नारायण राणे यांनी घेतली पाहिल्याच दिवशी अधिकार्‍यांची क्लास, तसेच मुख्यमंत्र्यांवर केली टीका

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

नवी दिल्ली: 7 जुलै रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांना कॅबिनेट मध्ये घेण्यात आले. त्यांच्याकडे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात असून, आज 8 जुलै रोजी त्यांनी पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारलेल्या पाहिल्याच दिवशी त्यांनी मंत्रालयातील अधिकार्‍यांची क्लास घेतल्याचं वृत्त आहे. नारायण राणे यांच्या कार्यशैलीशी परिचित नसलेल्या दिल्लीतील अधिकार्‍यांना फैलावर घेतल्याची चर्चा आहे.

नारायण राणे आज पदभार स्वीकारल्यानंतर मंत्रालयातील संबंधित अधिकार्‍यांसोबत बैठक घेणार होते. त्यांनी तशी पूर्वसूचनाही अधिकार्‍यांना दिली होती. मात्र, अधिकार्‍यानी बैठकीला येताना पूर्ण तयारी केली नसल्याचे बैठकीदरम्यान नारायण राणे यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी अधिकार्‍यांची चांगलीच खरडपट्टी काढली. राणे यांनी अधिकार्‍यांसोबत तासभर बैठक घेतली. त्यातील अर्धा तास अधिकार्‍यांची चांगलीच शाळा घेतली.

See also  नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपद, जाणून घ्या शिवसेनेची प्रतिक्रिया

बैठकीची पूर्वसूचना देऊनही अधिकार्‍यांनी बैठकीची तयारी का केली नाही? असा सवालही त्यांनी केला. यानंतर बैठकीला येताना महत्वाच्या नोंदी करण्यासाठी सर्व अधिकार्‍यांना नोटपॅड जवळ ठेवण्याची ताकीद दिली. पाहिल्याच दिवशी राणेंचा असा अवतार पाहून अधिकारी चांगलेच भांबावले होते. नारायण राणे यांच्या कार्यशैलीची चर्चा दिल्लीत होत आहे.

मुख्यमंत्र्यांवर टीका

नारायण राणे यांना मंत्रिपद मिळाल्यापासून देशभरातून अनेकांनी शुभेच्छा दिल्या. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजूनही शुभेच्छा दिल्या नाहीत. यावर बोलताना नारायण राणे यांनी म्हटले की, ” मला सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या पण उद्धव ठाकरेंनी शुभेच्छा दिल्या नाहीत. कारण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एवढ्या मोठ्या मनाचा नाही”

Preetam Gaikwad

Preetam Gaikwad

Leave a Comment