“गोलमाल” चित्रपटातील मुरलीची बायको आहे खूपच सुंदर, मुरली अगोदर या व्यक्तीची होती ती बायको…
बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्री यांचं जसं घट्ट नातं आहे तसं त्यामधील कलाकारांचं सुद्धा आहे. आपण असे अनेक उदाहरणे याआधी पाहिली असतील की मराठी अभिनेत्री आणि बॉलिवूड अभिनेता हे रिलेशन मध्ये आहेत. किंवा काहींनी एकत्र आयुष्यातली सुरुवात केलेली आहे. तर आज आपण अश्याच एका एका जोडप्या बद्दल जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये एक मराठी तर दुसरा हिंदी चा व्हीलन स्टार आहे.
ज्या बॉलिवूड अभिनेत्या बद्दल आणि त्याच्या बायको बद्दल बोलणार आहोत. तो अभिनेता बॉलिवूड मधील अनेक कॉमेडी, किंवा थ्रि’लर चित्रपट केलेला व्हीलन आहे. त्याला आपण सगळेच ओळखतो. बरं तरी त्याची एक ओळख सांगायची म्हणजे गोलमाल पाहिलाय का ? असा कुणी चित्रपट प्रेमी नसेल ज्याने गोलमाल पाहिला नसेल. खूप विनोदी चित्रपट आहे.
गोलमाल चित्रपटाच्या सीरिजमधील त्याच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. त्याने बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. प्रभासच्या साहो या चित्रपटात देखील तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. कारण तो कामच खूप उत्तम करत असतो. त्याने हिंदीसोबतच अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. त्याने आजपर्यंत केलेल्या सर्वच भूमिका प्रेक्षकांना खूप पसंत पडतात. आज तो लोकप्रिय तेच्या शिखरावर आहे.
साऊथ मध्ये सुद्धा खूप कामे केलेली आहेत. तिकडे ही मुरलीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असले तरी तो मीडियापासून दूर राहणेच पसंत करतो. त्याला चाहणारा वर्ग खूप आहे. पण तो सोशल मीडिया वापरत नाही. फार कमी जणांना माहित आहे की त्याची पत्नीदेखील मराठी आणि हिंदी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आणि ती हिंदी नसून एक मराठी अभिनेत्री आहे. आधी मैत्री झाली मग प्रेम आणि मग आयुष्यात लग्ना ची सुरुवात. तर एवढ्यावर त्यांची स्टोरी काही संपत नाही.
आता आपल्याला प्रश्न पडला असेल की त्याच्या बायकोच खरं नाव काय आहे. तर तेही आपण जाणून घेणार आहोत. तर बॉलिवूड अभिनेते मुरली शर्माच्या ( murli sharma ) पत्नीचे नाव अश्विनी कळसेकर ( ashwini kalsekar ) असून तिने मराठी चित्रपटांद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली. तिने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला मराठी मालिकांमध्ये देखील काम केले. इथं तिने अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवल्या नंतर मग खरी तिला कामे मिळण्यास सुरुवात झाली. ती कधी थांबलीच नाही.
त्यानंतर तिला शांती या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांना आवडली. पण तिला खऱ्या अर्थाने ओळख सीआयडी या मालिकेमुळे मिळाली. तर मुरली शर्माची बायको अश्विनी ही एक अनेक मालिकेत काम केलेली उत्तम अभिनेत्री आहे. वेगवेगळ्या मालिकेत केलेल्या सर्व भूमिका खूप लक्षात राहिलेल्या आहेत.
आता एवढ्या मराठी आणि इतर मालिकेत काम केल्यानंतर अश्विनी यांनी ठरवलं की आता हिंदी टेलिव्हिजन मध्ये झोकून काम करायचं. मग काय तिने कसम से या मालिकेत काम केले. या मालिकेत तिने साकारलेली नकारात्मक भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. या मालिकेसाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. बरं मग तिला असं वाटलं की आपण मालिका करत आहोत ठीक आहे; पण सिनेमा कधी करणार तर मग तिने मुसाफिर, अपहरण, फूंक, गोलमाल यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. यातील तिच्या भूमिका खूप चर्चेत होत्या. आजही तिचं काम आवर्जून पाहिलं जातं.
मराठी मधील अभिनेत्री लोकप्रिय आणि हिंदी मध्ये अभिनयाचा डंका वाजवणारी अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेली अश्विनी कळसेकर आणि मुरली शर्मा यांनी २००९ मध्ये लग्न केले.. पण तिने यापूर्वी ही लग्न केले होते हे कदाचित आपल्याला माहीत नसेल. तर अश्विनीचे पहिले लग्न नितेश पांडे या अभिनेत्यासोबत झाले होते. त्याने साया, एक रिश्ता साझेदारी का या मालिकांमध्ये तर ओम शांती ओम या चित्रपटात काम केले आहे. तोही खूप उत्तम असा अभिनेता होता. पण नाही टिकलं नातं.
तर हा निलेश पांडे तिचा आधीचा नवरा होता खरं ते फक्त नावाला. कारण नात्यात जर प्रेम नसेल तर मग काही मजा नाही. मग त्यांनी वेगळं व्हायचं ठरवलं. त्यानंतर तिचं लग्न मुरली शी झालं ओळख, प्रेमातून. तर अश्या दोघांना पुढील भावी वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.