राहुल गांधीवर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे, नाना पटोले शिवसेनेवर भडकले; जाणून घ्या कारण

Advertisement

नवी दिल्ली: महाविकास आघाडी सरकारच्या घटकपक्षातील नेत्यांमध्ये सुरू असलेली शेरबाजी काही थांबताना दिसत नाहीत. दररोज या तीन पक्षातील नेते सरकार मधील सहकारी पक्षावर किंवा नेत्यांवर टीका करताना दिसत आहेत.

दरम्यान, महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्लीत आहेत. राहूल गांधी यांना भेटण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘सामना’ दैनिकातून कॉंग्रेसच्या देशभरातील स्थितीबाबत भाष्य करण्यात आले होते, याबाबत नाना पटोले यांना त्यांची प्रतिक्रिया विचारली असता नाना पटोले म्हणाले, “मी सामना मध्ये काय लिहीलं आहे यावर कोणतीही प्रतिक्रिया देत नाही कारण मी सामना वाचत नाही. पण वारंवार त्याच-त्याच गोष्टी जर बोलण्यात येत असतील तर त्याचा आम्हाला त्याचा विचार करावा लागेल.”

See also  इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करणार्‍या कॉंग्रेसला फडणवीसांचा टोला, म्हणाले ही तर...
Advertisement

नाना पटोले पुढे म्हणाले, “आमच्या पक्षाला त्यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. गांधी परिवारावर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. त्यांनी सूर्यावर थुंकू नये कारण ते त्यांच्यावरच पडेल हे लक्षात ठेवावं.”

नेमकं काय म्हटलंय सामनामध्ये?

Advertisement

कॉंग्रेस पक्षातून अनेक नेते इतर पक्षात जात आहेत. यावर राहूल गांधी यांनी कॉंग्रेस पक्षात डरपोक लोकांना स्थान नाही असं म्हटलं होतं. यावर सामना मध्ये राहूल गांधींच्या या विधानावर टोमणा मारण्यात आला.

राहूल गांधी म्हणतात ते बरोबर आहे पण जर कॉंग्रेस पक्षातून ‘डरपोक’ नेते असेच जात राहिले तरी कॉंग्रेस पक्षाकडे हिंमतबाज कार्यकर्ते निर्माण करण्याची फॅक्टरी आहे काय? असा प्रश्न करण्यात आला. तसेच कॉंग्रेस पक्षाला नेमकं काय करायचं आहे आणि त्यांची दिशा कोणती आहे याबाबत संभ्रम आहे. असं आजच्या सामना अग्रलेखात शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

See also  बनावट कथा रचून आमच्या आमदारांचे निलंबन केलंय – फडणवीसांचा गंभीर आरोप
Advertisement

Leave a Comment

close