घ्यायला गेली 1700 रुपयाची दारू अन घालवून बसली लाखो रुपये, महिलेची ऑनलाइन फसवणूक

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मुंबई: देशात डिजिटल व्यवहार सुरू झाल्यापासून सायबर क्राइमच्या घटना वाढल्या आहेत. त्यातच कोरोना महामारीमुळे ऑनलाइन वस्तू खरेदीवर लोकांचा जास्त भर आहे. नुकतेच मुंबईत एका 29 वर्षीय महिलेला ऑनलाइन दारू खरेदीच्या प्रकरणात 1.6 लाख रुपयांना गंडवण्यात आले. महिलेला गंडवणार्‍या व्यक्तीने स्वतःला दारूच्या दुकानातील कर्मचारी असल्याचे सांगितले होते. मालाड पोलिसांनी या प्रकरणात एफआयआर दाखल करत तपास सुरू केला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

खाजगी शिकवणी घेणार्‍या महिलेने इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, 14 जुलै रोजी संध्याकाळी 7 वाजता एका लोकल दारूच्या दुकानातून दारू ऑर्डर करण्याचे त्यांनी ठरविले होते. या दरम्यान त्या दुकानातील एका कथित कर्मचार्‍याने त्यांना 1.6 लाख रूपयांचा चुना लावला. आश्चर्याची गोष्ट अशी की, त्या व्यक्तीने 2-3 वेळा पैसे ट्रान्सफर करण्यासाठी गुंतवले.

See also  ब्रेकिंग न्युज! राहुल गांधींना झाली अ'टक, अ'टकेपूर्वी झाली ध'क्का'बु'क्की, राहुल गांधी खाली प'ड'ले...

अशा पद्धतीने लावला चुना…

पोलिसांना दिलेल्या माहितीत महिलेने संगितले की, ‘माझ्या पतीने मला चिंचोली वाईन शॉप मधून दारू ऑर्डर करायला सांगितले होते. मी गुगलवर त्यांचा नंबर शोधून त्यांना कॉल केला. तेव्हा एका व्यक्तीने त्या वाईन शॉपचा कर्मचारी असल्याचे भासवत मला 1700 रुपये देण्यास सांगितले. मी त्याला पैसे दिले. मात्र, जीएसटी साठी आवश्यक असल्याचे सांगत त्याने माल एका QR कोड पाठवला व स्कॅन करायला सांगितले. मी कोड स्कॅन केला आणि माझ्या खात्यातून 19,860 रुपये कपात झाले.

माझ्या खात्यातून जास्त पैसे कपात झाल्याचे त्या व्यक्तिला सांगितल्यावर तो म्हणाला की हे चुकून झाले. त्याने मला दूसरा क्यूआर पाठवला. तो क्यूआर स्कॅन केल्यावर माझ्या खात्यात 10 रुपये जमा झाले. मग त्याने परत एक क्यूआर पाठवला आणि सांगितले की तुमचे सर्व पैसे परत मिळतील. मी त्याने पाठवलेल्या क्यूआर ला स्कॅन केल्यानंतर माझ्या खात्यातून 81,200 रुपये कपात झाले.

See also  ‘या’ महिन्यात येईल कोरोनाची तिसरी लाट, AIIMS संचालकांनी दिली धक्कादायक माहिती

पोलिसांनी सांगितले की, जेव्हा महिलेने पुन्हा त्या व्यक्तिला कॉल करून जाब विचारला तेव्हा त्याने त्याच्या खात्यात काहीतरी तांत्रिक समस्या असल्याचे सांगत महिलेची माफी मागितली. पैसे वापस करण्यासाठी त्याने महिलेचा दूसरा नंबर आणि बँक खात्याचे तपशील मागितले. तेव्हा त्या महिलेने पतीचा नंबर दिला आणि त्यांना दूसरा क्यूआर कोड मिळाला. या कोडला स्कॅन केल्यावर खात्यातून 79,460 रुपये कपात झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने पुन्हा त्या नंबरवर कॉल केला तेव्हा फसवणूक करणार्‍याने सांगितले की, तो दारूची डिलीवरी करण्यासाठी तिच्या घरी येत आहे आणि प्रकरण तिथेच सोडवेल. मात्र, बर्‍याच वेळानंतरही कोणीही न आल्याने पती-पत्नी दारूच्या दुकानात गेले. तेव्हा त्यांना समजले की त्यांच्यासोबत सायबर फसवणूक झाली आहे.

See also  डॉ. आरोळे यांचा हटके पॅटर्न, ना रेमडेसिवीर ना महागडी औषधे तरीही कोरोना रु'ग्ण होतात चुटकीसरशी बरे...

Leave a Comment