महेंद्रसिंग धोनी बनवतोय एक अफलातून आणि हटके नवी कोरी वेब सिरीज, वेब सिरीजचा विषय ऐकून थक्क व्हाल!

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर भारताचा तडाखेबंद आणि यशस्वी कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी सध्या लोकप्रिय आणि प्रचलित असलेल्या ट्रेंडमधे म्हणजेच वेब सिरीज निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे.

सध्या IPL सुरू असल्यामुळे धोनी त्याच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळतांना क्रिकेटचा आनंद लु’ट’त आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार म्हणून ज्या वेळी महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली त्यावेळी त्याने आधुनिक पद्धतीने शेती आणि इतर काही आवडीच्या क्षेत्रांत काम करणार असल्याचे सांगितले होते. अर्थातच जाहिरात, मीडिया आणि चित्रपट क्षेत्रांत त्याला सुरुवातीपासून रुची आहेच.

सध्या देशभरात सर्वत्र वेब सीरिज या माध्यमाकडे लोकांचा आणि त्यातही तरुणाईचा विशेष कल आहे. आणि येत्या भविष्यकाळात तो निश्चितच वाढणार यात शंकाच नाही. त्यामुळे या माध्यमाची क्रेझ आणि भविष्य लक्षात घेऊन धोनी नियोजनबद्ध पद्धतीने या क्षेत्रात पदार्पण करत आहे.

एका प्रतिथयश माध्यमाला दिलेल्या मुलाखती अनुसार महेंद्रसिंग धोनी आता एका नवीन वेब सीरिजची निर्मिती करणार असून या प्रोजेक्ट मधे त्याची पत्नी साक्षी धोनीही सक्रिय सहभागी असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धोनी एका पौराणिक विज्ञानकथे वर आधारित असलेल्या वेब सीरिजवर काम करणार आहे.

ही वेब सिरीज एका नवीन लेखकाच्या अप्रकाशित पौराणिक विज्ञानकथेवरील पुस्तकावर आधारित असणार आहे. विशेष म्हणजे धोनीला वेब सिरीज निर्मितीची प्रेरणा देणारी ही पौराणिक विज्ञानकथा त्या लेखकाचीही पहिलीच रचना आहे.

एकंदरीत ही अशी परिस्थिती असतांना ही वेब सिरीज तयार करणे हा एक मोठा धोका पत्करणे आहे. पण धोनीला त्याच्या याच शैलीसाठी ओळखले जाते. या बद्दल एका मुलाखतीत साक्षीने सांगितले की,”ही फक्त पौराणिक विज्ञानकथाच नाही तर, ही एका अघोरी विद्या तांत्रिकाची कहाणी असेल.

जो एका बेटावरील गु’प्तस्थळी आधुनिक विज्ञानाचे उच्च तंत्रज्ञान वापरून उभारलेल्या संशोधन केंद्रावर अडकून पडलाय. आपल्या अघोरी मं’त्र’तं’त्र साधनेचा वापर करुन तिथून सुटण्याच्या प्रयत्नात असलेला हा अघोरी जेंव्हा एकेका रहस्यावरून पडदा दूर करेल, त्यावेळी जगात अस्तित्वात असलेल्या बऱ्याच गोष्टींविषयी तुमची मते आणि विश्वास इ. कायमचे बदलू शकतात.”

साक्षी आणि प्रोडक्शन टीम या मालिकेसाठी एक तगडी स्टारकास्ट शोधत आहे. तसेच या मालिकेचे चित्रीकरण कोठे केले जाईल? याचा विचारही केला जात आहे. परंतु एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की, रसिकांना या मालिकेतल्या विशिष्ट रहस्यमयी गोष्टींची भुरळ पडावी याची पुरेपूर खबरदारी घेतली जाईल. कथेसोबतच प्रत्येक पात्राला योग्य न्याय देऊन सिरीज रंजक बनविण्यासाठी खूप प्रयत्न केले जात आहेत.

महेंद्रसिंग धोनीचा हा नवा डाव प्रत्येकाला बघायचा आणि अनुभवायचा आहे. तसं ट्रायल म्हणून धोनीच्या या प्रोडक्शन कंपनीने गेल्या वर्षी चेन्नई सुपर किंग्जचा संघर्ष दर्शविणारा “रोअर ऑफ द लायन” हा माहितीपट तयार करून प्रदर्शित केला होता.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment