कॉलेजमध्ये टॉपर असणारा स्वामी मुन्नाभाई मुळे आला होता दुसरा…आता करतोय हे काम

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रहो काही भूमिका पडद्यावर अशी काही जादू करून जातात की त्यांच्या भूमिकेची आठवण विशेष जपली जाते. चित्रपट सृष्टीमध्ये अनेक चित्रपट विशेष गाजले आहेत, त्यातीलच राजकुमार हिराणी दिग्दर्शित “मुन्नाभाई एमबीबीएस” प्रचंड लोकप्रिय झाला आहे. या चित्रपटातील अनेक आठवणी प्रत्येक वेळी ताज्या होत असतात, यामधील खूपशा गमतीजमती नेहमीच ओठांवर हसू उमटवत असतात. या चित्रपटातील अनेक डॉयलॉग सुद्धा खूप प्रसिध्द आहेत, तसेच डॉयलॉग बोलणारे सर्व कलाकार देखील खूप गाजले आहेत.

सर्किट आणि मुन्नाभाई या दोघांनी चित्रपटात चांगलीच धमाल केली आहे, तसेच त्यांच्या सोबत अनेक कलाकारांनी देखील खूपच सुंदर भूमिका पार पाडल्या आहेत. असाच एक डॉयलॉग प्रचंड लोकप्रिय झाला होता, अगदी वर्ग गच्च भरलेला असताना मधेच उठून “सर रूम चेंज करने के लिये कौनसा फॉर्म भरणा चाहीये..?” अस प्रश्न विचारून स्वामीने संपूर्ण वर्गात हशा पिकवला होता. स्वामीचे हे पात्र खुर्शीद लॉयरने निभावले होते. खुर्शीद हा चित्रपटात अगदी भित्रा, लाजाळू, आणि अभ्यासू दाखवले होते. त्याला मुन्नाभाई सोबत रूम शेअर करायला लावली होती.

See also  एका बस ड्रायव्हरचा मुलगा ते KGF मधील रॉकी भाई, जाणून घ्या सुपरस्टार अभिनेता यशचा थक्क करणारा जीवन प्रवास...

स्वामी खूप हुशार होता, भरपूर अभ्यास करून देखील तो संपूर्ण कॉलेजमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आला होता. कारण त्यावेळी मुन्नाने चिटिंग करून परीक्षा दिली होती. हा खुर्शीद आता खूपच निराळा दिसतो, त्याच्या लूकमध्ये प्रचंड बदल झाला आहे. शरीरयष्टीने बारीक, लुकडा असलेला खुर्शीद आता वजनदार बनला आहे. तसेच त्याचे वय वाढले असून केस पांढरे झाले आहेत. डोक्यावर मोठे टक्कल पडले आहे. त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून अनेकजण थक्क झाले आहेत.

“मुन्नाभाई एमबीबीएस” चित्रपटातून त्याने अभिनयाच्या पडद्यावर, बॉलिवूड मध्ये पदार्पण केले होते. हा त्याचा पहिलाच चित्रं होता आणि यातील स्वामीची भूमिका देखील पहिलीच होती मात्र तरीही त्याला पहिल्याच प्रयत्नात भरपूर यश मिळाले होते. हा चित्रपट बॉलिवूड मध्ये प्रचंड गाजला होता, आजदेखील या चित्रपटाची व यातील कलाकारांची चर्चा रंगलेली असते. या चित्रपटानंतर तो “अजब प्रेम की गजब कहाणी” , “डबल धमाल”, “या चित्रपटात झळकला होता. यातील त्याची भूमिका सुद्धा खूप लोकप्रिय झाली आहे.

See also  अक्षय कुमारचा रामायणावर आधारित 'हा' नवीन चित्रपट येतोय, चित्रपटाचे पोस्टर झाले रिलीज...

बराच काळ तो सोशल मीडिया पासून देखील दूर होता, त्याची कसलीच खबर कोणालाच न्हवती. मात्र त्याने पुन्हा एकदा कमबॅक घेतल असून “द ग्रेट इंडियन मर्डर” या वेबसिरीज मध्ये काम करत आहे. यातील त्याचा अभिनय अगदी कौतुकास्पद आहे. त्याची लोकप्रियता अशीच वाढत राहो ही सदिच्छा. त्याच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Datta Pawar

Datta Pawar

Leave a Comment