जेव्हा नागा चैतन्य म्हणाला होता, “मला समंथा सोडून दुसरी कोणीही नको” तेव्हा अभिनेत्रीने दिलं हे उत्तर…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

दक्षिण भारतीय अभिनेत्री सामंथा रूथ प्रभू आणि तिचा माजी झालेला पती – अभिनेता नागा चैतन्य या दोघांच्या घटस्फोटाच्या बातमीने चाहत्यांना खूप दु:ख झालेलं आहे. कोणीही कल्पना केली नसेल की, टॉलीवूडमधील सर्वात सुंदर जोडपे लग्नाच्या 4 वर्षानंतर वेगळे होतील. त्यांच्या विभक्त होण्याचे खरे कारण अद्याप समोर आले नाही.

कारण घटस्फोट घेण्याआधी व नंतर त्यांना खूप ट्रोलिंग चा सामना करावा लागलेला आहे. त्यामुळे त्यांनी लोकांना त्यांच्या गोपनीयतेचा आदर करण्याचे आवाहन केले आहे. या दरम्यान, दोघांचे आनंदी दिवसांचे जुने व्हिडिओ, फोटो आणि त्यांच्या रोमँटिक किस्से मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

समंथा रूथ प्रभु आणि नागा चैतन्य यांचं प्रेम खूप जुनं… 2017 मध्ये, जेव्हा नागा आपल्या सहकलाकार असलेली रकुल प्रीत सिंह सोबत ‘रारनडोई वेडुका चुधम’ या चित्रपटाचे प्रमोशन करत होता, तेव्हा संधी मिळताच वेळोवेळी पत्नी समंथावरील प्रेम व्यक्त करताना अनेकदा दिसला होता.

See also  या अभिनेत्याने केले आपल्यापेक्षा 16 वर्षांनी लहान असलेल्या मूलीसोबत लग्न, अजब प्रेम की गजब कहानी नक्की वाचा.

या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, नागा चैतन्याला त्याच्या लेडीलोव्ह समंथाला कॉल करण्यास सांगितले गेले. कॉल केल्यानंतर नागाने अभिनेत्रीला विचारले, ‘माझ्याकडे इतके पर्याय असताना मी समंथाची निवड का केली?’ याला सामंताने उत्तर दिले, ‘कारण मी तुम्हाला इतर पर्याय दिले नाहीत’. यानंतर अभिनेता म्हणाला, ‘मला दुसरा पर्यायही नको आहे’, ज्याच्या प्रत्युत्तरात समंथा त्याला ‘आय लव्ह यू’ म्हणते. आणि यावरून त्यांचं एकमेकांवर किती प्रेम होतं हे दिसून येत आहे.

2 ऑक्टोबर 2021 रोजी नागा आणि सामंथा यांनी त्यांचे 4 वर्षांचे वैवाहिक जीवन संपवून घटस्फोटाची घोषणा केली. त्यावेळी त्यांनी दिलेल्या संयुक्त निवेदनात असे लिहिले आहे, “आमच्या सर्व हितचिंतकांसाठी, खूप विचार आणि समजून घेतल्यानंतर, नागा आणि मी पती -पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

See also  प्रियांका चोप्राने केला मोठा खुलासा म्हणाली, "माझे वडील मस्जिद मध्ये गाणी म्हणायचे"; कारण जाणून थक्क व्हाल!

आम्ही एक दशकाची मैत्री मिळवण्याचे व ती टिकवण्यासाठी सदैव तत्पर राहिल्याने भाग्यवान आहोत. आमच्या नात्याचा गाभा होता, आमचा विश्वास. त्यामुळे त्याला कुठं तरी ठेच पोचल्यामुळे आम्ही वेगळे होत आहोत.

आम्ही आमच्या चाहत्यांना, हितचिंतकांना आणि माध्यमांना विनंती करतो की या कठीण काळात आम्हाला साथ द्या आणि आम्हाला पुढे जाण्यासाठी गोपनीयता द्या. म्हणजेच प्रायव्हसी जीवन जगुदया. सहकार्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार.”

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment