म्हणजे फिनलंड. इथे पर्यटकांची नेहमी गर्दी असतात. इथलं वातावरण हे खुप थंड आणि बर्फाळ आहे. उन्हाळ्यात तर इथे एक महिना सूर्यास्त होत नाही. इथे जाणारा प्रत्येक जण देशाच्या प्रेमातच पडेल.

एकदा तरी अश्या अदभुत देशात फिरून यायलाच हवं. कारण इथे गेल्यावर आयुष्य जगल्यासारखं वाटणार नाही. म्हणजेच वेळ कसा गेला कळणार नाही. जसं प्रेमात पडल्यावर वेळ कळत नाही अगदी तसच.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment