नेटफ्लिक्सलाही आवडली आंबट-गोड ‘मुरांबा’ची चव

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सध्या सुरु असलेल्या महामारीत ‘वर्क फ्रॉम होम’ हा पर्याय असल्यामुळे अनेक जण घरूनच काम करत आहेत. मात्र बाहेर कुठेच जाता येत नसल्याने सगळ्यांनाच कंटाळा आला आहे. या सगळ्यात आधार दिला आहे तो, ओटीटी प्लॅटफॉर्मने. यात इतके पर्याय आहेत, की काय पाहायचे, हे ठरवणे तसे महाकठीण काम.

म्हणूनच हे काम सोपे करण्यासाठी नेटफ्लिक्सवर प्रसारित होणाऱ्या ७० सर्वोत्कृष्ट चित्रपटांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे आणि या यादीमध्ये इंग्रजी, हिंदी आणि अन्य भाषेंसोबतच आपल्या मराठी चित्रपटाचाही समावेश करण्यात आला आहे. वरूण नार्वेकर दिग्दर्शित ‘मुरांबा’ या चित्रपटाला नेटफ्लिक्सवरील उत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत स्थान मिळाले आहे.

See also  सफाई कर्मचा-यांच्या ‘दैवी’ कर्माला अभिनेत्री तेजस्विनी पंडितचं नवरात्री स्पेशल..!

अमेय वाघ, मिथिला पालकर, सचिन खेडेकर, चिन्मयी सुमीत यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा आंबट-गोड ‘मुरांबा’ प्रेक्षकांच्या आजही पसंतीस उतरत आहे. सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना या चित्रपटाने आपलेसे केले आहे. आधुनिक नातेसंबंधांची बदलती गती आणि हा बदल स्वीकारताना पालकांची होणारी घालमेल याची सुरेख मांडणी या चित्रपटात करण्यात आली आहे.

तीन वर्षांनंतरही या चित्रपटाची लोकप्रियता कायम असण्याबाबत निर्माता निनाद वैद्य सांगतात, ”मुळात हा चित्रपट ‘तुमच्या घरातली आमची गोष्ट’ या टॅगलाईनला धरून असल्याने प्रेक्षकांना तो आजही आपल्या जवळचा वाटतो. गेल्या तीन वर्षांपासून ‘मुरांबा’ नेटफ्लिक्सवर आहे आणि आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट ७० चित्रपटांमध्ये त्याने आपले स्थान टिकवून ठेवले आहे. या पेक्षा दुसरी कुठली आनंददायी गोष्ट असू शकते?”

See also  बेबी डॉल सन्नी लिओनी ची संपत्ती जाणून आश्चर्य चकित व्हाल !

Leave a Comment