शिल्पा शेट्टी : ‘माझा पती पॉर्न नाहीतर एरोटिक फ्लिम्स बनवतो’ ; जाणून घ्या दोघात नेमका काय फरक असतो?

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मुंबई: अश्लील चित्रपट बनवल्या प्रकरणी अटकेत असलेल्या राज कुंद्राबाबत नवनवीन गोष्टींचा खुलासा होत आहेत. राज कुंद्रा याला 27 जुलै पर्यन्त पोलिस कोठडी सुनावण्यात आली. राज कुंद्रा ज्या कंपनीमार्फत अश्लील चित्रपट बनवायचा त्या कंपनीत शिल्पा शेट्टीचीही भागीदारी होती. त्यामुळे पोलिसांनी तिचीही चौकशी केली. शिल्पा शेट्टीने पोलिसांना सांगितले की, मला अश्लील फिल्म्स बद्दल काही माहिती नाही आणि माझा पती पॉर्न फिल्म्स बनवत नव्हता तर तो एरोटिक फिल्म्स बनवायचा. राज कुंद्राच्या वकिलानेही हेच म्हटले आहे.

या लेखात पॉर्न आणि एरोटिक फिल्म्स मध्ये काय फरक असतो, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

See also  "अभिनेत्रींना ड्र'ग्ज देऊन त्यांचे व्हिडिओज काढले जात..." या अभिनेत्रीने राज कुंद्राचे सगळे रॅकेट उघड केले

कामुक चित्रपट म्हणजे लैंगिक उत्तेजना वाढवणारी सामग्री. लैंगिक उत्तेजना वाढवणार्‍या सामग्रीस एरोटिक असेही म्हटले जाते. यात एखादे चित्र, शिल्प, छायाचित्रण, नाटक, चित्रपट, संगीत इत्यादि कलाप्रकारातील काहीही असू शकते. याद्वारे प्रेक्षक, वाचकांची लैंगिक उत्तेजना वाढवण्यात येते. या कलाप्रकारात नग्नतेचा समावेश असतो परंतु यात थेट लैंगिक संबंध नसतात. कामुक सामग्री फक्त उत्तेजन पातळी वाढवण्याचे काम करते. बर्‍याच वेळा सेक्स थेरेपिस्ट या सामग्रीचा वापर रूग्णांच्या उपचारासाठीही करतात.

याउलट पॉर्न चित्रपट फार भडक असतात. यांचा मूळ उद्देशच लैंगिक क्रिया करण्यासाठी टर्न ऑन करण्याचा असतो. यात नग्नते सोबतच विभत्सपणा असतो. थेट संभोगाचे विडिओ किंवा चित्र पॉर्न मध्ये असतात. पोर्नोग्राफीमध्ये केवळ नग्नताच नाही, तेथे संभोग देखील दर्शवला जातो. म्हणजेच दोन मानवांमध्ये लैंगिक संबंध कसे होतात, हे देखील दाखवले जाते. तर, अश्लील चित्रपट बनवणे हा केवळ पैसे कमावण्याचा एक मार्ग आहे.

See also  सार्वजनिक ठिकाणी या 7 प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रींना जबरदस्तीने केले गेले किस, कॅमेऱ्यांमध्ये झाले कैद...

नेमकं काय म्हणाली शिल्पा शेट्टी?

काल शिल्पा शेट्टीची मुंबई पोलिसांनी 6 तास चौकशी केली. त्यात शिल्पा शेट्टीला अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यांचे उत्तर देताना शिल्पा शेट्टीने सांगितले की, माझा पती अश्लील विडिओ बनवत नव्हता तर तो एरोटिक फिल्म्स बनवायचा. त्यापेक्षा जास्त अश्लील विडिओ इतर प्लॅटफॉर्मवर आहेत. पॉर्न चित्रपटांशी आमचा काही संबंध नसल्याचे तिने म्हटले.

Preetam Gaikwad

Preetam Gaikwad

Leave a Comment