साऊथच्या या सुपरस्टार कलाकारांनी नाकारले बॉलीवूडमधील चित्रपट, महेश बाबूंनी तर…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

साऊथ सिनेसृष्टीतील बहुतांश कलाकार हे सध्या बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात पदार्पण करताना दिसत आहेत. आपल्या या लाडक्या कलाकारांना हिंदी चित्रपटांत पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक असतात. परंतु यामध्ये काही असे कलाकार देखील आहेत. ज्यांना बॉलीवुडच्या अनेक ऑफर्स येत असतात. परंतु तरीदेखील हे कलाकार चंदेरी दुनियेतील सुपरङुपरहिट चित्रपटांत काम करण्यासाठी नकार देतात.

1) अल्लू अर्जुन : अभिनेता अल्लू अर्जुन हा साऊथ इंडस्ट्रीमधील एक खूप मोठा स्टार आहे. मात्र तरीही त्याने आतापर्यंत बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलेले नाही. तुम्हांला ठाऊक आहे का, अल्लू अर्जुन ला “बजरंगी भाईजान” आणि “83” यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांची ऑफर आली होती.

See also  शाहरुख खानच्या मुलाने केले ग्रॅज्युएशन पूर्ण, पण शाहरुख म्हणतो, माझ्या मुलाला अजिबात अभिनय जमत नाही...

मात्र त्याने हे चित्रपट सुद्धा बेधडकपणे नाकारले होते. मल्ल्याळम फिल्मस्टार दुलकर सलमान, तापसी पन्नू, विक्की कौशल आणि दिग्दर्शक अनुराग कश्यपचा “मनमर्जिया” या चित्रपटातून तो इतर हिंदी प्रेक्षक वर्गापर्यंत पोहोचणार होता. त्याने हा चित्रपट साइन सुद्धा केला होता. परंतु तेव्हाच नेमके अभिषेक बच्चन चे नाव त्याच्या जागी लागले.

2) महेश बाबू : अभिनेता महेश बाबू याचे साऊथ इंडस्ट्रीमध्ये जबरदस्त फॅनफॉलोइंग आहे. मात्र त्याने बॉलीवुड मध्ये आजपर्यंत कधीच काम केले नाही. चंदेरी दुनियेतील चित्रपटांच्या ऑफर्स तर महेश बाबू ला नेहमी येतात. परंतु तो दरवेळी या सर्व ऑफर नाकारतो.

अभिनेता विजय देवरकोंङाच्या “अर्जुन रेङ्ङी” या चित्रपटाला प्रचंड प्रमाणात लोकप्रियता मिळाली. या चित्रपटानंतर यशराज फिल्म्स विजय देवरकोंङा याला त्यांच्या फिल्म मध्ये कास्ट करणार होते. मात्र त्याने ही ऑफर सुद्धा नाकारली.

See also  अभिनेत्री रेखा सोबत 25 वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्याने केली होती जबरदस्ती, त्यानंतर जे घडले ते...

3) अनुष्का शेट्टी : अभिनेत्री अनुष्का शेट्टी हिच्या सौंदर्याची गोष्टच काही वेगळी आहे. आपल्या अप्रतिम अभिनयामुळे आतापर्यंत तिला कित्येक बॉलीवुड चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. परंतु प्रत्येकवेळी तिने त्या ऑफर्स नाकारल्या. इतकंच नव्हे तर अजय देवगण च्या “सिंघम” चित्रपटाच्या दरम्यान सुद्धा अनुष्काला विचारण्यात आले होते. त्याचप्रमाणे नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना ही जरी आता बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करत असली तरीही तिने शाहीद कपूरचा “जर्सी” हा चित्रपट नाकारला होता.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment