नागराज मंजुळे यांचा हा जबरदस्त लुक तुम्ही पाहिलात का, ओळखणे देखील होऊन बसेल कठीण…
मराठी सिनेविश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या “सैराट” या चित्रपटाने तब्बल शंभर कोटींची कमाई करून इतिहास रचला. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटाने रसिकांना जणू वेङ लावून ठेवले होते. सैराट प्रमाणेच नागराज मंजुळे यांच्या फँङ्री या चित्रपटावर आणि पिस्तूल्या या शॉर्ट फिल्म वर सुद्धा चाहत्यांनी भरपूर प्रेम केले. त्यामुळे एक संवेदनशील दिग्दर्शक अशी नागराज यांची ओळख बनली.
मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे आज संपूर्ण जगभरात चाहते आहेत. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित गोष्ट जाणून घेण्याची त्यांच्या प्रत्येक चाहत्याची इच्छा असते. म्हणून तर नागराज मंजुळे यांचा नवाकोरा लुक सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात वायरल झाला आहे.
त्यांचा हा फोटो पाहून चाहते थोडेसे आश्चर्यचकित झालेले आहेत. कारण नागराज मंजुळे यांनी खूप मेहनत घेऊन हा जबरदस्त लुक मिळवला आहे. तसेच त्यांचा हा लुक चाहत्यांच्या पसंतीत सुद्धा चांगलाच उतरला आहे. त्यामुळे नागराज यांच्या लुक वर चाहते अनेक कमेंट्स आणि लाईक्स देत आहेत.
तुम्हांला ठाऊक आहे का, पुन्हा एकदा नागराज मंजुळे आपल्या एका नवीन सिनेमासह रसिकांच्या भेटीस येणार आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या या चित्रपटात आकाश ठोसर सुद्धा झळकणार आहे. “घर बंदूक बिरयानी” असे त्यांच्या या आगामी चित्रपटाचे नाव आहे. स्वतः नागराज मंजुळे यांनी या सिनेमाचा पहिला टिझर सोशल मीडियावर प्रदर्शित केला.
यामध्ये नागराज मंजुळे, आकाश ठोसर यांसह सयाजी शिंदे यांची देखील भूमिका असणार आहे. मात्र हा सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांना आणखी काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे. कारण हा सिनेमा 2022 मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे सोशल मीडियावर चाहते आनंदाचा वर्षाव करताना दिसतात.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.