स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांची काळजी घेणारे आहेत तरी कोण निलेश लंके कोण? ​जाणून घ्या त्यांची जीवनगाथा..

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

राजकारण, समाजकारण म्हणजे फक्त फसवेगिरी, असा सर्वसामान्य जनतेचा समज आहे. कारण बहुतेक लोकनेते हे समाजासाठी कमी आणि स्वतःच्या गरजांसाठी जास्त झगडत असतात. मात्र हे खरं तर आपल्या महाराष्ट्राचं सौभाग्य मानावे की अहमदनगर जिल्ह्यातील पावनभूमीत एक असा पुण्यात्मा जन्माला आला, ज्याने स्वतःचे सारं आयुष्य लोकसेवेसाठी वाहून घेतले. हा गरीबांचा कैवारी अनाथांचा वाली नेमका कोण, कुठला, त्याचे जीवन, त्याचे कर्तृत्व आणि कार्य आपण आज जाणून घेऊया.

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात 10 मार्च 1980 समाजाच्या कल्याणासाठी आणि दीनदुबळयांना आधार देण्यासाठी एका गुणी व तेजस्वी बाळाचा जन्म झाला. वडील ज्ञानदेव लंके आणि आई शंकुतलाताई लंके या दाम्पत्याने आपल्या या सुपुत्राचे नाव ‘नि’ले’श’ असे ठेवले. लहानपणापासूनच त्याला कुस्तीचे फार वेड असल्याने तो गावातील पैलवान म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यातच पारनेर येथील सभेत एके दिवशी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा निलेश ला आशिर्वाद लाभला.

त्याच दिवसापासून या लहानशा मुलाने स्वतःचे संपूर्ण आयुष्य शिवसेनेसाठी वाहून घेण्याचे ठरवले. त्यामुळे माध्यमिक शाळा सुरू असतानाच त्याने आपले कार्यकर्ते जमवण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी आपल्या स्वकर्तृत्वाने शिवसेनेचे तालुकाप्रमुख हे पद मिळवले, हे महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण होते. याच वयात त्यांनी हंगा गावची ग्रामपंचायत ताब्यात घेऊन आपण काय करू शकतो, याची एक झलक दाखवून दिली.

आपल्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने निलेश लंके यांना अहमदनगर येथील कायनेटिक कंपनीत नोकरी करावी लागली. लहानपणापासूनच समाज कार्य करताना गोरगरिबांशी नाळ जोडली गेल्याने नोकरीत त्यांचे मन मुळीच रमले नाही. त्यामुळे नोकरी सोडून ते पुन्हा समाजकारणात व गावच्या राजकारणात रमले.

वडील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक होते. परंतु कुटुंबाला हातभार लावता यावा, म्हणून हंगा एसटी स्टँडवर चहाचे एक हॉटेल सुरू केले. पण आपल्या परोपकारी स्वभावामुळे कार्यकर्त्यांना चहा पाजून पाजून शेवटी ते देखील बंद करावे लागले. मग त्यांनी एक किराणामालाचे दुकान सुरू केले. पण कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे त्यांनी पारनेर पंचायत समितीची निवडणूक लढवली. मात्र अगदी थोड्याफार फरकाने त्यांना पराभव स्वीकारावा लागला. पण जो खचून जाऊन माघार घेईल, तो बाळासाहेबांचा ढाण्या ‘म’र्द’मराठा’ कसला…

See also  गरोदरपणात देखील आपली जबाबदारी पार पाडणारी ही महिला DSP; हिच्या कर्तृत्वाला सलाम...

शिवसेना पक्षाचे एक पदाधिकारी म्हणून कार्य करत असताना कित्येक गोरगरीब, निराधार आणि वृद्धांचा आधार बनून शासनाच्या लोकोपयोगी योजनेतून त्यांना मासिक पगार सुरू केला. तसेच शासनाच्या सर्व योजना गावासाठी आणि तालुक्यासाठी राबवत अनेक सुशिक्षित लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. या सर्व कार्य प्रवासा दरम्यान निलेश यांच्यावर अनेक घाणेरडे व खोटे आरोप करण्यात आले. पण तरीही त्यांनी आपले समाजकार्य नित्यनेमाने सुरूच ठेवले. पुढे 2012 च्या पंचायत समिती निवडणुकीत सुपा गणातून आणि 2017 मध्ये सुपा गटातून त्यांच्या पत्नी राणीताई लंके ह्या भरघोस मतांनी जिल्हा परिषद निवडणुकीत निवडून आल्या.

पण ते म्हणतात ना, दुःखामागून सुख येते आणि सुखामागून दुःख येते. याच दरम्यान निलेश रावांचे समाजकल्याण काही विनाशकारी लोकांच्या ङोळयांत खुपू लागले. शिवसेना प्रमुख आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या कङे पारनेर येथील 27 फेब्रुवारी 2018 रोजी झालेल्या सभेत गोंधळ निर्माण केल्याचा चुकीचा संदेश पोहोचवून. निलेश लंके यांच्यावर खोटा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे 6 मार्च 2018 रोजी त्यांना पदावरून व पक्षातून बेदखल करण्यात आले.

पण तेव्हा संपूर्ण मतदारसंघाला हा अन्याय सहन झाला नव्हता आणि ते एकत्र आले व 10 मार्च 2018 हा दिवस पारनेरच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांत लिहिला गेला. आपल्या या लाडक्या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठीच 50 हजारांहून अधिक जनसमुदाय हंगा येथे गोळा झाले होते. या सोनेरी दिवशी हंगा गावात जणू जत्रेचे वातावरण निर्माण झाले होते. इतकंच नव्हे तर याच दिवशी सर्वसामान्य जनतेचा, गोरगरिबांचा हक्काचा नेता, कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देणारा त्यांचा लाडका लोकनेता म्हणून शिक्कामोर्तब झाले.

See also  कोरोना मधून बरे झालेल्या रुग्णांना होत आहे "या" गंभीर आजाराची लागण, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा...

या दिवशी भव्यदिव्य समारंभात आपल्या जनतेसमोर निलेश लंके या लोकनेत्याला रडू फुटले. तेव्हा त्यांना हीच जनता म्हणाली की,”साहेब आता रडायचं नाही, आता फक्त लढायचं….” आपल्या जनतेच्या भक्कम पाठिंब्यामुळे त्यांना आधार मिळाला. मग मात्र आपली संपूर्ण ताकद एकवटून दिवसरात्र, 24 तास आणि 365 दिवस ते कसलेही भान न ठेवता, स्वतःच्या तब्येतीची आणि कुटुंबाची पर्वा न करता समाजाची सेवा करत त्यांनी “निलेश लंके प्रतिष्ठान” ची स्थापना केली.

पारनेर तालुक्यापासून ते मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा यांसह अनेक जिल्ह्यांत त्यांनी निलेश लंके प्रतिष्ठानच्या विविध शाखा स्थापन केल्या. त्याचसोबत सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांचे, शेतकऱ्यांच्या समस्या, रक्तदान शिबिरे, सर्व रोग निदान शिबिरे यासाठी आंदोलने करत 18 ते 20 तास सतत समाजकार्य करत स्वतःला झोकून दिले.

निलेश लंके यांच्या या निस्वार्थी कामाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी दखल घेतली. स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांनी विधानसभेत निवडणूक 2019 च्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केले. पण तरीदेखील आमदार होण्याचा मार्ग अजूनही सोपा नव्हता.

तेव्हा देखील निलेश यांच्या विरोधकांनी त्यांचा पाठलाग काही सोडला नाही. ते त्यांच्याविरुद्ध कटकारस्थाने, अपप्रचार करत राहिले. पण शेवटी या मराठी मातीतील पोलादी छातीच्या वाघासमोर त्यांना शरणागती पत्करावी लागली. कष्टकरी शेतकरी जनतेच्या आशीर्वादाने 24 ऑक्टोंबर 2019 रोजी तब्बल 61000 मतांनी निवडून येत हा हंगा गावचा सुपुत्र पारनेर तालुक्याचा ‘आ’म’दा’र’ झाला. दीनदुबळयांचा कैवारी, अनाथांचा वाली ह्या जनसेवकाचा जयजयकार झाला.

सध्या संपूर्ण देशभरात कोरोनाचे सावट मानगुटीवर असताना सर्वजण आपला जीव मुठीत घेऊन जगत आहेत. या संकटकालीन परिस्थितीत देखील पारनेर तालुक्यातील हा निधड्या छातीचा वाघ आपल्या माय- बाप जनतेसाठी रांत्रदिवस झटत आहे. आपल्या मुलाखतीमध्ये लोकप्रिय आमदार निलेश लंके यांनी सांगितले की,”नागेश्वर मंगलकार्य या साडेचार ते साडेपाच फुट एकर जमिनीत त्यांनी आदरणीय “शरदचंद्रजी पवार” या नावाने कोविङ सेंटर उभारले आहे. या सेंटरमधून आतापर्यंत 22,500 रुग्णांना ङिस्चार्ज देण्यात आला आहे.”

See also  सावधान! कोरोना महामारीला षडयंत्र म्हणाल तर होऊ शकते अटक, दिल्लीत एका डॉक्टरवर गुन्हा दाखल

तसेच या ठिकाणी रुग्णांची संपूर्ण देखभाल घेतली जाते. दररोज सकाळी 7 वाजता योगा, त्यानंतर नाश्त्यामध्ये व जेवणात दूध, अंडी, मांसाहारी असा प्रोटिनयुक्त आहार दिला जातो. येथील रुग्णांच्या मनोरंजनासाठी व त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी दररोज 4.30 ते 5.30 च्या दरम्यान प्रवचन, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले जातात. तसेच कोरोनाची भीती रुग्णांच्या मनातून घालवण्यासाठी ङॉक्टरांचे मार्गदर्शन असे उपक्रम सुद्धा ठेवले जातात.

अशाप्रकारे निलेश लंके हे लोकनेते आपल्या कोविङ सेंटर मध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आपले आई, बाप, भाऊ, बहीण म्हणून उपचार करत आहेत. ते म्हणतात की, “माझ्या माणसांचे संरक्षण करणे, हीच माझी मुख्य जबाबदारी आहे. मला कोरोना होईल आणि मग माझं काय होईल, या विचाराने मी माझ्या गोरगरीब जनतेकडे दुर्लक्ष करू शकत नाही. माझे जे काही होईल, ते परमेश्वर पाहून घेईल.” अशाप्रकारे त्यांनी आपल्या जनतेविषयी आपुलकी, प्रेम, समता दाखविली आहे. महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या या सुपुत्राला व जनतेच्या लोकप्रिय नेत्याला त्याच्या या कार्यासाठी मानाचा मुजरा…मानाचा मुजरा…

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment