धर्मेंद्रने मिथुन चक्रवर्तीकडून मागून “ही” फिल्म सनी देओलला दिली, पुढे घडला तो इतिहास…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

अकरावीनंतर राजकुमार संतोषी शाळा सोडून वडिलांबरोबर सहाय्यक म्हणून काम करायचा कारण सहाय्यक ठेवण्यासाठी त्याच्या वडिलांकडे कडे पैसे नव्हते. पी.एल. संतोषी यांच्या नि’ध’ना’नंतर राजकुमार यांनी विधू विनोद चोपडा आणि गोविंद निहलानी यांच्यासोबत काम केले. राज यांनी गोविंद निहलानी यांच्या पाच चित्रपटात असिस्टंट म्हणून उमेदवारी केली. आता त्याला त्याचा स्वतःचा चित्रपट बनवायचा होता.

कमल हासनला डोक्यात घेऊन त्यांनी एक पटकथा लिहिली. चित्रपटाचे काम सुरू झाले. राज हा गोविंद निहलानी सोबत काम करत होता. हे जेंव्हा एखाद्या निर्मात्याला कळायचे, तेंव्हा त्यांना वाटायचे की आता हा आर्ट फिल्मच बनवेल. त्यामुळे त्यांच्या चित्रपटावर कोणीही पैसे गुंतविण्यास तयार नव्हते. शेवटी, तेलगू प्रोड्युसर पी. सुब्बाराव यांनी चित्रपटासाठी अर्थसहाय्य देण्याचे मान्य केले. पण त्याची अट अशी होती की या चित्रपटाचा नायक संजय दत्त असेल.

कारण त्या काळात संजय दत्त हे सनी देओलपेक्षा खूप मोठे आणि लोकप्रिय नाव होते. राज मात्र ठाम होते. म्हणाले, जर कमल हासन करु शकत नसेल तर तो सनी देओललाच आपल्या चित्रपटात घेईल. सुब्बाराव म्हणाले, ठीक आहे पण सनीला त्याची फी कमी करावी लागेल. कारण त्याचे पूर्वीचे ७-८ चित्रपट चाललेले नाहीत.

See also  सलमान खानने सुनिल शेट्टीच्या मूलीची मागितली जाहीर माफी, जाणून घ्या असं काय घडलं होतं...

या चित्रपटासाठी १८ लाख रुपये घेणार असल्याचे सनी देओल यांनी सुब्बाराव यांना सांगितले. सुब्बाराव १२ लाख देण्यास तयार झाले. म्हणाले, जर चित्रपटाने २५ आठवड्यांसाठी चित्रपटगृहांमध्ये रौप्य महोत्सव साजरा केला तर उर्वरित ६ लाख देतील. डील पक्की झाली. सुब्बाराव पुढील दोन महिने बेपत्ता राहिले. सनीने राजकुमार संतोषीची पटकथा वाचली होती. त्याला त्या कथेचा विश्वास होता. म्हणून राज आणि त्याची पटकथा घेऊन सनीने राजस्थान गाठले. तेथे धर्मेंद्र जेपी दत्ताच्या बं’ट’वा’रा या चित्रपटाचे शूटिंग करत होते. राजनी धर्मेंद्रला पटकथा सांगितली आणि धर्मेंद्र खूपच आनंदी झाले. इतके आनंदी की त्यांनी स्वत:च या चित्रपटाची निर्मिती करण्यास सहमती दर्शविली.

सुरुवातीला मिथुन चक्रवर्ती राजकुमार संतोषीच्या ‘घा’य’ल’ चित्रपटात काम करणार होता. पण राजकुमार संतोषी हे आता निर्माता नव्हते. धर्मेंद्रने चित्रपटाची स्क्रिप्ट वाचली तेव्हाच ते प्रभावित झाले. संतोषी म्हणाले होते की मिथुन हा चित्रपट करत आहे. त्यावेळी सनीच्या कारकीर्दीचा आलेख उतारावर होता. त्याला एका हिट चित्रपटाची नितांत गरज होती. तेंव्हा धर्मेंद्र यांनी स्वतः मिथुनला राजकुमार संतोषीचा हा चित्रपट सोडण्याची विनंती केली. धर्मेंद्र एक मोठे स्टार आहेत. ते मिथुनला इंडस्ट्रीत सिनियर आहेत. मिथुन धर्मेंद्र यांचा शब्द टाळूच शकला नाही. त्याने ‘घा’य’ल’ हा चित्रपट सोडला. शेवटी धर्मेंद्र निर्मित घा’य’ल मध्ये सनी देओल च मुख्य भूमिकेत झळकला.

See also  मोठा निर्णय: आता ‘या’ दिवशी जाहीर होणार दहावीचा निकाल

बरं, आता घा’य’लच्या अभिनयाविषयी चर्चा सुरूच आहे तर या काही गोष्टीही जाणून घ्या. जेव्हा धर्मेंद्र आणि सनी देओल घा’य’लसाठी ऑन-बोर्ड आले, तेव्हा चित्रपटाच्या लिडिंग लेडीचा शोध सुरू झाला. या चित्रपटात डिंपल कपाडियाने रोल करावा अशी सनीची इच्छा होती. कारण डिंपल आणि सनीचे अफेअर त्याकाळी फॉर्म मध्ये होते. परंतु धर्मेंद्र पूर्णपणे या कल्पनेच्या विरोधात होते.

म्हणून या चित्रपटात डिंपलऐवजी मीनाक्षी शेषाद्री यांना साइन केले. दुसऱ्या नायिकेच्या भूमिकेत मौशुमी चॅटर्जीची भूमिका साकारली होती. पण चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान मौशुमी आणि निर्मात्यांमध्ये अनेक वैचारिक मतभेद घडले होते. मौशुमीने इतका त्रास दिला होता की, धर्मेंद्र मौशुमीच्या वागण्यामुळे खूश नव्हते. जेव्हा घा’य’ल फिल्म खूप हिट ठरली तेव्हा चित्रपटाच्या कलाकार आणि क्रू साठी एक जंगी सक्सेस पार्टी साजरी केली.

See also  रोशन सिंग सोढी नंतर ही अभिनेत्री देखील सोडत आहे "तारक मेहता..." मालिका, कारण ऐकून थक्क व्हाल!

पण या पार्टीत मात्र मौशुमी यांना आमंत्रितच केले नव्हते. राजकुमार संतोषी आणि त्यांचा ‘घा’य’ल’ हा पहिला चित्रपट. २२ जून १९९० रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने सनी देओलला प्रथमच सुपरस्टारचा दर्जा दिला होता. पण ‘घा’य’ल’ हा सनी देओलपेक्षाही जास्त राजकुमार संतोषीचा चित्रपट आहे. असो…

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment