प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय लवकरच लग्नबंधनात अडकण्याची शक्यता, जाणून घ्या कोण आहे नवरदेव?
अभिनेत्री मौनी राॅयला आज कोन ओळखत नाही. मौनी राॅय गेल्या काही वर्षभरात सिनेमातील भुमिकांमधून अगदीच प्रसिद्धीझोतात राहिली आहे. शिवाय तिची लोकप्रियता आज एका वेगळ्या उंचीवर पोहोचली आहे. मौनीने झी टिव्हीवर साकारलेल्या नागिन मालिकेतील भुमिकेतून तिची अदाकारी प्रत्येक घराघरात पोहोचली आहे.
सध्याच्या तरूणाईमधेही तिची क्रे’झ अ’फा’ट आहे. तर मुद्दा तिच्या चर्चेबाबत असा आला आहे की, सोशल मीडियावर मौनीच्या लग्नाबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. ज्या व्यक्तीसोबत मौनीच्या विवाहाची चर्चा जोर धरत आहे त्या व्यक्तीचं नाव आहे.
सुरज नांबियार. सुरज नांबियार दुबईमधील एक बॅंकर आहे. टिव्ही सिरीयलमधून आपल्या कारकिर्दीला सुरूवात केलेली अभिनेत्री मौनी राॅय आता आपल्या आयुष्याची दुसरी इंनिंग खेळण्यास सज्ज होत आहे असचं म्हणावं लागेल.
मौनी राॅय अजूनतरी सिंगल आणि अविवाहित आहे. याआधी तिने अनेकदा प्रसारमाध्यमांना ती करियरवर फोकस करू इच्छिते इतकीच बाब केवळ सांगितली आहे. मौनीच्या सौंदर्यामुळे अनेकजण तिच्यावर फिदा आहेत याबाबत काहीच शंका नाही.
अनेकदा लग्नाबाबत स्पष्टीकरण देण्याच टाळलं असतानाही मौनीसोबत खुप काळापासून रिलेशनशीपमधे असणारा तिचा बाॅयफ्रेंड सुरज नांबियार याच्यासोबत मौनी लवकरच लग्न करणार ही बातमी गुप्तरित्या हाती आल्याच वृत्त आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तानुसार सुरज नांबियार याचे मौनीच्या कुटुंबासोबत खुप घनिष्ठ व चांगले संबंध आहेत. नागिन अभिनेत्री मौनी राॅय कदाचित चाहत्यांना अचानक सुखद धक्का देण्याच्या तयारीत असावी.
मौनी राॅय तिच्या दुबईमधील वारंवारच्या टुरमुळेही प्रसिद्धझोतात राहिली आहे. मौनी तिच्या इन्स्टाग्रामच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कायम दुबईमधील तिचे फोटोज शेअर करत असते. अनेकांच्या मते तर दुबईला मौनीने केवळ सुरज नांबियार याच्याकरता स्वत:च दुसरं घरच बनवलं आहे.
लाॅ’क’डा’ऊ’न’म’धी’ल भरपूर काळदेखील मौनी दुबईतच होती. मौनी शक्यतो प्रसारमाध्यमांना स्वत:च्या पर्सनल आयुष्याबाबत फारशी माहिती देत नाही. मौनीच्या प्रत्येकबाबीवर गु’पी’त राहण्याचा एक दिवस चाहत्यांना एखाद्या सरप्राईजमधून ध’क्का बसेल हे मात्र निश्चित. मौनी राॅय तिच्या आधीच्या प्रोजेक्टनंतर आता नव्याने रणबीर कपूर व आलिया भट यांच्यासोबत ब्रम्हास्त्र या सिनेमात दिसण्याची शक्यता आहे.
मौनी राॅयबद्दल सांगायचच झालं तर ती एका उत्कृष्ट अभिनेत्री सोबतच कथक डान्सर व गायिकादेखील आहे. मौनी राॅय मुळची बंगाल येथील आहे. मौनीच्या कारकिर्दीची सुरूवात ही “नहीं होना” या रन चित्रपटातील गाण्याच्या बॅकग्राऊंड डान्सिंग पासून झाली होती.
२००६, साली “क्यों की सास भी कभी बहू थी” या मालिकेतून तिच्या सहाय्यक भुमिकांची सुरूवात झाली. सोबतच कस्तुरी आणि दो सहेलियां या मालिकांमधूनही तिने आपली छाप पाडली. देवों के देव महादेव या मालिकेतही ती दिसली आणि नंतर नागिन मालिकेतली मौनी सर्वांच्या पसंतीस उतरली.
२०१४ सालीच्या झलक दिख ला जा या डान्सच्या शोमधे ती फायनल राऊंडपर्यंत येऊन ठेपली होती. अक्षय कुमार सोबत गोल्ड हा सिनेमा तिला मिळाला. या सिनेमाने तमाम भारतीयांच लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं होतं. या सिनेमामुळे तिला बेस्ट डेब्यूचा फिल्मफेअर अवाॅर्डही मिळाला होता.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!