‘मुलगी झाली हो’ मधील या मुख्य कलाकारालाच कोरोनाची बाधा, मालिकेची चिंता वाढली…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रांनो! आपण सर्वजण हे जाणतोच आहोत की, आपल्या महाराष्ट्र राज्यात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव लक्षणीयरित्या वाढला आहे. याच अनुषंगाने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

Mulgi Zali Ho TRP

कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे कडक नि’र्बं’धां’सह लॉ’क’डा’ऊ’न घोषित करण्यात आला. लॉ’क’डा’उ’नमुळे मालिका, चित्रपट, जाहिरात आदींच्या चित्रीकरणासाठी बंदी आहे. अशात मालिकेचे शूटिंग थांबू नये म्हणून मालिकांचे सेट महाराष्ट्राबाहेर उभारण्यात आले. अनेक मालिकांचे स्थलांतरण झाले.

दमन, गुजरात गोवा, सिल्वासा, बेळगाव अशा ठिकाणांना निर्मांत्यानी शूटिंगसाठी पसंती दिली. म्हणून बहुतांश हिंदीसह मराठी मालिकांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राबाहेर चित्रीकरणास सुरुवात केली आहे.

899486 h

यातच ‘मुलगी झाली हो’ या अल्पावधीतच लोकांच्या पसंतीस उतरलेल्या मालिकेच्या शूटिंगला गुजरातमध्ये सुरुवात झाली होती. मात्र दुर्दैवाने नुकतेच गुजरातमध्ये स्थलांतरण झालेली मुलगी झाली हो मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा किरण माने यांना कोरोनाची लागण झाली आहे.

See also  फोटोमधील ही चिमुरडी आहे प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री, अभिनेत्रीचे नाव ऐकून थक्क व्हाल!

मालिकेच्या शूटिंगच्या युनिट सोबत किरण माने हे गुजरातला गेले होते. तिथेच त्यांना कोरोनाचा सं’स’र्ग झाल्याचे समोर आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. खुद्द किरण माने यांनीच त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे.

878726 h

“अनपेक्षितपणे मलाही गाठलं त्यानं. गुजरातमधून माझ्या माणसांत आलोय. साताऱ्यात देवासारखी माणसं जोडली, ती मनापासून काळजी घेतायत. तुमचं प्रेम राहूद्यात सोबत.. चुटकीसरशी ‘निगेटिव्ह’ होऊन दाखवतो ! एकाकीपणात तुमची साथ मोलाची असेल” अशी फेसबुक पोस्ट त्यांनी शेअर केली आहे. त्यांच्या या  पोस्टवर चाहते त्यांना काळजी घेण्यास सागंत असल्याचे  पाहायला मिळत आहेत.

कोरोना दिवसेंदिवस फक्त महाराष्ट्रातच नाही तर सर्वत्रच तिव्रतेने पसरताना दिसत आहे. अशा अत्यंत संवेदनशील आणि संसर्गजन्य परिस्थितीत लोकरांजनासाठी मालिकांनी शूटिंग न थांबवता सुरक्षित आणि सुयोग्य ठिकाणी जात शूटिंग करायला सुरुवात केली असली तरीही कोरोनापासून तिथेही कलाकार सुरक्षित नसल्याचेच या घ’ट’ने’तून सिद्ध होतेय व यातूनच कलाकारांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न आता उपस्थित होतो आहे.

See also  सैराट मधील आर्चीचे साडीतील हटके फोटो सोशल मीडियावर होत आहेत प्रचंड व्हायरल, पहा तिचे सुंदर फोटो...

934578 h

रसिकांच्या मनोरंनासाठी कुठेच ब्रेक लागू नये म्हणून मालिकेचा सेट हा थेट महाराष्ट्राबाहेर हलवण्यात आला होता. अशातच आता मालिकेच्या मुख्य कलाकारालाच कोरोनाची लागण झाल्यामुळे काही दिवस तरी ते काम करु शकणार नाहीत. अशा परिस्थितीत त्यांच्या अनुपस्थित मालिकेच्या पुढच्या भागांचे शूटिंग कसे होणार हा मोठा प्रश्न आता निर्मांत्याना पडला आहे. श्री. किरण माने यांनी कोरोनातून लवकरात लवकर बरे होऊन पुन्हा शूटिंगला सुरुवात करावी, हीच स्टार मराठी टीमतर्फे शुभेच्छा!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Datta Pawar

Datta Pawar

Leave a Comment