राज कुंद्रा प्रकरणावर ‘शक्तिमान’ने दिली धक्कादायक प्रतिक्रिया, म्हणाले शिल्पा शेट्टीला 120%…
मुंबई: ‘शक्तिमान’ म्हणजेच मुकेश खन्ना बॉलीवुड आणि इतर महत्वाच्या मुद्द्यावर आपली स्पष्ट भूमिका मांडतात. बॉलिवूडमध्ये पोर्नोग्राफी प्रकरण समोर आल्यानंतर त्यांनी या प्रकरणावर उघडपणे प्रतिक्रिया दिली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की या प्रकरणात राज कुंद्रा किंवा शिल्पा शेट्टी दोषी आहेत असे मी म्हणत नाही. एक पत्नी असल्याच्या नात्याने तिला आपल्या पतीच्या व्यवसायाबद्दल 120 टक्के पूर्ण माहिती असायला पाहिजे.
प्रकरण उघडकीस आल्याचा मला आनंद…
एका हिन्दी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुकेश खन्ना कठोर स्वरात म्हणाले की, जर पोर्नोग्राफीसारखे चित्रपट बेकायदेशीर असतील तर ते का बनवले जात आहेत? जनता ही जनताच असते, जनतेला फक्त तेच माहिती असते जे माध्यमांद्वारे दाखवण्यात येते. हे प्रकरण उघडकीस आल्याचा मला आनंद आहे.
प्रकरण मार्गी लगायला हवे…
मुकेश खन्ना पुढे म्हणाले की, या प्रकरणात राज कुंद्रा जबाबदार आहे की नाही हे मला माहित नाही, शिल्पा शेट्टी जबाबदार आहे की नाही, हे सुद्धा मला माहित नाही पण आता ही बाब चव्हाट्यावर आली असून, हे प्रकरण मार्गी लागायला हवे. मुकेश खन्ना म्हणाले की जेव्हा ही बातमी वाहिन्यांवर दाखवण्यात येते तेव्हा वाटते की ते दोघे दोषी आहेत. परंतु, खरं काय आहे ते कोणालाच माहिती नाही. त्यांनी यावेळी शुशांत राजपूत केसचे उदाहरण दिले.
शिल्पाला नवर्याच्या व्यवसायाविषयी 120% माहिती असेल…
अश्लील फिल्म्स प्रकरणात शिल्पा शेट्टी यांच्या भूमिकेविषयी ते म्हणाले की, मला पती-पत्नीमध्ये बोलण्याचा अधिकार नाही. पण आज तिने या प्रकरणाबद्दल सांगावे, ती फक्त अभिनेत्री नसून राज कुंद्राची पत्नी आहे. ते म्हणाले की पूर्वीच्या काळात पती-पत्नीमध्ये फारशी चर्चा होत नव्हती, परंतु आज पती काय करीत आहे याबद्दल पत्नीला सर्व काही माहित असते, शिल्पा शेट्टीला सुद्धा त्याबद्दल १२० टक्के माहित असले पाहिजे, असे ते म्हणाले. ती जबाबदार आहे असे मी म्हणत नाही, परंतु जर ती प्रामाणिक आणि तिच्यात पतीविरूद्ध बोलण्याची हिम्मत असेल तर तिने बोलायला पाहिजे, कारण तिने जर याबद्दल बोलले तरच ही ती अश्लील इंडस्ट्री बंद होऊन जाईल.