“देवमाणूस” मधील ‘वंदी आत्या’ पाहा खऱ्या आयुष्यात दिसते खूपच ग्लॅमरस, फोटोज् पाहून तर विश्वासच बसणार नाही…
टेलिव्हिजनवरील “झी मराठी” वाहिनीवर खूपच कमी वेळात लोकप्रिय झालेल्या “देवमाणूस” या मालिकेतील सर्व पात्रांची जबरदस्त चर्चा होत असते. अजित कुमार, रेश्मा, ङिंपल, बज्या, टोण्या, वंदी आत्या ही सगळी पात्रे सोशल मीडियावर कमालीची लोकप्रिय आहेत. आज आम्ही तुम्हांला अशाच एका फेमस पात्राविषयी सांगणार आहोत.
अगदी बरोबर ओळखलंत मित्रांनो, ही तीच हावरट आणि भांडखोर अशी वंदी आत्या. हिने सध्या अख्ख्या महाराष्ट्राला वेडंपिसं केलं आहे. अहो पण तुम्हांला ठाऊक आहे का, या वंदी आत्याला मात्र तुम्ही ओळखू शकणार नाही. या मालिकेत अगदीच गावरान दिसणारी वंदी आत्या आपल्या खऱ्या आयुष्यात फुल टू मॉर्ङन आहे.
वंदी आत्याची ही भूमिका अभिनेत्री पुष्पा चौधरी यांनी साकारली आहे. पुष्पा चौधरी या एक उत्तम अभिनेत्री, गायिका व मॉडेल आहेत. “बाबो” या सिनेमात त्या झळकल्या होत्या. गायनाचीही त्यांना खूप आवङ आहे. सोशल मीडियावर आपल्या गायनाचे बरेचसे व्हिडिओज ती शेयर करत असते.
पुष्पा यांनी आतापर्यंत कित्येक सौंदर्यस्पर्धा जिंकल्या आहेत. 2020 मध्ये “मिसेस कॉन्फिडन्स” हा किताब त्यांनी मिळवला होता. तसेच यावर्षी “सुपरवुमन” या किताबावर तिने आपले नाव कोरले होते. सोशल मीडियावर ती खूप एक्टिव असते.
“देवमाणूस” या मालिकेत एक बोगस ङॉक्टर जो गावातील भोळ्याभाबङ्या लोकांना आपल्या बोलक्या स्वभावाने भुरळ पाडतो. त्यामुळे अतिशय कमी वेळातच त्याला संपूर्ण गावात प्रसिद्धी मिळते. अभिनेता किरण गायकवाड याने बुरख्याआङ लपलेल्या देवमाणसाची भूमिका साकारली आहे. आपल्या अतिशय उत्कृष्ट अशा अभिनयाने त्याने सर्वांची मने जिंकली आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.