‘मिर्झापूर 2’ मध्ये कालीन भैय्याच्या बायकोची भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे तरी कोण? चित्रपटात काम करण्यासाठी…

सध्या एक अभिनेत्री खूप चर्चेत येत आहे. तिला खूप कामे मिळत आहेत. ज्यात तिचं काम रसिकांना भुरळ घालत आहे. त्या अभिनेत्री बाबत आपण आज सविस्तर जाणून घेऊयात. जिने मिरझापुर 1 आणि 2 दोन्हीही सिझन मध्ये खूप उत्तम भूमिका साकारली आहे. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की ती कोण ?

आपण वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेब सीरिज आणि चित्रपट पाहिल्यास अभिनेत्री रसिका दुग्गल गेल्या काही काळामध्ये सतत काम करताना दिसत आहे. अल्पावधीतच ती रसिका प्रेक्षकांचा एक परिचित चेहरा बनली आहे. तिच्या अथक परिश्रम घेऊन केलेल्या अभिनयाची पडद्यावर चांगली पसंती आहे. प्रत्येक भूमिका ती खुप वेगळया पध्दतीने अभ्यास रित्या साकारत आहे.

झारखंडच्या जमशेदपूर येथील रहिवासी असलेल्या रसिकाचा जन्म 1985 साली झाला होता.  2004 मध्ये त्यांनी लेडी श्री राम कॉलेज ऑफ वुमन, दिल्ली येथून विज्ञान शाखेत पदवी मिळविली.

READ  अभिनेत्री नर्गिसच्या प्रेमात वे'डे झाले होते प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता राज कपूर, पण अभिनेत्री नर्गिसने...

यानंतर रसिकाने सोफिया पॉलिटेक्निकमधून पदव्युत्तर पदविका हा कोर्स केला. अभिनयाची आवड तिला लहानपणी पासूनच होती. मग तिने पुण्यातील एफटीआयआयमधून अभिनयात पदव्युत्तर डिप्लोमा केला. जिथं खरं तिला अभिनयाचं सगळं शिक्षण मिळालं.

रसिका दुग्गलने करिअरची सुरुवात वर्ष 2007 मध्ये बॉलिवूड चित्रपटापासून केली होती. अनवर या चित्रपटात तिने एक पात्र साकारले होते.  2008 साली तिनी ‘प्यास’ हा चित्रपटही केला. तिने टीव्हीएफच्या वेब सीरिज परमानेंट रूममेट्स सीझन 2 मध्ये कॅमिओचा रोल केला होता.

यानंतर, टीव्हीएफने आणखी एक मालिका मध्ये देखील तिला काम देऊ केले. तिच्यासोबत कॉमेडियन विपुल गोयल देखील होते. तेव्हापासून तिने जो अभिनयाचा ठसा उमटवला, तो आता यशाच्या शिखरावर येऊन थांबलेला.

2017 मध्ये रिलीज झालेल्या तू है मेरा अश्या या नावाच्या चित्रपटातही तिने एक कॅमिओचा रोल केला होता. या चित्रपटात बरुण सोबती, विशाल मल्होत्रा, सहाना गोस्वामी, नकुला भल्ला, अविनाश तिवारी आणि जय उपाध्याय मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय रसिका औरंगजेब, किस, मंटो आणि लूटकेस या चित्रपटांमध्ये दिसली आहे.

READ  या बॉलीवूड खलनायकांच्या पत्नी आहेत खूपच सुंदर, या खलनायकाची पत्नी तर आहे ही तरुण मुलगी, नाव ऐकून थक्क व्हाल!

तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर रसिकाने अभिनेता मुकुल चड्ढाशी लग्न केलेलं आहे. लग्नानंतरही तो सतत चित्रपट आणि वेब मालिकांमध्ये व्यस्त असतो. रसिका दुग्गलचे इन्स्टाग्रामवर लाखो चाहते आहेत. ती सोशल मीडियावर बऱ्याच प्रमाणात कार्यरत असते.

मिरझापुर वेबसिरिज सिझन 2 मध्ये तिने केलेली भूमिका खूप गाजत आहे . लोकप्रिय होत आहे. कालीन भैय्या ची बायको म्हणून लोकप्रिय झालेली अभिनेत्री रसिका दूगगल ला पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

READ  विराट कोहली नंतर या प्रसिद्ध भारतीय क्रिकेटरच्या घरी येणार पाहून, नाव ऐकून थक्क व्हाल!

Leave a Comment