महाभारतात भीष्म पितामह साकारले होते या अभिनेत्याने, अभिनेत्याचे नाव ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

हिंदी सिरीयल मध्ये सर्वात जास्त लोकप्रिय झाल्या त्या पौराणिक मालिका. भक्ती भावना एकत्रित असलेल्या संगमात लोकं रमत गेली. एकदा प्रेक्षकांनच प्रेम मिळालं की मग ती मालिका सुपरहिट व्हायला वेळ लागत नाही. रामायण आणि महाभारत या सर्वांत आघाडीच्या मालिका. राम रावण आणि पांडव – कौरव हा लोकांच्या जिव्हाळ्याचा, भावनेच्या अस्तित्वाचा विषय आहे.

सध्या करोना रोगाच्या काळात जेव्हा भारत लॉकडाउन होता तेव्हा पुन्हा रिपीट टेलिकास्ट या दो मालिकांचं करण्यात आलं होतं. विशेषतः म्हणजे सर्व ट्रेलिव्हिजन सिरीयल मध्ये टीआरपीच्या बाबतीत दोन्हीही मालिका एक नंबर होत्या.

जेव्हा मालिका लोकप्रिय होतात तेव्हा त्यातील कलाकार ही खूप लोकप्रिय होतात. महाभारत या लोकप्रिय पौराणिक मालिकेतल्या अश्याच एका प्रचंड आज्ञाधारक पात्र भीष्म यांची भूमिका केलेल्या अभिनेत्या बद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. त्या अभिनेत्याचं नाव आहे मुकेश खन्ना !..

See also  बॉलीवूड अभिनेत्रींपेक्षा 10 पटीने सुंदर आहेत या भोजपुरी अभिनेत्री, या अभिनेत्रीचे सौंदर्य पाहून तुम्ही देखील घायाळ व्हाल!

मुकेश खन्ना या अभिनेत्याला कोण नसेल ओळखत ? असा एकही नसेल की ज्यानं बालपणात त्यांचं काम पाहून त्यांच्यासारखं बनायचं स्वप्न पाहिलं नाहीय. तुम्हाला शक्तिमान ही मालिका माहीत असेल.

आपण लहानपणी याच शक्तिमान ला पाहून शक्तिमान शक्तिमान खेळायचो. ती जादू आपल्याला ही आत्मसात व्हावी असं आपल्याला वाटायचं. मालिका इतकी मनोरंजन होती की कधी वेळ जायचा ते कळायचं नाही. ते सर्व क्रेडिट जातं या अभिनेत्याला.

२३ जून १९५८ ला मुंबईत जन्मेलेलं मुकेश खन्ना आज ६१ वर्षांचे आहेत. त्यांनी भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्थेमधून अभिनयाचं शिक्षण घेऊन करियर च्या प्रवासाला सुरुवात केली.

पुढे ते दूरदर्शन च्या शक्तिमान या त्यांनी निर्मिती आणि अभिनय केलेल्या मालिकेत काम केलं. ते लोकांना प्रचंड आवडलं. मग हळूहळू देशाच्या घराघरात ते पोहचले. नंतर त्यांनी चंद्रकांता मध्ये काम केलं. त्यातली भूमिका ही खूप गाजली. त्यांना दरम्यानच्या काळात अनेक टेलिव्हिजन क्षेत्रातले प्रसिद्ध पुरस्कार ही मिळाले.

See also  ही प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री आयुष्यभर करणार नाही लग्न, कारण ऐकून विश्वास बसणार नाही!

काही काळानंतर त्यांनी बी आर चोपडा दिग्दर्शित महाभारत मध्ये भीष्म पितामह यांची भूमिका साकारली. ती लोकांना इतकी आवडली की मुकेश खन्ना हे टेलिव्हिजन क्षेत्रातील आघाडीचे अभिनेते बनले.

महाभारत ही हिंदी सिरीयल खूप लोकप्रिय झाली. कारण लोकांच्या भावनेचा विषय खूप पटकन पोचतो. त्यांनी या भूमिकेतून खुप ताकतीने भीष्म पितामह हे पात्र साकारलं. त्यांची प्रतिज्ञा आजही लोकांना आठवली तर अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही.

महाभारत सिरीयल करण्यासाठी त्यांनी सारं महाभारत वाचून काढलं आहे असेही ते सांगतात. कोणत्याही गोष्टीला कष्टाची जोड दिली की ती यशस्वीपणे खरी उतरतेच. काही कारणाने बंद केलेली शक्तिमान ही पुन्हा सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. खरचं अश्या हरहुन्नरी बड्या अभिनेत्याला पुढील वाटचाली साठी प्रचंड शुभेच्छा !…

See also  करीना कपूरचा दुसरा मुलगा कॅमेऱ्यात कैद, सावत्र मुलगी सारा अली खानने केला जेहचा फोटो शेअर...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment