“अहो महानायक मोठेपणा दाखवा हो”, मनसेचा सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना सणसणीत इशारा…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीचे महानायक सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचे जगभरात करोडोंच्या संख्येने फॅन्स आहेत. त्यामुळे ते सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. परंतु सध्या त्यांच्या घराबाहेर टांगलेल्या बॅनरची चर्चा सर्वत्र जोरदार सुरू आहे. बिग बीं च्या जुहू येथील “प्रतिक्षा” बंगल्यासमोर असलेलं बॅनर हल्ली सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या MNS सेनेकङून ही पाटी लावण्यात आली आहे. “महानायक आहात, तर जरा मनाचा मोठेपणा दाखवा”, अशा तिखट शब्दांची ही पोस्ट सध्या खूप चर्चेत आहे. आता हे बॅनर झळकवण्यामागील कारण काय आहे बरं….असा प्रश्न तुम्हांला देखील पडला असेलच. त्याचे कारण म्हणजे ‘रस्त्याचे रुंदीकरण’.

See also  जो पर्यंत राज ठाकरे ‘हे’ काम करत नाहीत, तोपर्यंत मनसेसोबत युती अशक्य; चंद्रकांत पाटील यांनी केला खुलासा

सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा “प्रतिक्षा” बंगला हा संत ज्ञानेश्वर मार्गावर आहे व मुंबई महानगरपालिका या रस्त्याचे रुंदीकरण करू इच्छित आहे. परंतु यामध्ये एक खूप मोठी अडचण आहे. ती म्हणजे या मार्गाच्या रुंदीकरणासाठी अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याची एक भिंत तोडावी लागणार आहे.

अमिताभजींच्या घरासमोर दररोज ट्राफिक जमा होते. त्यामुळे हा मार्ग 60 फूट रुंद करण्याचा पालिकेचा विचार आहे. याआधी 2017 मध्ये महानगर पालिकेने अमिताभ यांना यासंदर्भात नोटीस पाठवली होती. परंतु अजूनपर्यंत महानायक अमिताभ बच्चनजी यांनी त्याचे काहीच उत्तर दिलेले नाही.

बीएमसी कडून नोटीस मिळाल्यावर अमिताभ बच्चनजी यांनी तङक को’र्टा’त धाव घेतली होती. न्यायालयाने त्यावर आपला निर्णय देत हे काम ताबडतोब थांबविण्यास सांगितले होते. परंतु, आता मागील वर्षी को’र्टा’ने पुन्हा एकदा काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. कॉलेज, शाळा, हॉस्पिटल असलेल्या या मार्गावर अमिताभ बच्चनजी यांच्या “प्रतिक्षा” बंगल्यामुळे अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे आम्हांला सुपरस्टार अमिताभ बच्चनजी यांच्या मोठेपणाची अतिशय उत्सुकतेने “प्रतिक्षा” आहे, या आशयाचे बॅनर मनसेकङून लावण्यात आले आहे.

See also  प्रसिद्ध अभिनेत्री दिशा पटानीचे मालदीव मधील बो'ल्ड फोटो होतायत व्हायरल, टायगर श्रॉफने मात्र...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment