माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सेंद्रीय शेती करून कमावतोय करोडो रुपये, जाणून घ्या काय काय आहे त्याच्या शेतात…

१५ ऑगस्टला भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यानंतर धोनी आता काय करणार असा प्रश्न सर्वांना पडला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारलेल्या महेंद्रसिंह धोनीने खेळाच्या मैदानाव्यतिरीक्त आपली दुसरी इनिंग सुरु केली आहे.

रांची येथील आपल्या फार्महाऊसवर धोनीने सेंद्रीय शेतीचा प्रयोग सुरु केला होता. हा प्रयोग यशस्वी झाला असून आपल्या फार्महाऊसवर आलेल्या पिकांची विक्री करायला धोनीने सुरुवात केली आहे. धोनी सध्या आपली पत्नी साक्षीसोबत दुबईत आहे, धोनीच्या फार्महाऊसचा मॅनेजर सध्या ही सर्व जबाबदारी पार पाडतो आहे.

0pf4cpfk dhoni mahindra

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, जाहीराती, आयपीएल यामधून कोट्यवधीची कमाई करणाऱ्या धोनीने आपल्या फार्महाऊसमधील टोमॅटो आणि दूध विकण्यास सुरुवात केली आहे. धोनीच्या फार्महाऊसमध्ये ८० किलो टोमॅटोचं उत्पादन आलं असून त्यातील ७१ किलो टोमॅटो हे ४० रुपये किलोच्या दराने विकले गेले आहेत.

READ  कर्तव्यदक्ष IAS अधिकारी नवरा बायको महिलांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर फिरून राबवतायत "मिशन शक्ती" चं जागृती अभियान...

याव्यतिरीक्त २० दिवसांनी धोनीच्या फार्महाऊस मधून कोबी, शेंगा, फ्लॉवर, स्ट्रॉबेरी, ब्रोकली अशा भाजाही बाजारात येणार आहेत. धोनीच्या फार्महाऊसमधील भाज्यांचं मार्केटींग व व्यवस्थापन सांभाळणाऱ्या शिवनंदन यांनी मीडियाशी बोलताना ही माहिती दिली.

d56922488c24886548df8c3a22f4488c973d6e8228c794ea66713f4445e4eedd

दरम्यान धोनीने पंजाबवरुन खास ६० जर्सी आणि साहीवाल गायी मागवल्या होत्या. या गाईंचं कोणतीही भेसळ नसलेलं दूध धोनी विकतो आहे. झारखंडमधील अपर बाझार, लालपूर, वर्धमान कंपाऊंड या भागात धोनीच्या फार्महाऊसमधील सेंद्रीय पिकांची विक्री होत आहे. याशिवाय पी.पी. कंपाऊंड भागातही काही दिवसांनी स्टॉल तयार केले जाणार असल्याची माहिती शिवनंदन यांनी दिली.

७ एकराच्या जागेवर उभं आहे धोनीचं रांचीमधलं अलिशान फार्महाऊस. महेंद्रसिंह धोनी आपली पत्नी साक्षी आणि मुलगी झिवासोबत आपल्या रांची इथल्या फार्म हाउसमध्ये रमतो. रांचीत धोनीच्या राहत्या घरापासून अवघ्या २० मिनीटांवर कैलासपती भागात हे अलिशान फार्महाउस आहे. घरासमोर प्रशस्त जागा, सर्व प्रकारची झाडं आणि हिरवळ हे धोनीच्या फार्महाउसचं प्रमुख वैशिष्ट्य आहे.

READ  काय आहे मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी बहुसंख्य श्रद्धाळू स्त्रीवर्गाद्वारे मनोभावे वाचली जाणारी श्री महालक्ष्मी कथा?

yoyocial%2F2020 11%2F67d288b2 71a1 4dbd 8c77

फार्महाऊसमध्ये धोनी आता कडकनाथ कोंबड्या पाळणार असल्याचं कळतंय. मध्यप्रदेशातील भिलांचल भागात प्रसिद्ध असलेली काळी कोंबडी ही कडकनाथ नावाने ओळखली जाते. या कोंबडीला व तिच्या अंड्यांना बाजारात मोठी मागणी असते.

मध्य प्रदेशातील झबुआ जिल्ह्यातील एका शेतकऱ्याकडून धोनीने आपल्या रांची येथील फार्म हाऊससाठी २ हजार कोंबड्यांची ऑर्डर दिल्याचं कळतंय. झबुआ जिल्ह्यातील थांडला गावात राहणारा शेतकरी विनोद मेधा याच्याशी धोनीच्या टीममधील मॅनेजरने संपर्क साधून या कोंबड्यांची ऑर्डर दिली होती. १५ डिसेंबरपर्यंत या शेतकऱ्याला धोनीला कडकनाथ कोंबड्यांचे २ हजार पक्षी द्यायचे आहेत.

MS%20Dhoni%20(2)

याविषयी मीडियाशी बोलतांना श्री. विनोद मेधा म्हणाले की, “तीन महिन्यांपूर्वी धोनीच्या फार्म हाऊसमधील मॅनेजरने कृषी विकास केंद्राच्या माध्यमातून माझ्याशी संपर्क साधला होता. चौकशी केल्यानंतर पाच दिवसांपूर्वी त्यांनी मला २ हजार कोंबड्यांची ऑर्डर दिली. १५ डिसेंबरपर्यंत मला या कोंबड्या रांचीला पोहचवायच्या आहेत.

READ  हिवाळ्यात जन्मलेल्या बाळांसाठी हि नाव आहेत खूपच शुभ...

यासाठीचं ऍडव्हान्स पेमेंटही धोनीने केलं आहे. देशातल्या सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या फार्ममध्ये माझ्या कोंबड्या जाणार आहेत याचा मला अभिमान आहे.” स्टार मराठीच्या सर्व टीम तर्फे महेंद्रसिंग धोनीला त्याच्या या नवीन इनिंगसाठी शुभेच्छा!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment