“तारक मेहता..” मधील बबिताजी भ’डकल्या, शो मधून अचानक गायब होण्याचे सांगितले हे कारण, ऐकून थक्क व्हाल!
टेलिव्हिजनवरील फेमस शो “तारक मेहता का उल्टा चश्मा” यामधील प्रत्येक कलाकार हे सर्वांचे फेवरेट आहेत. सध्या या शोमध्ये रिसॉर्टचा एक सीन दाखवला जात आहे. तर संपूर्ण गोकुळधाम सोसायटी हे तिथे पोहोचले होते. परंतु त्यामध्ये बबिताजींची भूमिका निभावणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता ही त्यांच्या मध्ये दिसलीच नाही.
तारक मेहता का उल्टा चश्मा या शो मध्ये बबिताजी ह्या दिसल्या नाहीत, यामुळे संपूर्ण वातावरण तापले. इतकंच नव्हे तर आता मुनमुन दत्ता ह्या शो सोङून देत आहेत, अशा सुद्धा अफवा उङू लागल्या आहेत. मुनमुन दत्ता हिने आपल्या शो सोडण्याच्या अफवेवर स्वतःच आता उत्तर दिले आहे.
अभिनेत्री मुनमुन दत्ता हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हटले आहे की,”मागील 2- 3 दिवसांपासून काही चुकीच्या घडामोडी रिपोर्ट केल्या जात आहेत. ज्याचा माझ्या आयुष्यावर खूप परिणाम होत आहे. हे खरंतर खूप चुकीचे आहे, कारण मी शो वर रिपोर्ट सुद्धा केला नाही. खरंतर हे आहे की, त्या सीनमध्ये माझी काहीच गरज नव्हती. मला प्रोडक्शन कडून बोलावले नाही, त्यामुळे मी सुद्धा गेले नाही.
मी शोच्या स्टोरी लाइन किंवा सीनचा निर्णय घेत नाही, तर ते प्रोडक्शन घेते. मी तेथील मालकीण नाही. मी काम असेल, तेव्हा तिथे जाते आणि माझे काम करते. काम संपूर्ण झाले की मग परत येते. जर सीनमध्ये माझी काहीच गरज नाही, तर मी तेथे कशासाठी जाऊ.”
पुढे तिने म्हटले की, माझ्या सोशल मीडियावर माझे ट्रॅव्हलिंगचे आणि फोटोशूटचे बरेच फोटोज् आहेत. माझा चेहरा आधीपासूनच त्या व्यक्तिरेखेसाठी चर्चेत होता. जी भूमिका मी आता साकारत आहे. यासाठी मला असे वाटते की, लोकांनी मला माझ्या अभिनयाने नव्हे तर माझ्या खऱ्या व्यक्तिमत्त्वाने ओळखावे.
लोकांनी मला आपल्या आपल्या आवडीने पसंत करावे. ज्यांना मी आवडते त्यांनी पसंत करा आणि ज्यांना मी आवडत नाही, त्यांनी मला पसंत करू नये. प्रत्येकाचे स्वतंत्र विचार असतात. परंतु मला खूप चांगले वाटेल, जेव्हा लोक मला व्यक्तिगत रूपाने मुनमुन दत्ता असे ओळखतील.
त्यासोबतच अ’फवा पसरवणार्यांना मुनमुन दत्ता हिने म्हटले की,”जर मी “तारक मेहता का उल्टा चश्मा” हा शो सोडला, तर मी स्वतः तुम्हांला याविषयी सांगेल. कारण या शो चे चाहते हे भावनिक रूपाने कुटुंबियांसारखे जोडले गेले आहेत. त्यामुळे सर्व गोष्टी जाणून घेणे, हा त्यांचा हक्क आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.