एका रिक्षावाल्याची मुलगी बनली मिस इंडिया, मानसा वाराणसीची संघर्षमय कहाणी ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

नुकताच भारतात फेमिना मिस इंडिया 2020 चा ग्रॅण्ड फिनाले अर्थात अंतीम भाग पार पडला, मुंबई या ठिकाणी पार पडलेल्या या मोठ्या कार्यक्रमाला जवळपास देशभरातून अनेक माॅडेल्स आल्या होत्या ज्यांनी मिस इंडियाच्या खिताबासाठी आपली दावेदारी पेश केली.

आणि सर्वांच्या ओठांवर चर्चा रंगलेल्या या खिताबाचा शेवटी मान पटकावला तो म्हणजे, मानसा वाराणसी या महिलेने. मिस इंडिया ब्युटी काॅन्टेस्टमधे तिने अव्वल स्थान मिळवत 2020 सालातील मिस इंडिया होण्याचा मान पटकावला. मानसाबद्दल अनेकांना फार कमी माहिती आहे, आणि काल झालेल्या इव्हेंटनंतर अनेकांना तिच्याबद्दल जाणून साहजिकचं उत्सुकता निर्माण झाली.
l106 2781613142390
हैद्राबाद या ठिकाणी जन्म झालेली मानसा अर्थविषयक बाबीत निपुण आणि जाणकार आहे. आर्थिक माहिती विनिमय विश्लेषक या विषयात तिचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. नुकतीच मिस इंडिया ठरलेली मानसा याआधी मिस तेलंगणा सुद्धा ठरली होती.

See also  त्या रात्री पडलेल्या स्वप्नामुळे सरोज खानने स्वीकारला होता मुस्लिम धर्म, जाणून घ्या कोणते होते ते स्वप्न!
Advertisement

आणि खास बात म्हणजे ती सध्या केवळ 23 वर्षांची आहे. सध्या भारताकडून मिस इंडिया हा खिताब पटकावल्याने तिला जगभरात होणाऱ्या मिस वर्ल्ड या काॅन्टेस्टमधे पार्टिसिपेट करता येणार आहे किंबहुना अर्थातच ती तिथे भारताच प्रतिनिधित्व करताना दिसेल. मानसा सहसा मिडियामधे थेट आणि स्पष्टचं बोलणं पसंत करते.

मानसाच्या आयुष्यात तिची आई, आज्जी, धाकटी बहीण यांची खुप मोलाची साथ आहे. आणि या तीन व्यक्तिमत्त्वांचा मानसावर प्रभाव अधिक आहे. या सर्व गोष्टीव्यतिरिक्त 2000 साली मिस वर्ल्ड मिळवलेल्या भारतीय अभिनेत्री प्रियंका चोपरा हिला ती आपली आयडॉलदेखील मानते.

प्रियंका आज ज्या पद्धतीने तिच्या आयुष्यातील अ’ड’च’णीं’व’र मात करत यशाच्या शिखरावर आहे, ते नक्कीच प्रत्येक प्रत्येक स्त्रीला प्रेरणादायी आहे, असंही मानसा म्हणते.
manasa varanasi13

See also  1990 च्या काळातील सुप्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठक, आता संगीतापासून दूर करतात हे काम...
Advertisement

वसई काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग येथून मानसाने आपली पदवी पूर्ण केली आहे. मानसाला माॅडेलिंग व्यतिरिक्त संगीत, योगा, निसर्ग अशा गोष्टींमधे अधिक रस आहे. आजवरच्या तेलंगणा राज्याच्या इतिहासात मिस इंडिया मिळवणारी ती पहिली व्यक्ती ठरली आहे.

नुकत्याच झालेल्या मिस इंडिया ब्युटी काॅन्टेस्टमधे तिच्यासोबत टॉप 5 मधे ज्या मॉडेल्स होत्या त्यांची नावे काहीशी अशी, मान्या सिंह, मणिका शोकंद, रती हुलजी, खुशी मिश्रा. मिस इंडिया काॅन्टेस्टचे हे आजवरचे 57 वे पर्व होते. फेमिना मिस इंडिया 2020 चा ग्रॅण्ड फिनाले हा मुंबईमधल्या हयात रिजेंसी हॉटेलमधे पार पडला.
Manasa Varanasi 1779037d10b original ratio
को’रो’ना’मु’ळे उ’द्भ’व’ले’ल्या परिस्थितीमुळे या वर्षी पहिल्यांदाच हा काॅन्टेस्ट ऑनलाईन पार पडला होता. या काॅन्टेस्टमधे अभिनेत्री चित्रांगदा सिंह, नेहा धुपिया, वाणी कपुर अभिनेता अपारशक्ती खुराणा, पुलकित सम्राट यांनीदेखील उपस्थिती लावली होती.

See also  साउथच्या या सुपरस्टार अभिनेत्याकडे आहेत 369 गाड्या, एकदा वापरलेली कार पुन्हा नाही वापरात, कारण वाचून थक्क व्हाल!
Advertisement

मिस इंडियाच्या जजेस अर्थात ज्युरी पॅनलमधे चित्रांगदा, नेहा, पुलकित सम्राट, व फाल्गुनी, शेन पिकॉक यांचा सहभाग होता. या सर्वांव्यतिरिक्त बाब म्हणजे, मिस ग्रॅण्ड इंडिया 2020 हा खिताब हरियाणाच्या मणिका शोकंद हिला बहाल करण्यात आला. यामध्ये उत्तर प्रदेशची मान्या सिंह ही 2020 ची रनर अप ठरली.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Advertisement

Leave a Comment

close