‘मिरझापुर – २’ मधील हा लोकप्रिय अभिनेता लवकरच अडकणार लग्न बंधनात, पहा कोण आहे त्याची होणारी नवरी…

एखादी वेबसिरीज खुप लोकप्रिय होते. का ? तर त्यातील हिरो हिरोईन मुळे ना. तर याचं उत्तर हो पण त्यासोबत सह कलाकार यांचीही मोलाची भूमिका असते. मिरझापुर ही सिरीज सर्वांनी पाहिली असेल. आणि आवडलेली ही असेल.

त्यासोबत त्यात काम करणारी सर्वच पात्रं मनात कुठेतरी घर करून बसलेली असतीलच. अश्यात रॉबिन म्हणून एक पात्र खूप या वेगळं वाटलं असेल. त्याने ते पात्र खूप उत्तम रित्या साकारलेलं आहे. कुणी साकारलं ? तर चला जाणून घेऊयात.

pjimage 4 1606273409

अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘मिर्झापूर’ या गाजलेल्या वेब सीरिजचा दुसरा भाग अलिकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे ‘मिर्झापूर’प्रमाणेच ‘मिर्झापूर २” या सीरिजलादेखील चाहत्यांनी तुफान प्रतिसाद दिला.

त्यामुळेच या सीरिजमधील प्रत्येक कलाकार सोशल मीडियावर चर्चिले गेले. विशेष म्हणजे सध्या चर्चा रंगली आहे ती या सीरिजमधील एका अभिनेत्याच्या लग्नाची. या सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकलेला अभिनेता लवकरच विवाह गाठ बांधणार असल्याचं सांगण्यात येत आहे. जो अभिनेता लग्न करणार तो म्हणजे रॉबिन !

priyanshu painyuli vandana joshi haldi mehendi pics main mirzapur 2 actor gets married

‘मिर्झापूर’मधील बबलू भैय्या,मुन्नाभैय्या या पात्रांप्रमाणेच आणखी एक पात्र चर्चेत राहिलं ते म्हणजे रॉबिन. आपल्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा रॉबिन अर्थात अभिनेता प्रियांशू पेनयुली हा लवकरच लग्नगाठ बांधणार आहे.

प्रेयसी वंदना जोशी हिच्यासोबत तो लग्न करणार आहे. तसंच करोनाचा काळ असल्यामुळे कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा संपन्न होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. वंदना ही सुद्धा एक सुंदर काम करणारी अभिनेत्री आहे. दोघे आधी रिलेशन मध्ये होते.

Mirzapur Robin 1352037

रॉबिन मोठ्या पडद्यावर हिरो आहे तर वंदना ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून उत्तम नृत्यांगना आहे. यापूर्वी तिने लघुपटांमध्ये काम केलं आहे. दिल से दिया वचन’, ‘सपनों के भवर में’ या मालिकांमध्ये काम केलं आहे.

तर प्रियांशूने मिर्झापूर व्यतिरिक्त हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. तसंच लवकरच तो रश्मी रॉकेटमध्येही झळकणार आहे. दोघांनाही नवजीवनाच्या तेही वैवाहिक जीवनाच्या खूप खूप शुभेच्छा !….

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment