‘तारक मेहता…’ मधील बबिताजीं सोबत कायमच असतो हा “बॉक्स”, बॉक्स सोबत असण्याचे कारण वाचून त्यांच्याबद्दल अभिमान वाटेल…

सोनी चॅनल वरील तुफान लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील बबिताजी म्हणजे मिसेस अय्यर म्हणजेच अभिनेत्री मूनमून दत्ता. तर या बबिताजींकडे एक बॉक्स नेहमी आढळतो.

तुम्हाला वाटेल की, हा मेकअप बॉक्स असेल, परंतु नाही… त्यात चक्क असतात अँटीफंगल स्प्रे, अँटीबैक्टीरियल स्प्रे आणि मलमे व तत्सम इतर औषधे आहेत. आता हा औषधांचा बॉक्स बबिताजी का सदैव जवळ बाळगतात. कारण ऐकून तुमचे बबिताजींबद्दलचे विचार नक्कीच बदलतील.

मुनमुन दत्ता या सोशल मीडियावर ऍक्टिव असून प्रचंड लोकप्रियही आहेत. त्यांचे खूप चाहते आहेत. म्हणूनच त्यांची गणना देशातील सर्वाधिक लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रींमध्ये केली जाते. मुनमुन दत्ता या कट्टर प्राणीप्रेमी आहेत.

त्यांना प्राणी खूप आवडतात. त्या नेहमीच त्यांची प्राण्यांसोबतची सुंदर छायाचित्रे इंस्टाग्रामवर शेअर करत असतात. रस्त्यांवरच्या आजारी, भटक्या प्राण्यांना मदत करण्यासाठी देखील बबीताजी प्रसिद्ध आहेत.

यापूर्वीच गोरेगाव फिल्म सिटीच्या परिसरात असणाऱ्या भटक्या प्राण्यांच्या उपचारासाठी मुंबई महापालिका आणि पोलिसांकडून मुनमुन दत्ताने विशेष परवानगी घेतल्याची बातमी मिळाली होती. ताजी माहिती अशी की मुनमुन दत्ता स्वतःसोबत नेहमी एक खास किट बाळगतात.

हा काही त्यांचा मेकअप बॉक्स वैगेरे नसून त्यात अँटीफंगल स्प्रे, बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे स्प्रे आणि तसेच मलमे आणि प्राणिमात्रांसाठी आवश्यक असणारी इतर औषधे असतात. हे विशेष किट त्यांच्या कारमध्ये नेहमीच तयार असते. जेथे जेथे एखादा भटक्या कुत्रा, मांजर किंवा इतरही प्राणी आजारी, संक्रमणाने ग्रस्त दिसतात तेथे तेथे त्या प्राण्यांवर उपचार करतात.

ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या काही चाहत्यांनी लोकांसमोर आणली. ही माहिती पुढे येताच समाजाचा मुनमुन दत्ताबद्दलचा आदर वाढला आहे. बबितजींचे सौंदर्य आणि अभिनयावर त्यांचे फॅन्स फिदा होतेच पण त्यांचे हे काम पाहून त्यांच्याबद्दलचा आदर वाढल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे. मुनमुन दत्ता खऱ्या अर्थाने एक आदर्श प्राणिप्रेमी आहेत.

बबीताजींना आजारी आणि भटक्या जनावरांच्या आश्रयासाठी एक निवारा फार्म उभारायचा आहे. बबिताजींनी काही दिवसांपूर्वीच त्यांचे हे स्वप्न सोशल मीडियावर शेअर करून सांगितले होते. त्या म्हणाल्या की त्यांना एक पशुपालन निवारा फार्म तयार करायचा आहे की जो, केवळ आजारी, अपंग आणि भटक्या प्राण्यांसाठी असेल.

जिथे त्यांची खाणेपिणे, औषधोपचार व निवाऱ्याची पूर्ण काळजी घेतली जाईल. बबीताजी सतत या प्राणी निवारा फार्मसाठी प्रयत्न करीत आहेत. आणि त्यांना खात्री आहे की एक ना एक दिवस त्या यात नक्कीच यशस्वी होतील.

मुनमुन दत्ता या एक सामाजिक कार्यकर्त्या असून त्या बालशिक्षणाच्या समर्थक आहेत. आपल्या घरातील मोलकरीणच्या मुलीच्या शिक्षणाचा भारही त्यांनी उचलला आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment