5 स्टार हॉटेलमधून अभिनेता मनोज वाजपेयीची चप्पल चोरणारा हा कूक, आज आहे बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता…
‘मसान’ पासून ‘मि’र्झा’पू’र, ल्युडो, पर्यंत अनेक चित्रपट, व सीरिजमध्ये काम करत आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर सोडणारा अभिनेता पंकज त्रिपाठीचे नाव आता बॉलिवूडमध्ये चांगलंच परिचयाचं झालं आहे. आहे. पण त्यांचा इथपर्यंतचा प्रवास अतिशय खडतर होता. इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करण्यापूर्वी ते एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये तो कूक म्हणून काम करत होता.
द कपिल शर्मा शो मध्ये पंकज त्रिपाठी यांनी हॉटेलमध्ये काम करतानाचा मजेशीर किस्सा सांगितला आहे. ज्या 5 स्टार हॉटेलमध्ये ते काम करत होते तेथे एकदा अभिनेते मनोज वाजपेयी आले होते. पंकज यांना मनोज वाजपेयी यांना भेटायचे होते. पण पंकज त्रिपाठी यांनी असे काही केले की मनोज वाजपेयी यांनी स्वत: त्यांना भेटायला बोलावले.
त्यावेळी मनोज वाजपेयी दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या ‘गँ’ग्ज ऑफ वासेपूर’ या चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. दरम्यान ते पंकज त्रिपाठी काम करत असलेल्या हॉटेलमध्ये राहत होते. मनोज वाजपेयी यांना भेटण्यासाठी पंकज त्रिपाठीने त्यांची चप्पल चो’र’ली होती.
मनोज वाजपेयी रुम बाहेर जाताना चप्पल शोधत होते. त्यांना चप्पल मिळाली नाही. त्यांनी हाउसकिपिंग स्टाफला तेथे बोलावले. तेव्हा पंकज त्रिपाठी यांनी सांगितले की तुम्हाला भेटता यावे म्हणून मी चप्पल चो’र’ली होती. मनोज वाजपेयीने ती चप्पल पंकज त्रिपाठी यांना भेट म्हणून दिली होती.
पूर्वी एक छोट्या रुममध्ये राहणारे पंकज त्रिपाठी आता राहतात मुंबईमधील पॉश एरियामध्ये. आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे पंकज त्रिपाठी. बिहारमधील गोपालगंज या छोट्या गावातून आलेल्या पंकज यांनी आज मायानगरी मुंबईमध्ये स्वत:चे आलिशान घर घेतले आहे.
२०१९मध्ये पंकज त्रिपाठी यांनी मुंबईमधील मड आयलँड येथे घर घेतले. नव्या घरात पूजा करताना पंकज यांनी काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. आता आलिशान घरामध्ये राहणारे पंकज हे पूर्वी कुटुंबासोबत एका छोट्या घरात राहायचे. ते अतिशय गरीब कुटुंबातून आले असल्याचे म्हटले जाते.
अभिनयाचे धडे घेतल्यानंतर पंकज मुंबईमध्ये आले. सुरुवातीला त्यांना राहण्यासाठी मुंबईत घर नव्हते आणि काम देखील मिळत नव्हते. सं’घ’र्षा’च्या दिवसांमध्ये पंकज यांची पत्नी मृदूला त्यांच्यासोबत होती. मृदूला नोकरी करत होत्या. मृदूला यांच्या पगारावर पंकज त्यांचे घर चालायचे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.